वेळ वाचवण्यासाठी झटपट उत्तरे वापरणे
Airbnb सेवा बुक करणारे बहुतेक गेस्ट्स सर्वप्रथम होस्टना मेसेज पाठवतात. तुम्ही मेसेजेस टॅबमध्ये सामान्य प्रश्नांची उत्तरे देऊ शकता, बुकिंग्जना प्रोत्साहन देऊ शकता आणि झटपट उत्तरे देऊन त्वरित संवाद साधू शकता.
झटपट उत्तर म्हणजे काय?
झटपट उत्तर म्हणजे एक लहान, पूर्व-लिखित मेसेज असतो जो तुमच्या मेसेजिंग सेटिंग्जमध्ये टेम्प्लेट म्हणून सेव्ह केला जातो.
गेस्टच्या नावासारख्या तपशिलांसाठी असलेले प्लेसहोल्डर्स तुमच्या लिस्टिंगमधून किंवा रिझर्व्हेशनमधून डेटा काढून घेऊन प्रत्येक मेसेज पर्सनलाईझ करतात.
तुम्ही तुमची स्वतःची झटपट उत्तरे तयार करू शकता आणि Airbnb ची सेवा होस्ट्ससाठीची टेम्प्लेट्स वापरू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही गेस्ट्सनी बुकिंग करण्यापूर्वी एखाद्या ऑफरिंगबद्दल वारंवार एकसारख्याच प्रश्नांची उत्तरे देत असल्यास, तुमचा स्टँडर्ड प्रतिसाद झटपट उत्तर म्हणून सेव्ह करून पहा.
तुम्ही गेस्ट्सना मेसेज करत असताना झटपट उत्तरे पाठवण्याचा आणि महत्त्वाच्या क्षणी झटपट उत्तरे ऑटोमॅटिक पद्धतीने पाठवली जाण्यासाठी शेड्युल करण्याचा विचार करा.
मी झटपट उत्तर कसे पाठवू?
एखाद्या गेस्टला झटपट उत्तर लगेच पाठवण्यासाठी:
- मेसेजेस टॅबवर जा.
- तुम्हाला ज्या संभाषणाला उत्तर द्यायचे आहे ते निवडा.
- मेसेज लिहाच्या शेजारील अधिक चिन्हावर (+) टॅप करा.
- झटपट उत्तर पाठवा निवडा.
- एक झटपट उत्तर निवडा, जे तुमच्या संभाषणात दिसते.
- मेसेजमध्ये बदल करा किंवा तो जसा आहे तसा पाठवा.
- मेसेज पाठवण्यासाठी बाणावर (↑) टॅप करा.
मेसेजेस टॅबमध्ये सुचवलेली उत्तरेदेखील आहेत, ज्यात गेस्टचा प्रश्न समजून घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो आणि तुमच्या झटपट उत्तरांपैकी एक उत्तर सुचवले जाते. सुचवलेले उत्तर तुमच्या संभाषणात दिसून येते, जिथे फक्त तुम्हीच ते पाहू शकता. तुम्ही झटपट उत्तर पाठवण्यापूर्वी ते बदलू शकता किंवा वेगळा प्रतिसाद लिहू शकता.
मी झटपट उत्तर कसे शेड्युल करू?
सर्व गेस्ट्सना एक झटपट उत्तर ऑटोमॅटिक पद्धतीने पाठवण्यासाठी:
- मेसेजेस टॅबवर जा.
- तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेल्या सेटिंग्ज आयकॉनवर टॅप करा.
- झटपट उत्तरे मॅनेज करा वर टॅप करा
- तुम्हाला शेड्युल करायचे असलेले झटपट उत्तर निवडा आणि पुढील वर टॅप करा.
- या वेळेसाठी शेड्युल करा वर टॅप करा आणि मेसेज गेस्ट्सना कधी मिळावा अशी तुमची इच्छा आहे ते निवडा, जसे की गेस्टनी बुक केल्यानंतर 5 मिनिटांनी किंवा सेवा संपल्यानंतर 2 तासांनी.
जेव्हा शेड्युल केलेले झटपट उत्तर पाठवण्याची वेळ येईल, तेव्हा तुम्हाला गेस्टसोबतच्या तुमच्या संभाषणात रिमाइंडर दिसेल. तुम्ही आधीच शेअर केलेली माहिती रिपीट होत असल्यास तो मेसेज ॲडजस्ट करा किंवा पाठवू नका.
झटपट उत्तरे वापरण्यासाठी टिप्स
झटपट उत्तर संक्षिप्त आणि एकाच विषयाशी संबंधित असते तेव्हा ते उत्तम प्रकारे कार्य करते. यात आणखी गेस्ट्सना कसे जोडायचे हे समजावून सांगणे, विशेष विनंत्या पूर्ण करणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आगाऊ नियोजन करणे समाविष्ट असू शकते.
यासारख्या महत्त्वाच्या क्षणांसाठी झटपट उत्तरे शेड्युल करण्याचा प्रयत्न करा:
बुकिंग कन्फर्मेशन
“हॅलो” म्हणा आणि तुमच्या ऑफरिंग्ज गेस्ट्सच्या गरजेनुसार तयार करण्यात तुम्हाला मदत होईल असे तपशील गोळा करा. उदाहरणार्थ, एखादा फोटोग्राफर हे विचारू शकतो:
- फोटो सेशन कोणत्या विशेष प्रसंगासाठी आहे?
- कोणते शॉट्स कॅप्चर करणे महत्त्वाचे आहे?
जर को-होस्ट सेवा प्रदान करणार असतील, किंवा एखादा सहाय्यक तुमच्यासोबत सामील होणार असेल, तर त्यांचा परिचय नक्की करून द्या आणि त्यांच्या पात्रता शेअर करा.
सेवेपूर्वी
गेस्ट्सना तुमच्या येण्याची वेळ आणि मीटिंग लोकेशनची आठवण करून द्या आणि सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी टिप्स द्या. उदाहरणार्थ, एखादा पर्सनल ट्रेनर आऊटडोअर ॲक्टिव्हिटीज आणि सीझनल हवामानासाठी शिफारस केलेल्या कपड्यांची एक छोटी यादी समाविष्ट करू शकतो.
सेवेनंतर
तुमच्यासोबत बुकिंग केल्याबद्दल गेस्ट्सचे आभार माना. त्यांना सार्वजनिक रिव्ह्यू देण्यास प्रोत्साहित केल्याने इतरांना ही सेवा त्यांच्या गरजा पूर्ण करते की नाही हे ठरवण्यात मदत होऊ शकते. तुम्ही तुमचा एकत्रित वेळ आणखी चांगला कसा बनवू शकला असता याबद्दलच्या विशिष्ट कल्पनांसह अभिप्राय विचारा.
झटपट उत्तरांसह फोटोज किंवा व्हिडिओज पाठवल्यामुळे तुम्हाला स्वतःचा परिचय करून देण्यात, कस्टम ऑफर्स तयार करण्यात आणि गेस्ट्सबरोबर संस्मरणीय क्षण शेअर करण्यात मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, एखादा शेफ सॅम्पल मेनूचा फोटो पाठवू शकतो.
बुकिंग्ज कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही कधीही मेसेजेसमध्ये फाईल्स अटॅच करू शकता. फोटोज PNG किंवा JPG फॉरमॅटमध्ये (50MB पर्यंत) आणि व्हिडिओज MP4 किंवा MOV फॉरमॅटमध्ये (100MB आणि 60 सेकंदांपर्यंत) पाठवा.
युजरचा अनुभव लोकेशननुसार बदलू शकतो. या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

