पाळीव प्राण्यांना होस्ट करण्याबद्दल तुम्हाला काय माहीत असणे आवश्यक आहे
अनेक गेस्ट्स त्यांच्या कुटुंबासोबत प्रवास करतात, ज्यात बर्याचदा पाळीव प्राणीही समाविष्ट असतात. पाळीव प्राण्यांना होस्ट करणे नेहमीच शक्य नसते हे आम्ही जाणतो. परंतु तुम्ही तुमची जागा पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल करू शकत असल्यास, तुम्ही तुमच्या प्रति रात्र भाड्यामध्ये पाळीव प्राणी शुल्क जोडणे निवडू शकता.
पाळीव प्राणी शुल्क जोडणे
पाळीव प्राणी आणणाऱ्या गेस्ट्सना होस्ट केल्यानंतर तुम्ही ज्या स्वच्छतेच्या कामांची अपेक्षा करता, जसे की फर्निचरवरील फर साफ करणे आणि स्लाईडिंग ग्लासच्या दरवाजांवरून नाकाचे किंवा पावलांचे ठसे पुसणे, त्या स्वच्छतेच्या कामांसाठी तुम्ही पाळीव प्राणी शुल्काचा वापर करू शकता.
तुम्ही पाळीव प्राणी शुल्क जोडता तेव्हा ते तुमच्या प्रति रात्र भाड्यामध्ये जोडले जाते आणि रिझर्व्हेशनच्या रात्रींमध्ये समप्रमाणात विभाजित केले जाते. चेक आऊटच्या वेळी ते गेस्टच्या एकूण भाड्यात समाविष्ट केले जाते, वेगळे शुल्क म्हणून आकारले जात नाही.
पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल असलेली जागा सेट अप करणे
बर्याच पाळीव प्राण्यांना त्यांच्या मालकांसोबत प्रवास करण्याची सवय असते आणि त्यांना अतिरिक्त आदरातिथ्याची आवश्यकता नसते. तथापि, तुम्ही तुमच्या जागेमध्ये पाळीव प्राण्यांना आणण्याची परवानगी दिल्यास, पुढील गोष्टी पुरवल्याने मदत होऊ शकेल:
- अन्न आणि पाण्यासाठी बाऊल्स
- पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल फर्निचर कव्हर्स
- दरवाज्याजवळ पंजे पुसण्यासाठी अनेक स्वतंत्र टॉवेल्स
- स्क्रॅचिंग पोस्ट आणि लिटर बॉक्स (पुठ्ठ्याचा बॉक्ससुद्धा चालेल)
- स्वच्छतेची अतिरिक्त सामग्री
तुमची लिस्टिंग अपडेट करणे
पाळीव प्राण्यांसोबत प्रवास करणाऱ्या गेस्ट्सना तुमच्या जागेमध्ये कशाची अपेक्षा करायची हे जाणून घ्यायचे असू शकते, जसे कि तिथे कुंपण घातलेले अंगण किंवा खाजगी पॅटिओ आहे का. तुमच्या लिस्टिंगमध्ये कोणतीही पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल वैशिष्ट्ये आणि सुविधा नक्की समाविष्ट करा.
तुमची लिस्टिंग पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल बनवण्यासाठी तुम्ही करू शकता अशा इतर गोष्टी:
- तुमच्या घराचे नियम अपडेट करा. प्रत्येक वास्तव्यासाठी तुम्ही, एक ते पाच पैकी, किती पाळीव प्राणी आणण्यास परवानगी देता ते गेस्ट्सना सांगा. तुम्ही कोणत्या प्रकारचे पाळीव प्राणी स्वीकारता, तुमच्या जागेमध्ये पाळीव प्राण्यांना एकटे सोडणे ठीक आहे का, पाळीव प्राण्याला प्रॉपर्टीच्या कोणत्या भागात जाण्याची परवानगी नाही, पाळीव प्राण्याला कधी पट्टा बांधला पाहिजे आणि पाळीव प्राण्यांच्या मलमूत्राची विल्हेवाट लावण्याची योग्य जागा कुठे आहे यासारख्या गोष्टी तुमच्या घराच्या नियमांमध्ये स्पष्ट करा.
- तुमचे गाईडबुक अपडेट करा. स्थानिक डॉग पार्क्स, पशुवैद्य आणि पाळीव प्राण्यांच्या सामानासाठीची दुकाने याबद्दलच्या शिफारसी समाविष्ट करा. पाळीव प्राणी सांभाळणार्या सेवा आणि केनेल्सदेखील सुचवण्याचा विचार करा.
पाळीव प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवणे
स्वच्छता शुल्क आणि पाळीव प्राणी शुल्क हे अपेक्षित खर्च पूर्ण करण्यासाठी असतात. परंतु गेस्ट्सचे पाळीव प्राणी कितीही चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित किंवा चांगले वर्तन करणारे असले, तरीही कधीतरी अपघात घडू शकतात.
फर्निचरच्या कव्हर्सवर पाळीव प्राण्यांनी मारलेले ओरखडे किंवा त्यांनी पाडलेले डाग यांसारख्या अनपेक्षित खर्चांसाठी होस्ट नुकसान संरक्षण आहे जे होस्ट्ससाठी AirCover चा भाग आहे. कोणत्याही नुकसानाचे फोटोंसह डॉक्युमेंटेशन करण्याची आणि आमच्या निराकरण केंद्रा द्वारे भरपाईची विनंती करण्याची खात्री करा.
मदतनीस प्राणी आणि भावनिक सपोर्ट देणाऱ्या प्राण्यांबद्दल मार्गदर्शक तत्त्वे
मदतनीस प्राणी म्हणजे पाळीव प्राणी नाहीत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मदतनीस प्राणी हा सामान्यतः एक कुत्रा असतो जो दिव्यांगता असलेल्या व्यक्तीसाठी काम किंवा टास्क्स करण्यासाठी वैयक्तिकरित्या प्रशिक्षित असतो.
भावनिक सपोर्ट देणारा प्राणी हा एक असा प्राणी असतो जो एखाद्या व्यक्तीला तिच्या दिव्यांगतेची लक्षणे किंवा परिणाम मॅनेज करण्यात मदत करण्यासाठी भावनिक सपोर्ट किंवा सहाय्य प्रदान करतो. भावनिक सपोर्ट देणारे प्राणी सामान्यतः कुत्री किंवा मांजरांसारखे घरात ठेवलेले प्राणी असतात. मदतनीस प्राण्याप्रमाणे, भावनिक सपोर्ट देणाऱ्या प्राण्याला दिव्यांगता असलेल्या व्यक्तीसाठी काम किंवा टास्क्स करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज नसते.
तुमच्याकडे पाळीव प्राणी न आणण्याचा नियम असला तरीही, तुम्हाला सवलत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही मदतनीस प्राण्याला त्याच्या मालकाबरोबर राहण्याची परवानगी देणे आवश्यकआहे आणि तुम्ही गेस्टकडून पाळीव प्राणी शुल्क आकारू शकत नाही.
लागू असलेल्या कायद्यानुसार जिथे होस्ट्सनी भावनिक सपोर्ट देणाऱ्या प्राण्यांना सामावून घेणे आवश्यक आहे अशा कोणत्याही जागी ही मार्गदर्शक तत्त्वे भावनिक सपोर्ट देणाऱ्या प्राण्यांसह येणाऱ्या गेस्ट्सनादेखील लागू होतात. तुमची लिस्टिंग अशा जागांपैकी एका जागी नसल्यास, तुम्ही भावनिक सपोर्ट देणाऱ्या प्राण्यासाठी पाळीव प्राणी शुल्क आकारू शकता किंवा पाळीव प्राणी न आणण्याचा तुमचा नियम लागू करू शकता.
होस्ट नुकसान संरक्षण म्हणजे विमा पॉलिसी नाही आणि ते या नियमांच्या, अटींच्या आणि मर्यादांच्या अधीन आहे. जपानमध्ये वास्तव्याच्या जागा ऑफर करणाऱ्या होस्ट्सना किंवा Airbnb Travel LLC द्वारे वास्तव्याच्या जागा ऑफर करणाऱ्या होस्ट्सना त्याद्वारे संरक्षण मिळत नाही, तिथे जपान होस्ट विमा लागू होतो. ज्या होस्ट्सचा रहिवासाचा किंवा आस्थापनाचा देश ऑस्ट्रेलिया आहे त्यांच्यासाठी, होस्ट नुकसान संरक्षण ऑस्ट्रेलियन युजर्ससाठी असलेल्या होस्ट नुकसान संरक्षण अटींच्या अधीन आहे. कृपया लक्षात घ्या की सर्व कव्हरेज मर्यादा USD मध्ये दाखवल्या आहेत.
वॉशिंग्टन स्टेटमधील लिस्टिंग्जसाठी, होस्ट नुकसान संरक्षणांतर्गत असलेल्या Airbnb च्या कराराच्या जबाबदाऱ्या, Airbnb ने खरेदी केलेल्या विमा पॉलिसीद्वारे कव्हर केल्या जातात. होस्ट नुकसान संरक्षण हे होस्ट दायित्व विम्याशी संबंधित नाही. होस्ट नुकसान संरक्षणांतर्गत, गेस्ट्सनी तुमच्या घराला आणि सामानाला केलेल्या काही विशिष्ट नुकसानाची भरपाई न दिल्यास, तुम्हाला भरपाई दिली जाते.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदलली असू शकते.