उच्च-गुणवत्तेचे फोटो कसे निवडायचे आणि जोडायचे
Airbnb वर सर्च करताना गेस्ट्सचे लक्ष वेधून घेण्यास फोटोज मदत करतात. तुमच्या फोटोंनी तुमच्या सेवेची स्पष्ट आणि अचूक कल्पना दिली पाहिजे आणि गेस्ट्सना बुक करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.
गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे
तुम्ही शेअर केलेला प्रत्येक फोटो उच्च गुणवत्तेचा असणे आवश्यक आहे. प्रत्येक इमेजचे रिझोल्युशन किमान 800 x 1,200 पिक्सेल्स आणि फाईल साईज 10 मेगाबाईट्स पर्यंत असणे आवश्यक आहे.
असे फोटो सबमिट करा:
- तुम्ही काढलेले किंवा परवानगी घेऊन वापरलेले
- चांगल्या प्रकाशातले, शक्यतो नैसर्गिक प्रकाशातले
- कम्पोझिशन आणि बॅकग्राऊंड साधे असलेले
- मुख्य विषयाला केंद्रस्थानी ठेवून फोकस केलेले
- तपशिलांचा क्लोज-अप आणि विस्तृत कम्पोझिशन्सचे मिश्रण
असे फोटो सबमिट करू नका:
- अमूर्त इमेजेस किंवा अति क्लोज-अप्स
- अव्यवस्थित किंवा खूप गोष्टी असलेले
- अंधारात काढलेले किंवा प्रखर फ्लॅश वापरलेले
- कोलाजेस
- एकाच फोटोची अनेक व्हर्जन्स
- लोगोजचे किंवा ब्रँड्सचे फोटो
तुमच्या कोणत्याही फोटोंमध्ये कोणाचा चेहरा दिसत असल्यास, तुमच्याकडे ते वापरण्यासाठी त्यांची परवानगी असल्याची खात्री करा.
उत्कृष्ट फोटोज जोडणे
सेवा लिस्टिंग्जमध्ये फोटो 3 ठिकाणी प्रदर्शित केले जातात: कव्हर फोटो म्हणून, तुमच्या ऑफरिंग्जच्या लिस्टमध्ये आणि फोटो गॅलरीत.
प्रत्येक ऑफरिंगसाठी एक फोटो असे एकूण किमान 5 फोटो सबमिट करा. तुम्ही फोटोग्राफी सर्व्हिस प्रदान करत असल्यास, तुमच्या पोर्टफोलिओचे प्रतिनिधित्व करण्यासाठी किमान 15 इमेजेस निवडा.
तुम्ही सबमिट केलेल्या फोटोंचा आम्ही आढावा घेऊ आणि आमच्या स्टँडर्ड्सची पूर्तता करणाऱ्या इमेजेस मंजूर करू. प्रत्येक विभागासाठी तुम्ही काय सबमिट केले पाहिजे, ते येथे आहे.
कव्हर फोटो. ही इमेज तुमच्या लिस्टिंगच्या शीर्षस्थानी दिसते आणि गेस्ट्सना तुम्ही प्रदान करत असलेल्या सेवेची कल्पना येण्यास मदत करते. एक यशस्वी फोटो असा असतो:
- हॉरिझॉन्टल
- साधा आणि व्यवस्थित
- केंद्रित, सर्व बाजूंनी क्रॉप करण्यासाठी जागा असलेला
साधी पांढरी बॅकग्राऊंड किंवा लोकांच्या चेहऱ्याचा क्लोज-अप असलेले फोटो टाळा.
तुमच्या ऑफरिंग्ज. ऑफरिंग्ज पाहूनच गेस्ट्स बुक करणार आहेत—त्यांना तुमचे दरपत्रक किंवा मेनू असे समजा. तुमची प्रत्येक ऑफरिंग अचूकपणे दाखवणारा एक वेगळा फोटो जोडा. हे फोटोज छोटे असतात, त्यामुळे समजायला सोपी पडतील अशी साधी दृश्ये निवडा. उत्कृष्ट फोटो असे असतात:
- स्वच्छ बॅकग्राऊंडसह एकाच घटकावर लक्ष केंद्रित केलेले
- त्यांचे कम्पोझिशन एकसारखे असते
फोटो गॅलरी. ही संभाव्य गेस्ट्सना तुम्ही काय प्रदान करता हेच नव्हे तर तुम्ही कोण आहात हे दाखवण्याची संधी आहे. तुम्ही शेअर केलेल्या सर्व इमेजेस गेस्ट्स फोटो गॅलरीमध्ये पाहू शकतात. खालील गोष्टी दर्शवणारे फोटो निवडा:
- तुमची प्रक्रिया आणि तयारी
- तुम्ही वापरत असलेली टूल्स, उपकरणे किंवा साहित्य
- तुमचे बिझनेस लोकेशन, जर गेस्ट्सना तुमच्याकडे येण्याची गरज असेल तर
- तुमच्या सेवेचा अंतिम परिणाम, जसे की त्यांच्या जेवणाचा आनंद घेत असलेले गेस्ट्स
तुम्ही सबमिट केलेले सर्व फोटो वापरण्याची तुमच्याकडे परवानगी असल्याची आणि इमेजेसमध्ये तुमची सेवा अचूकपणे प्रतिबिंबित होत असल्याची खात्री करा.
होस्ट्स, फोटोज आणि लिस्टिंगचे सर्व तपशील Airbnb सेवांच्या स्टँडर्ड्स आणि आवश्यकतांनुसार असणे आवश्यक आहे.
तुम्ही मसाज किंवा स्पा सर्व्हिस प्रदान करत असल्यास, तुम्हाला तुमच्या लिस्टिंगसाठी फोटोज सबमिट करण्याची आवश्यकता नाही. या सेवा स्पष्ट करणाऱ्या व्यावसायिक फोटोंच्या लायब्ररीमधून आम्ही तुमच्यासाठी फोटोज निवडू.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.