Airbnb सेवा होस्ट करण्यासाठी काय आवश्यक आहे
Airbnb सेवा म्हणजे गेस्टचे वास्तव्य अजून खास बनवणाऱ्या अविश्वसनीय सेवा आहेत. सेवा कॅटेगरीजमध्ये शेफ्स, फोटोग्राफी, मसाज, स्पा ट्रीटमेंट्स, पर्सनल ट्रेनिंग, हेअर सर्व्हिस, मेकअप, नेल सर्व्हिस, तयार मील्स आणि केटरिंग यांचा समावेश आहे.
सेवांची गुणवत्तेसाठी तपासणी केली जाते आणि होस्ट्सनी आणि लिस्टिंग्जनी आमच्या स्टँडर्ड्सची आणि आवश्यकतांची पूर्तता करणे अपेक्षित आहे. जाणून घेण्यासाठी येथे काही गोष्टी आहेत:
मूलभूत स्टँडर्ड्स
- ओळख व्हेरिफिकेशन: तुमचे ओळख व्हेरिफिकेशन करा आणि लागू असेल तेथे, बॅकग्राऊंड चेक्स आणि इतर तपासण्या पूर्ण करा.
- लायसन्स आणि सर्टिफिकेशन: तुमच्या सेवेशी संबंधित वैध लायसन्सेस, विमा आणि सर्टिफिकेशन्स कायम ठेवा. आवश्यक असेल तेव्हा पुरावा द्या.
- अनुभव: संबंधित क्षेत्रात किमान 2 वर्षांचा अनुभव असावा, किंवा कलिनरीची पदवी नसलेल्या शेफ्ससाठी 5 वर्षांचा अनुभव असावा. आम्ही तुमच्या लिस्टिंगमध्ये तुम्ही समाविष्ट केलेले शिक्षण, रोजगाराचा इतिहास किंवा ॲवॉर्ड्स आणि सन्मान यांची पडताळणी करू शकतो.
- लौकिक: उच्च-गुणवत्तेचा लौकिक टिकवून ठेवा, जो गेस्ट्सचा उत्कृष्ट फीडबॅकसारख्या गोष्टींमधून प्रतिबिंबित होतो आणि पुरस्कार आणि प्रकाशनांमधील प्रसिद्धी किंवा इतर प्रकारच्या मान्यता या अतिरिक्त गोष्टीही विचारात घेतल्या जातात.
- पोर्टफोलिओ: तुम्ही तुमची लिस्टिंग तयार करता तेव्हा तुमचा अनुभव हायलाईट करणारे फोटो शेअर करा.* गेस्ट्स तुमच्याकडे येण्याचे तुमचे नियोजन असेल तर तुमची प्रक्रिया आणि तयारी, टूल्स किंवा उपकरणे आणि बिझनेस लोकेशन दाखवणाऱ्या इमेजेस निवडा.
लिस्टिंग स्टँडर्ड्स
- फोटो: तुम्ही प्रदान करत असलेल्या सेवेची स्पष्ट, वास्तववादी कल्पना देण्याकरता प्रत्येक ऑफरिंगच्या एका फोटोसह कमीतकमी 5 उच्च दर्जाचे फोटो सबमिट करा.* तुम्ही फोटोग्राफर असाल तर तुम्ही कमीत कमी 15 फोटो अपलोड करणे अत्यावश्यक आहे.
- शीर्षक: ही सेवा काय आहे आणि ती कोण देत आहे, हे स्पष्ट करा. काही वर्णनात्मक शब्दांसह प्रारंभ करा आणि तुमचे नाव शेवटी समाविष्ट करा.
- कौशल्य: तुमची सेवा होस्ट करण्यासाठी तुम्ही विशेष पात्र का आहात, त्याचे वर्णन करा. थेट, संक्षिप्त आणि स्पष्ट लिहा.
- ऑफरिंग्ज: प्रत्येक लिस्टिंगसाठी, किंमतींच्या—बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम—या श्रेणींसह किमान 3 ऑफरिंग्ज जोडा. तुमच्या वर्णनांमध्ये घटक, टेक्निक्स, उपकरणे किंवा साहित्य यांसारखे विशिष्ट तपशील हायलाईट करा, जेणेकरून गेस्ट्सना ते काय खरेदी करत आहेत हे कळेल.
सेवांच्या सबमिशन्सचा आणि मंजूर केलेल्या लिस्टिंग्जमध्ये केलेल्या बदलांचा आढावा घेतला जाईल.
होस्टिंगसाठी आवश्यकता
- बुकिंग्ज: गेस्ट्सच्या रिझर्व्हेशन्सचा सन्मान करा आणि टाळता येण्याजोग्या कारणांमुळे कॅन्सल करणे टाळा.
- लिस्टिंग: लोकेशन, बुकिंगच्या अटी आणि सेवा सुरू होण्याची आणि संपण्याची वेळ यासह लिस्टिंग अचूक ठेवा.
- मेसेजिंग: गेस्ट्सशी वेळेवर संवाद साधा. तुम्ही सेवेदरम्यान कोणाला मदतीसाठी सोबत घेऊन येणार असल्यास, ते गेस्ट्सना कळवा, त्यांना विनाशुल्क कॅन्सल करता यावे यासाठी पुरेशी पूर्वसूचना द्या.
- सुरक्षितता: दुखापत टाळण्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि सूचना द्या, स्वच्छ उपकरणे प्रदान करा आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी एक योजना तयार करा. तुमच्या ऑफरिंग्जसाठी आवश्यकतेनुसार गेस्टच्या योग्य वयाची अट निश्चित करा.
- लोकेशन: तुम्ही ज्या ठिकाणी सेवा देत आहात त्या जागेचा आदर ठेवा. प्रॉपर्टीला नुकसान पोहोचवू नका आणि वापरानंतर स्वच्छता करा.
तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. वर नमूद केलेल्या व्यतिरिक्त, तुम्हाला Airbnb च्या सेवेच्या अटी आणि होस्टचे मुख्य नियम आणि होस्टिंगची सुरक्षितता धोरणे यांचे पालन करणेदेखील आवश्यक आहे.
जे होस्ट्स आमच्या स्टँडर्ड्सची आणि आवश्यकतांची पूर्तता करत नाहीत त्यांची लिस्टिंग किंवा अकाऊंट सस्पेंड केले किंवा काढून टाकले जाऊ शकते. Airbnb सेवांचे स्टँडर्ड्स आणि आवश्यकता पूर्ण वाचा.
*तुम्ही मसाज किंवा स्पा सर्व्हिस प्रदान करत असल्यास, तुम्हाला तुमच्या लिस्टिंगसाठी फोटोज सबमिट करण्याची आवश्यकता नाही. या सेवा स्पष्ट करणाऱ्या व्यावसायिक फोटोंच्या लायब्ररीमधून आम्ही तुमच्यासाठी फोटोज निवडू.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.