सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

गेस्ट्सना त्यांच्या अपेक्षांपेक्षा जास्त कसे द्यावे

Airbnb वर तुमची सेवा नजरेत भरावी यासाठी गेस्ट रिव्ह्यूजची मदत घ्या.
Airbnb यांच्याद्वारे 17 सप्टें, 2025 रोजी

टॉप रेटिंग्ज आणि सकारात्मक रिव्ह्यूजमुळे अधिक बुकिंग्ज मिळू शकतात आणि जास्त कमाई होऊ शकते. गेस्ट्सच्या फीडबॅकचा उपयोग तुमच्या सेवेत सतत सुधारणा करण्यासाठी करा.

इन्साईट्स विभागात तुमचे एकूण रेटिंग, सार्वजनिक रिव्ह्यूज, गेस्ट्सच्या नोट्स आणि आदरातिथ्य, लोकेशन (लागू असेल तेव्हा), विश्वासार्हता आणि किमतीसाठी योग्य मूल्य याबद्दल तपशीलवार रेटिंग्ज दाखवल्या जातात.

आदरातिथ्य

गेस्ट्सना आपली काळजी घेतली जाते आहे आणि आपलेपणाने स्वागत केले जाते आहे याबद्दल मनापासून आनंद होतो. उच्च-गुणवत्तेची ऑफरिंग डिलिव्हर करण्यासाठी आणि त्यांच्या गरजा आधीच ओळखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा.

  • बुकिंगचे कन्फर्मेशन होताच संपर्क साधा. गेस्ट्सना त्यांच्या आवडीनिवडी विचारणारा मेसेज पाठवा जेणेकरून तुम्ही सेवा पर्सनलाईज करू शकाल. एखादा केटरर इव्हेंटचा प्रकार आणि फूड ॲलर्जी किंवा आहारातील निर्बंधांबद्दल विचारू शकतो.
  • आवश्यक तपशील शेअर करा. सेवा तुम्ही देणार आहात की तुमचे को-होस्ट, यासह सेवेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती गेस्ट्सना सेवेच्या आधीच देण्यात आली आहे याची खात्री करा. एखादा फोटोग्राफर आगामी फोटोशूटची तपशीलवार माहिती आणि कपड्यांबाबत काही सूचनासुद्धा देऊ शकतो.
  • गेस्ट्सचा दृष्टिकोन लक्षात घ्या. काही गेस्ट्स तुमच्या शहरात किंवा देशात नवीन असू शकतात. त्यांना त्या भागातील जागा शोधण्यासाठी किंवा स्थानिक रीतीरिवाज समजून घेण्यासाठी अतिरिक्त मदतीची आवश्यकता असू शकते. आपलेपणाने मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवा आणि आदरयुक्त राहून संवाद साधा.
  • अतिरिक्त सामान आणून ठेवा. तुम्ही संभाव्य समस्यांसाठी तयार आहात याची खात्री करा, जसे की अवजारे किंवा उपकरणे तुटल्यास किंवा गेस्ट एखादा महत्त्वाचा आयटम आणायचे विसरून गेल्यास. एखादा पर्सनल ट्रेनर सोबत अतिरिक्त योगा मॅट्स आणू शकतो.
  • नंतर पाठपुरावा करा. गेस्ट्सना धन्यवाद देण्यासाठी आणि पुढील कोणत्याही पायऱ्या पूर्ण करण्यासाठी मेसेज पाठवा. जसे की फोटोग्राफ्स कधी उपलब्ध होतील याची तारीख किंवा गेस्ट्सना विशेष आवडलेल्या एखाद्या पदार्थाची रेसिपी.

लोकेशन

तुम्ही तुमच्या बिझनेसच्या जागी किंवा सार्वजनिक ठिकाणी सेवा देत असल्यास, गेस्ट्सना लोकेशनसाठीसुद्धा रेटिंग देण्यास सांगितले जाते. एखादे एस्थेटिशियन त्यांच्या स्पामध्ये फेशियल ट्रीटमेंट देऊ शकतात किंवा फोटोग्राफर पार्कमध्ये सेशन ऑफर करू शकतात. गेस्ट्सना स्वच्छ आणि सुसज्ज असलेल्या स्वागतशील जागा खूप आवडतात.

  • गेस्ट्सना आराम मिळेल यावर लक्ष द्या. सुरक्षित आणि स्वच्छ जागा दिल्यास गेस्ट्सना सेवेचा आनंद घेण्यात मदत होते. मसाज थेरपिस्ट असल्यास त्यांना चकचकीत स्पामध्ये त्यांची सेवा द्यायला आवडेल जेणेकरून त्यांचे गेस्ट डीप-टिश्यू ट्रीटमेंट चालू असताना आरामात विसावू शकतील.
  • दिशानिर्देश पाठवा. गेस्ट्सनी तुमच्या लोकेशनबाबत काय अपेक्षा ठेवावी आणि तुम्ही त्यांना कुठे भेटाल याबद्दल स्पष्ट माहिती द्या. पार्किंग आणि सार्वजनिक वाहतुकीच्या संभाव्य समस्यांचा विचार करा. तुम्ही शेअर केलेल्या जागेत असल्यास चेक इन करण्याच्या सूचना समाविष्ट करा. ॲक्सेसिबिलिटीचे मुद्देसुद्धा लक्षात ठेवा. उदाहरणार्थ, तुमच्या फोटो सेशनचे लोकेशन व्हीलचेअरने ॲक्सेस करण्यायोग्य आहे का? 

तुम्ही गेस्ट्सच्या लोकेशनवर गेल्यास त्यांना त्या जागेबद्दल फीडबॅक देण्यास सांगितले जाणार नाही.

विश्वासार्हता

गेस्ट्सची अशी अपेक्षा असते की त्यांच्या होस्टने त्यांना एक सुरळीतपणे पार पडणारी सेवा द्यावी. याचा अर्थ असा की गेस्ट्ससाठी स्पष्ट अपेक्षा सेट केल्या पाहिजेत, कम्युनिकेशन वेळेवर आणि स्पष्ट ठेवले पाहिजे आणि सुव्यवस्थित आयोजन केले पाहिजे.

  • अचूकतेला प्राधान्य द्या. गेस्ट्सना जे मिळणार आहे तेच तुमच्या फोटोज आणि वर्णनातून अचूकतेने सांगितले जात आहे याची खात्री करा. एखादे हेअर स्टायलिस्ट ते वापरत असलेल्या प्रॉडक्ट्सचे आणि टेक्निक्सचे वर्णन करू शकतात आणि ते देत असलेल्या अपडूज आणि वेण्यांच्या प्रकारांचे फोटोज समाविष्ट करू शकतात.
  • वेळेवर प्रतिसाद द्या. तुम्ही कधी उपलब्ध असता ते स्पष्ट करण्यासाठी लिस्टिंग टॅबमध्ये तुमचे नियमित तास सेट करा. Airbnb ॲपमध्ये आणि तुमच्या डिव्हाईसच्या सेटिंग्जमध्ये नोटिफिकेशन्स चालू करा जेणेकरून तुम्ही गेस्ट्सचे मेसेजेस त्वरित पाहू शकाल आणि पटकन प्रतिसाद देऊ शकाल.
  • आधीपासून नियोजन करा. तुमची सेवा शेड्युलनुसार राहील याची खात्री करण्यासाठी कोणतीही साधनसामग्री आधीपासून तयार ठेवा. एखादा शेफ तो गेस्टच्या जागी जाऊन जे सूप बनवणार आहे त्यासाठीच्या भाज्या वेळेआधीच चिरून घेऊ शकतो.
  • तुम्हाला आवश्यक असलेला कोणताही सपोर्ट घेऊन या. तुम्ही एखादा मोठा ग्रुप होस्ट करत असल्यास किंवा अधिक गुंतागुंतीची सेवा ऑफर करत असल्यास तुम्ही एखादा सहाय्यक सोबत आणू शकता. तुमच्या सेवेदरम्यान तुमच्यासोबत कोण असणार आहे हे तुम्ही गेस्ट्सना इतक्या आधी सांगणे आवश्यक आहे की त्यांना हवे असल्यास विनाशुल्क कॅन्सल करता आले पाहिजे.
  • वेळेवर पोहोचा. तुम्ही गेस्टच्या लोकेशनवर जात असल्यास तुमचा मार्ग विचारपूर्वक ठरवा आणि ट्रॅफिकबाबत विचार करून ठेवा.
  • प्रॉपर्टीचा सन्मान करा. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या घरी सेवा देत असाल तर तुम्हाला ती जागा जितक्या चांगल्या स्थितीत मिळाली होती तशाच स्थितीत ती तुम्ही जातानाही असेल याची खात्री करा.

किमतीसाठी योग्य

किमतीच्या मोबदल्यात विशेष गुणवत्ता मिळेल अशा सेवा गेस्ट्स शोधत असतात. तुमच्या ऑफरिंग्ज आणखी खास आणि गेस्ट्सनी दिलेल्या किमतींसाठी योग्य कशा बनवायच्या यावर विचार करा.

  • वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय समाविष्ट करा. गेस्ट्सना अधिक पर्याय मिळावेत आणि तुमची कमाईची उद्दिष्टे पूर्ण व्हावीत यासाठी वेगवेगळ्या किमतींच्या कमीत कमी 3 ऑफरिंग्ज जोडा. बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम अशा तीन किमतींवर ऑफरिंग्ज सेट करणे सर्वोत्तम असते. उदाहरणार्थ, अमेरिकेतील एखादा फोटोग्राफर $50 USD पेक्षा कमी किमतीचे अर्ध्या तासाचे सेशन, $50 USD ते $150 USD दरम्यानच्या किमतीचे पर्सनलाईज्ड पोर्ट्रेट सेशन आणि $150 USD पेक्षा जास्त किमतीचे फॅमिली सेशन ऑफर करू शकतात.
  • तुमच्या ऑफरिंग्ज कस्टमाईझ करा. Airbnb मेसेजिंग टूल्सच्या मदतीने तुम्ही गेस्ट्सशी कम्युनिकेट करून तुमच्या ऑफरिंग्ज पर्सनलाईज करू शकता आणि कस्टम भाडी सेट करू शकता.
  • उत्कृष्ट सेवा द्या. उच्च-गुणवत्तेची सामग्री वापरणे आणि तुमच्या ऑफरिंगला आणखी खास बनवणाऱ्या अतिरिक्त गोष्टी करणे खूप फायद्याचे ठरू शकते. एखादे एस्थेटिशियन त्यांच्या ऑफरिंगमध्ये विनामूल्य एखादे सुगंधित तेल समाविष्ट करू शकतात.

होस्ट्स, फोटोज आणि लिस्टिंगचे सर्व तपशील Airbnb सेवांच्या स्टँडर्ड्स आणि आवश्यकतांनुसार असणे आवश्यक आहे.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
17 सप्टें, 2025
हे उपयुक्त ठरले का?