सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

अधिक गेस्ट्सना आकर्षित करण्याचे 3 मार्ग

तुमची उपलब्धता, किमती आणि सेवेच्या क्षेत्राचा आढावा घ्या.
Airbnb यांच्याद्वारे 22 सप्टें, 2025 रोजी

अधिक लवचिकता ऑफर केल्याने तुमची लिस्टिंग अधिक सर्च रिझल्ट्समध्ये दिसण्यात मदत होते. तुमच्या सेवेच्या क्षेत्राचा विस्तार करून आणि विविध किमती आणि बिझनेसचे तास देऊन जास्तीत जास्त गेस्ट्सना आकर्षित करा.

तुमची उपलब्धता मॅनेज करणे

तुम्ही होस्ट करू शकता त्या सर्व वेळा जोडण्याची खात्री करा. तुमची उपलब्धता बदलत असताना, बिझनेसचे तास जोडा आणि उपलब्धता विंडो निवडा. गेस्ट्स फक्त त्या सेवा शोधू शकतात ज्यांच्यात या दोन्ही गोष्टी आहेत.

लिस्टिंग्ज टॅबमध्ये:

  • बिझनेसचे तास सेट करा. तुमचे बिझनेसचे तास म्हणजे त्या वेळा जेव्हा गेस्ट्स तुम्ही उपलब्ध असल्याचे पाहू शकतात आणि तुमची सेवा बुक करू शकतात. तुम्ही प्रत्येक ऑफरिंगसाठी तेच तास जोडू शकता किंवा प्रत्येक ऑफरिंगसाठी वेगवेगळे तास जोडू शकता. सर्वाधिक मागणीच्या वेळा विचारात घ्या—उदाहरणार्थ, पर्सनल ट्रेनर्ससाठी सर्वात लोकप्रिय वेळा सकाळी आणि प्रायव्हेट शेफ्ससाठी संध्याकाळी असू शकतात.
  • उपलब्धता विंडो एन्टर करा. गेस्ट्स 3, 6, 9, 12 किंवा 24 महिने आधी बुक करू शकतात का ते निवडा. तुम्ही प्रत्येक ऑफरिंगसाठी हे बदलू शकता.

तुमच्या कॅलेंडरमध्ये:

  • तुमच्या उपलब्धतेमध्ये आणखी सुधारणा करा. तुम्ही तुमच्या बिझनेसच्या नियमित तासांच्या बाहेरचे तास जोडू शकता आणि तुम्ही काम करू शकणार नाही अशा वेळा ब्लॉक करू शकता. कोणत्याही ब्लॉक केलेल्या वेळा सर्व ऑफरिंग्जवर लागू होतात.
  • कॅलेंडर्स सिंक करा. तुमची Airbnb आणि Google कॅलेंडर्स कनेक्ट करा. तुमच्या Google कॅलेंडरवरील सर्व इव्हेंट्स तुमच्या Airbnb कॅलेंडरवरील त्या त्या वेळा ब्लॉक करतील.

हे करून झाल्यावर, तुमची उपलब्धता व्हेरिफाय करण्यासाठी आणि गेस्ट्सना काय दिसेल ते पाहण्यासाठी तुमच्या लिस्टिंगचा प्रिव्ह्यू पहा.

तुमचे बिझनेसचे तास आणि उपलब्धता विंडो बदलण्यासाठी लिस्टिंग्ज टॅबवर जा.

स्पर्धात्मक किंमत ठेवणे

स्पर्धात्मक राहण्यासाठी आणि अधिक गेस्ट्सना आकर्षित करण्यासाठी बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम किमतींच्या किमान 3 ऑफरिंग्ज देणे ही चांगली कल्पना आहे. विविध किमतींमुळे जास्त कमाई होऊ शकते आणि अधिक रिव्ह्यूज मिळू शकतात. उदाहरणार्थ, गेस्ट्सची सामान्यतः 3-कोर्स मीलसाठी $52 ते $95 USD, स्पा ट्रीटमेंटसाठी $54 ते $96 USD किंवा फोटोशूटसाठी $46 ते $75 USD देण्याची तयारी असते.*

  • बेसिक ऑफरिंग समाविष्ट करा. गेस्ट्सना तुमची सर्वात स्वस्त ऑफरिंग सर्च रिझल्ट्समध्ये दिसते. बेसिक ऑफरिंगमुळे नवीन गेस्ट्सना आकर्षित करण्यात आणि तुमच्या इतर ऑफरिंग्जमध्ये स्वारस्य निर्माण होण्यात मदत होऊ शकते.
  • कस्टम ऑफर्स प्रदान करा. गेस्टने बुकिंग करण्यापूर्वी मेसेजेस टॅबमध्ये पेमेंटच्या विनंतीसह कस्टम ऑफर्स पाठवा. उदाहरणार्थ, तुम्ही पर्सनल ट्रेनिंग ऑफर करत असल्यास, एखादे गेस्ट विचारू शकतात की तुम्ही सकाळी लवकर वर्कआऊट सेशन घेऊ शकता का किंवा तुमच्या सेवा क्षेत्राच्या पलीकडे प्रवास करू शकता का.
  • बदलांसह पर्सनलाईज करा. गेस्टनी बुक केल्यानंतर तुम्ही मेसेजेस टॅबमध्ये किमतीत बदलदेखील पाठवू शकता. उदाहरणार्थ, गेस्टना त्यांच्या मॅनिक्युअरमध्ये फ्रेंच टिप्स किंवा त्यांच्या मीलमध्ये एखादा विशिष्ट घटक जोडून त्यांची ऑफरिंग कस्टमाईझ करायची असू शकते.
  • किमान किंमत जोडा. तुम्ही प्रति गेस्ट किंमत आकारण्याचे ठरवले असल्यास, तुम्ही प्रति बुकिंग किमान किंमत सेट करू शकता. सारखे ग्रुप्स असलेल्या सेवांसाठी हे उपयुक्त ठरू शकते, जसे की केटरिंग किंवा तयार मील्स. उदाहरणार्थ, जर एखाद्या गेस्टना 2 गेस्ट्ससाठी $50 USD ची ऑफरिंग बुक करायची असेल आणि तुमची किमान किंमत $120 USD असेल, तर त्यांना बुक करण्यासाठी $120 USD द्यावे लागतील.
  • डील्स ऑफर करा. गेस्ट्सना बुकिंग करण्यासाठी आकर्षित करण्याकरता तुम्ही मर्यादित काळासाठी, अर्ली बर्ड आणि मोठ्या ग्रुपसाठी सवलती जोडू शकता. तुम्ही सवलत लागू करता तेव्हा, गेस्ट्सना सर्चमध्ये आणि तुमच्या लिस्टिंगमध्ये तुमचे मूळ भाडे स्ट्राईकथ्रूसह दिसेल.
गेस्टच्या विशेष विनंत्या असल्यास तुम्ही कस्टम ऑफर तयार करणे निवडू शकता.

तुमच्या सेवेच्या क्षेत्राचा विस्तार करणे

तुम्ही गेस्ट्सकडे प्रवास कराल की गेस्ट्स तुमच्याकडे येतील किंवा दोन्ही, हे पुन्हा तपासा. गेस्ट्स तुमच्याकडे येणार असल्यास, हे लक्षात ठेवा की ते तुमच्या लोकेशनच्या जवळपासच्या सेवा शोधत असतील तरच तुम्ही त्यांना दिसाल.

तुम्ही गेस्ट्सकडे प्रवास करणार असल्यास:

  • तुमच्या सेवेच्या क्षेत्राचा विचार करा. अधिक सर्च रिझल्ट्समध्ये दिसण्यासाठी, तुम्ही तुमच्या सेवा क्षेत्रामध्ये शक्य तितकी सर्व शहरे, आसपासचे परिसर किंवा पोस्टल कोड्स जोडले असल्याची खात्री करा.
  • कोणतीही लवचिकता लक्षात घ्या. तुमच्या लिस्टिंगच्या वर्णनात, तुम्ही अधूनमधून प्रवास करण्यास तयार असलेली क्षेत्रे किंवा गेस्ट्स तुमच्या सेवेच्या क्षेत्राबाहेर असल्यास तुमच्याशी संपर्क साधू शकतात, हे नमूद करू शकता.

गेस्ट्स तुमच्याकडे येणार असल्यास:

  • तुमचा पत्ता व्हेरिफाय करा. तुमची लिस्टिंग पाहणाऱ्या गेस्ट्सना तुमच्या लोकेशनपर्यंतचे अंतर आणि प्रवासासाठी लागणारा वेळ दिसेल.
  • तुमच्या बिझनेसचे नाव समाविष्ट करा. यामुळे गेस्ट्स आल्यावर त्यांना तुम्हाला शोधण्यात मदत होईल.
  • व्यावसायिक फोटोज जोडा. तुम्ही स्पा, जिम, सलूनमध्ये होस्ट करत असा किंवा इतरत्र होस्ट करत असा, तुमच्या लोकेशनचे फोटोज तुमच्या सेवेची गुणवत्ता दाखवतात आणि गेस्ट्सना तुम्हाला शोधण्यात मदत करतात.

*अमेरिकेतील 700 हून अधिक Airbnb गेस्ट्स आणि संभाव्य प्रथम बुकर्सच्या मार्च 2025 मधील ऑनलाईन सर्वेक्षणाच्या आधारे.

युजरचा अनुभव लोकेशननुसार बदलू शकतो. या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
22 सप्टें, 2025
हे उपयुक्त ठरले का?