गेस्ट्ससाठी तुमची लिस्टिंग शोधण्याचे नवीन मार्ग
हायलाइट्स
अधिक गेस्ट्सना तुमच्यासारख्या उत्तम जागा शोधण्यात मदत करण्यासाठी नवीनतम वैशिष्ट्ये डिझाईन केली आहेत
- उच्च-गुणवत्तेचे फोटो अपलोड करून आणि तुमची सेटिंग्ज अपडेट करून तुम्ही तुमचे लिस्टिंग नजरेत भरवू शकता
सर्वात संस्मरणीय ट्रिप्स अनेकदा कुठेतरी दूर जाण्याच्या साध्या इच्छेने सुरू होतात. कुठे आणि कधी जायचे हे शोधण्यासाठी, प्रवासी अनेकदा एक परिपूर्ण प्लॅन तयार करण्याचा प्रयत्न करताना ऑनलाइन कल्पना शोधतात. म्हणून आम्ही Airbnb एक्सप्लोर करण्याचा आणि तुमच्यासारख्या उत्तम लिस्टिंग्ज शोधण्याचा संपूर्ण नवीन मार्ग गेस्ट्ससाठी सादर करत आहोत.
Airbnb 2022 समर रिलीज एक दशकात Airbnb मध्ये झालेला सर्वात मोठा बदल दाखवते. नवीन डिझाईन 56 Airbnb कॅटेगरीजमधील लिस्टिंग्ज दाखवते, ज्यामुळे गेस्ट्सना अस्तित्वात आहेत हे माहीत नसलेल्या जागा शोधणे आणि बुक करणे सोपे होते आणि कनेक्टेड बुकिंग नावाचे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य, जे गेस्ट्सना दोन घरांमध्ये जास्त काळ वास्तव्य स्प्लिट करण्याची परवानगी देते.
होस्ट म्हणून, तुमच्या लिस्टिंगमध्ये पूर्ण आणि वर्तमान तपशील, अपडेट केलेली उपलब्धता आणि उच्च-गुणवत्तेचे फोटो आहेत याची खात्री करून तुम्ही या आकर्षक वैशिष्ट्यांचा फायदा घेऊ शकता.
शोधाशोध करण्याचे अधिक मार्ग
Airbnb चे रिडिझाईन विविध प्रकारच्या गेस्ट्सना त्यांच्या ट्रीपच्या प्लॅनिंगपूर्वी तुमचे लिस्टिंग—मग ती शेअर केलेली रूम असो, खाजगी रूम असो किंवा संपूर्ण जागा असो—दिसून येण्यास मदत करते.
गेस्ट्स तुमची लिस्टिंग याद्वारे शोधू शकतात:
- Airbnb कॅटेगरीज प्रत्येक वेळी गेस्ट्स जेव्हा ॲप उघडतात, तेव्हा त्यांना नजीकच्या भविष्यात उपलब्ध असलेल्या, ते त्वरित बुक करू शकतील अशा उत्तम वास्तव्याच्या जागा सादर केल्या जातात.
- कनेक्टेड बुकिंग. सात किंवा त्याहून अधिक रात्रींच्या वास्तव्यांसाठी, सर्च रिझल्ट्समध्ये गेस्ट्सना त्यांची ट्रिप आता दोन जागांमध्ये स्प्लिट करण्याचा पर्याय समाविष्ट आहे.
- अधिक सोयीस्करपणा. गेस्ट्स ओपन - एंडेड तारखा आणि लोकेशन्स वापरून वास्तव्याच्या जागा शोधू शकतात—आम्ही मागच्या वर्षी रोल आऊट केलेली वैशिष्ट्ये वापरून—किंवा ते विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी ते त्यांचे रिझल्ट्स मर्यादीत ठेवू शकतात.
Airbnb कॅटेगरी कशा काम करतात
जेव्हा गेस्ट्स Airbnb उघडतात, तेव्हा त्यांना त्यांची युनिक स्टाईल, लोकेशन किंवा जवळपासच्या ॲक्टिव्हिटीवर आधारित क्युरेटेड कलेक्शन्समध्ये ग्रुप लिस्टिंग्जच्या शीर्षस्थानी असलेल्या कॅटेगरीजसह सादर केल्या जातात. या कॅटेगरीजमध्ये आश्चर्यकारक दृश्ये किंवा शेफचे किचन, तलाव किंवा राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ, गोल्फिंग किंवा सर्फिंगसाठी ॲक्सेस यासारखी वैशिष्ट्ये असणाऱ्या वास्तव्याच्या जागा दाखवल्या जातात.
गेस्ट्स जेव्हा एखाद्या विशिष्ट ठिकाणी वास्तव्याच्या जागा शोधतात, तेव्हा त्यांना पूर्वीसारखेच सर्व घरे नावाच्या कॅटेगरीमध्ये रिझल्ट्स मिळतात. आता, त्यांना त्या लोकेशनवर आधारित अतिरिक्त कॅटेगरीजदेखील सापडतील, ज्यामुळे त्यांच्या सर्च एरियाच्या आत किंवा त्यापलीकडे अविश्वसनीय घरे शोधणे सोपे होईल.
लिस्टिंग्ज अनेक कॅटेगरीजमध्येदेखील दिसू शकतात. तुमच्या लेक हाऊसमध्ये शेफच्या किचनचा समावेश असल्यास, हे लिस्टिंग लेक कॅटेगरी आणि शेफचे किचन कॅटेगरीमध्ये दाखवले जाऊ शकते — तुमच्या लोकेशनसाठीच्या सर्च रिझल्ट्सव्यतिरिक्त.
सर्वात खास नवीन कॅटेगरीजपैकी एक म्हणजे डिझायनर, 20,000 हून अधिक घरांचे कलेक्शन त्यांच्या प्रतिष्ठित आर्किटेक्चर आणि सौंदर्यदृष्ट्या प्रेरणादायी इंटीरियरसाठी निवडलेले आहे. डिझायनर कॅटेगरीमध्ये फ्रँक लॉयड राईट आणि झाहा हदीद प्रॉपर्टीजसारख्या प्रख्यात आर्किटेक्ट्सची घरे, डिझाईन प्रकाशनांमध्ये वैशिष्ट्यीकृत केलेली घरे आणि त्यांच्या स्वत:च्या डिझाईन तत्त्वांना प्रत्यक्षात आणण्याचे विशेष काम करणाऱ्या होस्ट्सनी ऑफर केलेल्या जागांचा समावेश आहे.
येथे फक्त काही Airbnb कॅटेगरीज दिलेल्या आहेत: अप्रतिम दृश्ये, बीच, कॅम्पिंग, शेफचे किचन, ग्रामीण, क्रिएटिव्ह जागा, गोल्फिंग, ऐतिहासिक घरे, आयकॉनिक सिटीज, नॅशनल पार्क्स, स्कीइंग, सर्फिंग, ट्रॉपिकल आणि विनयार्ड.
या कॅटेगरीज सर्च करण्याच्या या नवीन मार्गाची केवळ सुरुवात आहेत, ज्यामुळे गेस्ट्सना पूर्वीपेक्षा अधिक जागा शोधता येतात. कालांतराने आम्ही आणखी काही कॅटेगरीज सादर करू, ज्या तुमच्या प्रॉपर्टीजची खास वैशिष्ट्ये आणि खास लोकेशन्स दाखवतील. आमचा विश्वास आहे की कॅटेगरीज सर्चचे भविष्य आहेत आणि Airbnb वर प्रत्येक घरासाठी आणि प्रत्येक होस्टसाठी एक कॅटेगरी आहे.
प्रत्येक कॅटेगरीमधील घरे एका निवड प्रक्रियेतून जातात. शीर्षक, वर्णन, फोटो कॅप्शन्स आणि गेस्ट्स रिव्ह्यूजचे विश्लेषण करण्यासाठी मशीन लर्निंग वापरून Airbnb वरील लाखो ॲक्टिव्ह लिस्टिंग्जना ॲनालाईज केले जाते. म्हणून तुमची लिस्टिंगची माहिती अद्ययावत आणि पूर्ण असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
कनेक्टेड बुकिंग कसे काम करते
गेस्ट्स त्यांच्या परिस्थितीनुसार अगदी सोयीस्कररित्या सर्व लिस्टिंग्ज ब्राउझ—आणि बुक—करू शकतात. कनेक्टेड बुकिंग वैशिष्ट्य अधिक होस्ट्सना गेस्ट्सच्या प्रवासाचा भाग होण्याची संधी देते.
जेव्हा गेस्ट्स एक आठवडा किंवा त्याहून अधिकच्या ट्रिपसाठी सर्च करतात, तेव्हा कनेक्टेड बुकिंग आपोआप सर्च रिझल्ट्समध्ये दिसून येते. ते सर्व घरांची कॅटेगरी खाली स्क्रोल करत असताना, गेस्ट्स एकाच ठिकाणच्या दोन घरांमध्ये त्यांची ट्रिप विभाजित करण्याचा पर्याय शोधू शकतात.
पूर्वी, जर गेस्ट्सनी महिनाभराच्या ट्रिपसाठी सर्च केले असेल, परंतु त्या काळात तुमच्याकडे फक्त दोन आठवड्यांसाठी उपलब्धता असेल तर तुमचे घर सर्च रिझल्ट्समध्ये दिसले नसणार. कनेक्टेड बुकिंगसह, गेस्टची संपूर्ण ट्रिप कव्हर करण्यासाठी तुमची लिस्टिंग दुसऱ्या लिस्टिंगसोबत पेअर केली जाऊ शकते.
प्रत्येक कनेक्टेड बुकिंग सर्चमधील लोकेशन, प्रॉपर्टीचा प्रकार आणि सुविधांशी जुळणाऱ्या दोन प्रॉपर्टीजना जोडते. उदाहरणार्थ, जर एखादे कुटुंब 32 इंचापेक्षा जास्त रुंद पायर्यांशिवाय प्रवेशद्वार किंवा दारे यासारख्या ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांसह संपूर्ण घर शोधत असेल तर, कनेक्टेड बुकिंग ही वैशिष्ट्ये असणाऱ्या दोन लिस्टिंग्जना जोडेल.
जेव्हा गेस्ट्स कनेक्टेड बुकिंगद्वारे बुक करतात, तेव्हा होस्ट्सना स्वतंत्र बुकिंग विनंत्या मिळतात. इतर कोणत्याही रिझर्व्हेशनप्रमाणेच बुक केलेल्या रात्रींसाठी तुमचे भाडे आणि घराचे नियम लागू होतात.
नजरेत भरण्यासाठी तुम्ही काय करू शकता
Airbnb ची नवीन वैशिष्ट्ये तुमचे घर पूर्वीपेक्षा अधिक जागी अधिक लोकांना दाखवतात. येथे फक्त काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुमची लिस्टिंग नजरेत भरू शकते:
- उच्च-गुणवत्तेच्या फोटोंसह तुमची जागा अद्वितीय बनवणाऱ्या गोष्टी हायलाईट करा. वर्णनात्मक फोटो—एका प्रोने काढलेले असूदेत किंवा तुमच्या स्मार्टफोनद्वारे—तुमची लिस्टिंग गेस्ट्सना आकर्षित करण्यास मदत करू शकतात.
- सुविधांची आणि वैशिष्ट्यांची यादी रिव्ह्यू करा—आणि कोणत्याही नवीन गोष्टी तपासा. गेस्ट्सना हव्या असलेल्या लोकप्रिय सुविधा लक्षात घेऊन तुमच्या जागेच्या ऑफरमध्ये सर्व काही जोडा किंवा अपडेट करा, त्यामुळे ते संबंधित कॅटेगरीमध्ये सामील होईल.
- वायफाय स्पीड टेस्ट करून घ्या. विश्वसनीय इंटरनेट ॲक्सेस गेस्ट्सना खात्री देऊ शकतो की त्यांच्या वास्तव्यादरम्यान ते आवश्यकतेनुसार काम करू शकतील आणि ऑनलाईन कम्युनिकेट करू शकतील.
- तुमची लिस्टिंग सर्व प्रवाशांसाठी उपलब्ध आहे का याचा विचार करा. पायर्यांशिवाय प्रवेशद्वार आणि रुंद दरवाजा यासारख्या ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांचे फोटो आणि तपशील जोडा, जे विविध गरजा असलेल्या गेस्ट्सना आमंत्रित करतात.
मोठ्या आणि लहान अशा सर्व तपशीलांसह तुमची लिस्टिंग अपडेट केल्याने तुमची लिस्टिंग गेस्ट्सच्या विस्तृत श्रेणीपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते. ते शोधत असलेली जागा तुमचीच असू शकते.
*Airbnb च्या अंतर्गत चाचणी डेटानुसार 14 एप्रिल 2022 रोजीपर्यंत.
या लेखात दिलेली माहिती पब्लिकेशननंतर कदाचित बदलली असेल.
हायलाइट्स
अधिक गेस्ट्सना तुमच्यासारख्या उत्तम जागा शोधण्यात मदत करण्यासाठी नवीनतम वैशिष्ट्ये डिझाईन केली आहेत
- उच्च-गुणवत्तेचे फोटो अपलोड करून आणि तुमची सेटिंग्ज अपडेट करून तुम्ही तुमचे लिस्टिंग नजरेत भरवू शकता