सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

तुम्हाला स्वच्छता शुल्काबद्दल माहित असणे आवश्यक असे सर्व काही

स्वच्छता शुल्क जोडण्यापूर्वी तुमच्या खर्चांचा आणि बुकिंग मिळण्याच्या क्षमतेचा विचार करा.
Airbnb यांच्याद्वारे 1 डिसें, 2025 रोजी

स्वच्छता शुल्क जोडायचे की नाही हे ठरवणे तुमच्या भाड्याच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. काही होस्ट्सना साफसफाईचा खर्च वसूल करण्याचा हा एक उपयुक्त मार्ग वाटतो. परंतु हे शुल्क खूप जास्त असल्यास, ते गेस्ट्सना तुमचे घर बुक करण्यापासून परावृत्त करू शकते—आणि तुमची कमाई कमी करू शकते.

तुम्ही स्वच्छतेचा खर्च आणि बुकिंग मिळण्याच्या क्षमतेचा विचार करता तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवा.

गेस्ट्सना आकर्षित करण्यावर फोकस करा

गेस्ट्स आम्हाला सांगतात की, ते स्वच्छ जागा आणि वाजवी भाडे यांना सर्वात जास्त महत्व देतात. स्वच्छतेचा अभाव हे गेस्ट्सनी 5 पेक्षा कमी स्टार्स देण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. आमच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, जर तुमच्या लिस्टिंगमध्ये स्वच्छता शुल्क असेल, तर गेस्ट्स उच्च दर्जाच्या स्वच्छतेची अपेक्षा ठेवतील आणि त्यामुळे वास्तव्याचा रिव्ह्यू देताना ते अधिक बारकाईने विश्लेषण करतील.

तुम्ही स्वच्छता शुल्क जोडायचे ठरवल्यास, वास्तव्याचे एकूण भाडे वाढते आणि चेक आऊट करताना स्वतंत्र शुल्क म्हणून ते गेस्ट्सना दिसून येते. उच्च स्वच्छता शुल्कामुळे ते तुमच्याकडे बुकिंग करण्याचा पुनर्विचार करू शकतात. गेस्ट्सना एकूण भाडे दाखवा हे वैशिष्ट्य चालू करण्याचा पर्याय देखील आहे, ज्यामुळे ते सर्च रिझल्ट्समध्ये सर्व शुल्कांसह लिस्टिंग्जचा एकूण खर्च बघू शकतात.

तुमचे भाडे स्पर्धात्मक ठेवणे तुमची लिस्टिंग नजरेत भरण्यास मदत करू शकते आणि सर्च रिझल्ट्समध्ये देखील उच्च रँकिंग मिळवू शकते. Airbnb चा अल्गोरिदम जवळपासच्या मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जच्या तुलनेत एकूण भाडे आणि लिस्टिंगची गुणवत्ता यांना प्राधान्य देते.

तुम्ही तुमच्या कॅलेंडरमधील प्राईसिंग टूल्स वापरून वेगवेगळ्या तारखा आणि ट्रिप्सच्या प्रकारांसाठी एकूण भाडे पाहू शकता आणि त्याची जवळपासच्या मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जशी तुलना करू शकता.

तुमचे भाडे स्पर्धात्मक ठेवा

तुम्हाला तुमच्यासाठी योग्य अशी साफसफाईची व्यवस्था सापडल्यावर, तुमच्या खर्चाची बेरीज करा आणि साफसफाईचे अचूक बजेट सेट करा. खर्चाचे मूल्यांकन करताना हे काही सल्ले विचारात घ्या:

  • दरांची तुलना करा. तुम्ही व्यावसायिक हाऊसकीपरची नेमणूक करत असल्यास, सर्वोत्तम दर मिळवण्यासाठी इतर कंपन्यांच्या तुलनेत त्यांच्या शुल्काचा आढावा घ्या आणि तरीही वाजवी वेतन द्या.
  • तुमच्या क्लिनर्सशी वाटाघाटी करा. तुमच्या हाऊसकीपरला विचारा की अधिक सातत्याने काम मिळणार असल्यास ते कमी पैशात काम करतील का. “कमी गर्दीच्या सीझनमध्ये आमच्याकडे फक्त एक किंवा दोन बुकिंग्ज असल्या तरीही, आम्ही मासिक उत्पन्नाची हमी दिली”, एक होस्ट लोर्ना म्हणतात. “त्याची भरपाई करण्यासाठी, आम्ही व्यस्त सीझनमध्ये थोडे कमी पैसे दिले.”
  • स्टॉक करून ठेवा. तुम्ही वारंवार वापरत असलेल्या स्वच्छतेच्या वस्तूंचा विचार करा. या वस्तू मोठ्या प्रमाणात ऑर्डर केल्यास दीर्घ कालावधीत ते स्वस्त पडते.

तुम्ही तुमचा स्वच्छतेचा खर्च कसा कव्हर कराल आणि तुमच्या घराचे भाडे स्पर्धात्मक कसे ठेवाल ते ठरवा. याचा विचार करा:

  • संभाव्य कर कपातींचा शोध घेणे. जेव्हा तुम्ही तुमचा आयकर भरता तेव्हा तुम्ही स्वच्छतेच्या खर्चासह काही होस्टिंगच्या खर्चांसाठी माफी मिळवू शकता. एखादे कर व्यावसायिक अधिक तपशील किंवा मदत देऊ शकतील.
  • तुमच्या प्रति रात्र भाड्यामधे खर्च समाविष्ट करणे. तुमच्या इतर ऑपरेटिंग खर्चासह स्वच्छतेचे साहित्य, लाँड्री सेवा आणि हाऊसकीपिंगसाठी तुम्ही किती खर्च करता याचा हिशोब करा. तुम्हाला तुमचे प्रति रात्र भाडे सेट करण्यात मदत करण्यासाठी हे एक व्यापक दृष्टीकोन देईल.
  • स्वच्छता शुल्क जोडणे. अतिरिक्त पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून नव्हे, तर स्वच्छतेचे साहित्य किंवा व्यावसायिक हाऊसकीपिंगच्या सेवेसाठी पैसे देण्यासाठी याचा वापर करा.

वाजवी स्वच्छता शुल्क सेट करा

तुम्ही स्वच्छता शुल्क जोडायचे ठरवल्यास, तुमच्याकडे काही पर्याय आहेत:

  • सामान्य शुल्क सेट करा. गेस्ट्सच्या वास्तव्याचा कालावधी काहीही असला तरी, सर्व गेस्ट्ससाठी एक स्वच्छता शुल्क जोडा. दीर्घकालीन वास्तव्ये देणाऱ्या होस्ट्ससाठी हे एक चांगले धोरण असू शकते.
  • तुमच्या स्वच्छता शुल्कामध्ये बदल करा. कमी स्वच्छता शुल्क सेट करून, फक्त एक किंवा दोन रात्रींसाठी अल्पकालीन वास्तव्याचे बुकिंग करणार्‍या गेस्ट्सना आकर्षित करा. इतर सर्व वास्तव्यांसाठी तुम्ही तुमचे सामान्य स्वच्छता शुल्क ठेवू शकता.

तुम्ही होस्टिंग नव्याने सुरू केले असल्यास, बुकिंग्ज आकर्षित करण्यासाठी तुम्हाला काही उत्कृष्ट रिव्ह्यूज मिळेपर्यंत स्वच्छता शुल्क न जोडण्याचा विचार करा.

तुमच्या स्वच्छता शुल्कातून सहसा लिस्टिंगच्या हाऊसकीपिंगचा खर्च कव्हर होतो जे तुम्हाला गेस्ट्सना होस्ट केल्यानंतर करावे लागते. गेस्ट्सनी पाडलेले डाग किंवा धूम्रपानाचा वास काढून टाकणे यांसारख्या काही विशिष्ट प्रकारच्या अनपेक्षित साफसफाईसाठी, तुम्ही होस्ट्ससाठी AirCover चा एक भाग असलेल्या होस्ट नुकसान संरक्षण अंतर्गत $30 लाख USD पर्यंतच्या भरपाईसाठी तुम्ही पात्र ठरू शकता.

होस्ट्ससाठी AirCover’ होस्ट नुकसान संरक्षण, होस्ट दायित्व विमा, आणि अनुभव आणि सेवा दायित्व विमा याद्वारे मिळणारे संरक्षण जपानमध्ये घरे किंवा अनुभव ऑफर करणाऱ्या होस्ट्सना लागू होत नाही, जेथे जपान होस्ट विमा आणि जपान अनुभव संरक्षण विमा लागू आहे किंवा Airbnb Travel LLC द्वारे वास्तव्ये ऑफर करणाऱ्या होस्ट्सनाही लागू होत नाही. कृपया लक्षात घ्या की सर्व कव्हरेज मर्यादा USD मध्ये दाखवल्या आहेत.

होस्ट दायित्व विमा आणि अनुभव आणि सेवा दायित्व विमा थर्ड-पार्टी विमा कंपन्यांद्वारे दिले जातात.

तुम्ही युकेमध्ये घरे, अनुभव किंवा सेवा होस्ट करत असल्यास, होस्ट दायित्व तसेच अनुभव आणि सेवा दायित्व विमा पॉलिसीज Zurich Insurance Company Ltd. द्वारे अंडरराईट केल्या जातात आणि त्यांची व्यवस्था आणि पूर्तता युकेमधील होस्ट्सना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय Airbnb UK Services Limited द्वारे करण्यात येते, जी Financial Conduct Authority द्वारे अधिकृत आणि विनियमित Aon UK Limited ची नियुक्त प्रतिनिधी आहे. Aon चा FCA रजिस्टर नंबर 310451 आहे. तुम्ही फायनान्शियल सर्व्हिसेस रजिस्टरला भेट देऊन किंवा FCA शी 0 800 111 6768 वर संपर्क साधून हे तपासू शकता. होस्ट्ससाठी AirCover मधील होस्ट दायित्व तसेच अनुभव आणि सेवा दायित्व पॉलिसीजचे नियमन Financial Conduct Authority द्वारे केले जाते; उर्वरित उत्पादने आणि सेवा Airbnb UK Services Limited, FPAFF405LC द्वारे व्यवस्थापित केलेली अनियंत्रित उत्पादने आहेत. तपशील आणि अपवाद पहा.

तुम्ही युरोपियन इकॉनॉमिक एरिया (EEA) मध्ये घरे, अनुभव किंवा सेवा होस्ट करत असल्यास, होस्ट दायित्व आणि अनुभव आणि सेवा दायित्व विमा पॉलिसीज Zurich Insurance Europe AG च्या स्पेन ब्रँचद्वारे अंडरराईट केल्या जातात आणि EEA मधील होस्ट्सच्या फायद्यासाठी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय Airbnb Spain Insurance Agency S.L.U. (ASIASL) द्वारे त्याची व्यवस्था आणि पूर्तता केली जाते, जी Directorate General for Insurance Pension and Funds (DGSFP) द्वारे पर्यवेक्षित आणि स्पेनमध्ये DGSFP च्या विमा वितरकांच्या रजिस्ट्रीमध्ये AJ0364 या क्रमांकासह रजिस्टर्ड असलेली एक कोणाशीही संलग्न नसलेली विमा एजन्सी आहे. तुम्ही DGSFP विमा वितरक रजिस्टरला भेट देऊन हे रजिस्ट्रेशन व्हेरिफाय करू शकता आणि तुम्ही येथे ASIASL चे संपूर्ण तपशील ॲक्सेस करू शकता.

होस्ट नुकसान संरक्षण हा विमा नाही आणि तो होस्ट दायित्व विम्याशी संबंधित नाही. होस्ट नुकसान संरक्षणाद्वारे, गेस्ट्सकडून तुमच्या घराला आणि सामानाला झालेल्या काही प्रकारची नुकसानभरपाई तुम्हाला केली जाते, जर गेस्ट्सने ती नुकसानभरपाई केली नाही तर. वॉशिंग्टन स्टेटमधील लिस्टिंग्जसाठी, होस्ट नुकसान संरक्षणांतर्गत असलेल्या Airbnb च्या कराराच्या जबाबदाऱ्या, Airbnb ने खरेदी केलेल्या विमा पॉलिसीद्वारे कव्हर केल्या जातात. ज्या होस्ट्सचा रहिवासाचा किंवा आस्थापनाचा देश ऑस्ट्रेलिया नाही त्यांच्यासाठी, या होस्ट नुकसान संरक्षणाच्या अटी लागू होतात. ज्या होस्ट्सचा रहिवासाचा किंवा आस्थापनाचा देश ऑस्ट्रेलिया आहे त्यांच्यासाठी, होस्ट नुकसान संरक्षण हे ऑस्ट्रेलियन युजर्ससाठी असलेल्या होस्ट नुकसान संरक्षणाच्या अटींच्या अधीन आहे.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
1 डिसें, 2025
हे उपयुक्त ठरले का?