तुम्हाला होस्टिंगसाठी पेमेंट कसे मिळते
नवीन होस्ट्स अनेकदा विचारतात, "मला पैसे कसे मिळतील?" Airbnb ने पेमेंट मिळवणे, ज्याला आम्ही पेआऊट्स म्हणतो, फक्त काही पायऱ्यांचे काम करून सोपे केले आहे.
तुम्हाला पेमेंट कसे मिळेल
तुम्हाला होस्टिंगचे पैसे कसे मिळवायचे आहेत ते निवडा. पेआऊटच्या पद्धतींमध्ये Fast Pay, बँक ट्रांसफर, PayPal, Payoneer डेबिट कार्ड आणि Western Union यांसह आणखीही सामील आहेत. तुम्ही कुठे आहात यावर अवलंबून पर्याय बदलतात.
हे सेट अप करण्यासाठी, तुमच्या अकाऊंटच्या "पेमेंट आणि पेआऊट" सेक्शनमध्ये एक पेआऊटची पद्धत निवडा. तुम्ही निवडलेली पद्धत तुम्ही त्यात बदल करेपर्यंत सर्व भावी पेआऊट्सवर लागू होईल.
तुम्हाला तुमची करदात्याची माहिती देखील द्यावी लागेल, म्हणजे आम्ही तुम्हाला करासंबंधी योग्य कागदपत्रे देऊ शकू. तुमच्यावर हे लागू होते याची खात्री नाही? Airbnb कडून कर फॉर्म मिळवण्याबद्दल आणखी माहिती घ्या.
तुमचे पैसे तुम्हाला मिळताहेत याची खात्री करण्यासाठी तुमची पेआऊट पद्धत व्हेरिफाय केली जाईल. व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेसाठी दोन ते 10 दिवस लागू शकतात—फक्त Fast Pay चे व्हेरिफिकेशन लगेच होते.
तुम्हाला किती पेमेंट मिळेल
गेस्टने किती पैसे दिले आणि त्या वास्तव्यासाठी तुम्ही किती कमाई केली हे पाहण्यासाठी तुमच्या कॅलेंडरवर कोणतेही रिझर्व्हेशन निवडा. आयटमाईज्ड लिस्टिंगसाठीच्या बुकिंग तपशीलांच्या खाली स्क्रोल करा ज्यात हे समाविष्ट आहे:
- गेस्टच्या वास्तव्यासाठी तुमचे प्रति रात्र भाडे
- तुम्ही स्वच्छता, पाळीव प्राणी किंवा अतिरिक्त गेस्ट्ससाठी आकारत असलेले कोणतेही ऐच्छिक शुल्क
- ऑक्युपन्सी कर
- गेस्ट आणि होस्ट सेवा शुल्क
- तुम्ही एक सेट अप केले असल्यास, को-होस्टचे पेआऊट
- तुमचे एकूण पेआऊट
बहुतेक होस्ट्स 3% होस्ट सेवा शुल्क देतात. हे शुल्क Airbnb ला तुमची जागा शेअर करण्यात मदत करणाऱ्या प्रोडक्ट्स आणि सेवांचा खर्च भरून काढण्यात मदत करते, जसे की 24/7 ग्राहक सपोर्ट. सेवा शुल्काबद्दल अधिक जाणून घ्या
जर तुमचा पेआऊट तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असेल, तर हे तुम्ही जोडलेल्या सवलतीमुळे किंवा रिझर्व्हेशन कॅन्सलेशनमुळे किंवा बदलल्यामुळे असू शकते. काही पेआऊट पद्धतींवर ट्रान्झॅक्शन शुल्क देखील लागू होऊ शकते, तसे तर अनेक पद्धतींसाठी अतिरिक्त शुल्क नसते.
तुम्हाला पेआऊट कधी मिळेल
तुमची होस्टिंगची कमाई साधारणपणे तुमच्या गेस्टच्या चेक इनच्या शेड्यूल केलेल्या वेळेच्या 24 तासांनंतर रिलीझ केली जाते. तुमच्या खात्यात पैसे नेमके केव्हा येतील हे तुम्ही निवडलेल्या पेआऊट पद्धतीवर अवलंबून असते.
उपलब्ध असलेल्या पेआऊट पद्धती आणि त्यांच्या सामान्य डिलिव्हरी वेळांमध्ये हे समाविष्ट आहे:
- Fast Pay: 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी
- Payoneer: 24 तास किंवा त्यापेक्षा कमी
- PayPal: कामकाजाचा 1 दिवस
- Western Union: कामकाजाचा 1 दिवस (देश/प्रदेशानुसार बदलू शकतो)
- बँक ट्रान्सफर: कामकाजाचे 3 ते 5 दिवस
- आंतरराष्ट्रीय वायर ट्रान्सफर: कामकाजाचे 3 ते 7 दिवस
तुमची होस्टिंगची कमाई साधारणपणे तुमच्या गेस्टच्या चेक इनच्या शेड्यूल केलेल्या वेळेच्या 24 तासांनंतर रिलीझ केली जाते. तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे नेमके केव्हा येतील हे तुम्ही निवडलेल्या पेआऊट पद्धतीवर अवलंबून असते.
पेआऊट पद्धती (जिथे उपलब्ध असतील तिथे) आणि डिलिव्हरीच्या सामान्य वेळा याप्रमाणे आहेत:
- Fast Pay: 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी
- Payoneer: 24 तास किंवा त्यापेक्षा कमी
- PayPal: 1 बिझनेस दिवस
- Western Union 1 बिझनेस दिवस (देश/ प्रदेशानुसार बदलू शकतो)
- बँक ट्रांसफर: 3 -5 बिझनेस दिवस
- आंतरराष्ट्रीय वायर ट्रांसफर: 3-7 बिझनेस दिवस
जेव्हा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी होस्टिंग करता (28 किंवा त्यापेक्षा जास्त रात्री), तेव्हा Airbnb तुमची कमाई मासिक हप्त्यांमध्ये तुम्हाला देते, याची सुरुवात तुमचे गेस्ट आल्यानंतर 24 तासांत होते. तुम्ही तुमच्या व्यवहारांचा इतिहासामध्ये तुमचे पेआऊट्स तपासू शकता.