तुमचा पहिला 5-स्टार रिव्ह्यू मिळवा
रेटिंग्ज आणि रिव्ह्यूज तुमच्या लिस्टिंगवर पोस्ट केल्या जातात आणि त्यांच्यामुळे गेस्ट्सना तुमची सेवा त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यात मदत होते. गेस्ट्सच्या सकारात्मक फीडबॅकमुळे Airbnb वर तुमचा ब्रँड तयार करण्यात तुम्हाला मदत होते आणि त्यामुळे तुम्हाला जास्त बुकिंग्ज मिळू शकतात आणि अधिक कमाई होऊ शकते.
रिव्ह्यूज कसे काम करतात ते समजून घेणे
सेवा पूर्ण होताच गेस्ट्सना रिव्ह्यू लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्यांच्या फीडबॅकमुळे तुम्हाला सर्वोच्च गुणवत्तेची सेवा देण्यात मदत होते. त्यांना हे देण्यास सांगितले जाते:
- एकूण रेटिंग. गेस्ट्स तुमच्या सेवेला 1 ते 5 स्टार्स या श्रेणीत रेटिंग देतात. तुमचे सरासरी एकूण रेटिंग तुमच्या लिस्टिंगवर, सर्च रिझल्ट्समध्ये आणि तुमच्या प्रोफाईलवर दिसून येते.
- तपशीलवार रेटिंग्ज. गेस्ट्स आदरातिथ्य, विश्वासार्हता आणि मूल्य या निकषांवर रेटिंग देऊन अधिक विशिष्ट असा फीडबॅक देतात. तुम्ही तुमच्या बिझनेसच्या जागी किंवा सार्वजनिक ठिकाणी सेवा देत असल्यास, जसे की तुमच्या सलूनमध्ये हेअर स्टायलिंग किंवा बीचवर योगा सेशन, त्यांना लोकेशनसाठीसुद्धा रेटिंग देण्यास सांगितले जाईल.
- सार्वजनिक रिव्ह्यू. हा तुमच्या प्रोफाईलवर आणि तुमच्या लिस्टिंगच्या रिव्ह्यूज विभागामध्ये दिसतो. तुम्ही सार्वजनिक रिव्ह्यूला उत्तर दिल्यास, तुमचा प्रतिसाद त्याच्या खाली दिसेल.
- खाजगी टीप. हा फीडबॅक तुमच्या लिस्टिंगवर दिसत नाही—तो फक्त तुमच्यासाठी असतो.
एकदा का तुम्हाला तुमचे पहिले 3 रिव्ह्यूज मिळाले की तुम्ही गेस्ट फीडबॅकवरील इन्साईट्स अनलॉक कराल. Airbnb ॲपचा इन्साईट्स विभाग ॲक्सेस करण्यासाठी मेनू वापरा.
गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे
Airbnb होस्टिंग टूल्सच्या मदतीने तुम्ही गेस्ट्सच्या अपेक्षांपेक्षा जास्त चांगले काम करू शकता.
उत्कृष्ट सेवा द्या. गेस्ट्सना त्यांची काळजी घेतली जाते आहे आणि त्यांचे आपलेपणाने स्वागत होते आहे असे वाटण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या ऑफरिंग्ज पर्सनलाईज कशा करता येतील याबद्दल विचार करा.
- गेस्ट्सशी मेसेजेस टॅबमध्ये संवाद साधून त्यांना त्यांची पसंती विचारा, प्रश्नांची उत्तरे द्या आणि कस्टम ऑफरिंग्ज तयार करा.
- सहजपणे कस्टमाईझ करण्यासाठी आणि बुकिंगनंतर स्वागताचा मेसेज व सेवेनंतर फॉलो-अप नोट पाठवण्यासाठी झटपट उत्तरांचा वापर करा.
- तुमची ऑफरिंग आणखी खास वाटावी यासाठी विशेष लक्ष देऊन काही अतिरिक्त गोष्टींचा समावेश करा.
सर्वकाही सुरळीत चालले आहे याची खात्री करा. सर्व तयारी करून, स्पष्ट अपेक्षा सेट करून आणि प्रत्येक सेवेच्या आधी आणि नंतर गेस्ट्सच्या मेसेजेसना त्वरित प्रतिसाद देऊन तुम्ही विश्वासार्ह आहात हे दाखवा.
- कोणत्याही वस्तूंची व्यवस्था वेळेआधी करून ठेवा आणि तुम्ही गेस्टकडे जात असल्यास, असा रस्ता निवडा जो तुम्हाला वेळेत पोहोचवेल. प्रवास आणि सेटअप यासाठी वेळ मिळावा म्हणून दोन बुकिंग्जच्या दरम्यानचा वेळ शेड्युल करण्यासाठी तुमचे Airbnb कॅलेंडर वापरा.
- विशिष्ट वेळी पाठवायचे मेसेजेस शेड्युल करा, जसे की सेवेच्या आदल्या दिवशी, जेणेकरून तुमच्या गेस्टना काय अपेक्षा ठेवावी हे कळेल.
- प्रत्येक मेसेज वेळेत वाचला जावा यासाठी Airbnb ॲपमध्ये आणि तुमच्या डिव्हाईसच्या सेटिंग्जमध्ये नोटिफिकेशन्स चालू करा.
- तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या घरी सेवा देत असल्यास तुम्हाला ती जागा ज्या स्थितीत मिळाली होती त्याच स्थितीत ती तुम्ही जातानाही असेल याची खात्री करा.
पैशांच्या बदल्यात योग्य मूल्य द्या. स्पर्धात्मक किंमत हा मूल्य ठरवतानाच्या विचारात एक महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही लिस्टिंग्ज टॅबमध्ये तुमचे भाडे सेट करू शकता किंवा सवलती जोडू शकता.
- गेस्ट्सना अधिक पर्याय मिळावेत आणि तुमची कमाईची उद्दिष्टे पूर्ण व्हावीत यासाठी वेगवेगळ्या किमतींच्या कमीत कमी 3 ऑफरिंग्ज जोडा. बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम अशा तीन किमतींवर ऑफरिंग्ज सेट करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.
- सुरुवातीला कमी किंमत ठेवण्याचा विचार करा आणि उत्तम रेटिंग्ज आणि रिव्ह्यूज मिळून Airbnb वर तुमचा लौकिक वाढल्यावर किमतीचे पुनर्मूल्यांकन करा.
- गेस्ट्सना आकर्षित करण्यात मदत व्हावी याकरता मर्यादित वेळेसाठी, अर्ली बर्ड्स आणि मोठ्या ग्रुपसाठी या सवलती जोडा.
- स्पर्धात्मक होण्यासाठी Airbnb आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर तुमच्यासारख्या सेवा ब्राऊझ करा आणि स्थानिक किमतींची तुलना करा.
आदरातिथ्याच्या या सल्ल्यांव्यतिरिक्त, Airbnb चे होस्टचे मुख्य नियम आणि होस्टिंगची सुरक्षितता धोरणे लक्षात ठेवा. त्यात सुरक्षित आणि उच्च-गुणवत्तेच्या सेवा देण्याशी संबंधित मूलभूत अपेक्षा दिलेल्या आहेत.
होस्ट्स, फोटोज आणि लिस्टिंगचे सर्व तपशील Airbnb सेवांच्या स्टँडर्ड्स आणि आवश्यकतांनुसार असणे आवश्यक आहे.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.