नजरेत भरणाऱ्या ऑफरिंग्ज कशा तयार कराव्यात
तुमच्या ऑफरिंग्जचा मेनू आयटम्स म्हणून विचार करा, ज्यामधून गेस्ट्स तुमच्याकडून खरेदी करू शकतात. तुम्ही काय ऑफर करता हे वेगळे करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही प्रत्येक ऑफरिंगला नाव, वर्णन, फोटो आणि किंमत द्याल.
गेस्ट्सना पर्याय देणे
गेस्ट्सना अधिक पर्याय मिळावेत आणि तुमची कमाईची उद्दिष्टे पूर्ण व्हावीत यासाठी वेगवेगळ्या किमतींच्या कमीत कमी 3 ऑफरिंग्ज जोडा. बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम अशा तीन किमतींवर ऑफरिंग्ज सेट करणे सर्वोत्तम आहे.
तुमच्या किमतींमधून प्रत्येक ऑफरिंगचे स्वरूप, जटिलता आणि अनोखेपणा प्रतिबिंबित झाला पाहिजे. उदाहरणार्थ, अमेरिकेत फोटोग्राफर $50 USD पेक्षा कमी किंमत असलेले अर्ध्या तासाचे सेशन करू शकतो, पर्सनलाईज केलेल्या पोर्ट्रेट सेशनची किंमत $50 USD ते $150 USD दरम्यान असेल आणि कौटुंबिक सेशनची किंमत $150 USD पेक्षा जास्त असेल.
Airbnb वर सेवा शोधणाऱ्या गेस्ट्सना तुमची सर्वात कमी किंमत सर्च रिझल्ट्समध्ये दिसेल. बेसिक ऑफरिंगमुळे पहिल्यांदा गेस्ट्सना आकर्षित करण्यात आणि तुमच्या इतर ऑफरिंग्जमध्ये स्वारस्य निर्माण करण्यात मदत होऊ शकते.
गेस्ट्सना निवडण्यासाठी वेगवेगळ्या वेळा आणि लोकेशन्स देण्याचा देखील विचार करा. उदाहरणार्थ, एखादे शेफ ऑरगॅनिक ब्रेकफास्ट, फार्मर्स मार्केटमध्ये लंच आणि 3-कोर्स डिनर ऑफर करू शकतात आणि एखादे एस्थेटिशियन त्यांच्या स्वतःच्या स्पामध्ये आणि गेस्टच्या घरी फेशियल ऑफर करू शकतात.
ऑफरिंग्ज जोडणे
प्रत्येक ऑफरिंगमध्ये एक शीर्षक, वर्णन आणि फोटोचा समावेश असतो.
- शीर्षक: तुमच्या ऑफरिंगला विशिष्ट, समजण्यास सोप्या भाषेत असतील अशा काही शब्दांत लेबल करा.
- वर्णन: सेवेत काय समाविष्ट आहे त्याचे संक्षिप्त, आकर्षक वर्णन सांगून सुरुवात करा. ऑफर विशेष बनवणारे विशिष्ट साहित्य, टेक्निक्स, उपकरणे किंवा साहित्य हायलाईट करा. तुमची ऑफर नजरेत भरण्यात मदत करण्यासाठी शक्य तितकी अचूक माहिती द्या.
- फोटो: तुम्ही आधीच अपलोड केलेली इमेज निवडा किंवा एक नवीन इमेज जोडा. साध्या बॅकग्राऊंडसह एका तपशिलावर किंवा व्यक्तीवर फोकस करा.
तुम्ही तुमच्या ऑफरिंग्ज तयार केल्यावर, तुम्ही आवश्यकतेनुसार त्यात बदल करू किंवा त्यांचा क्रम बदलू शकता.
होस्ट्स, फोटोज आणि लिस्टिंगचे सर्व तपशील Airbnb सेवांच्या स्टँडर्ड्स आणि आवश्यकतांनुसार असणे आवश्यक आहे.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.