तुमचे भाडे धोरण सेट करा

गेस्ट्सच्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी तुमची उपलब्धता ॲडजस्ट करा आणि सवलती ऑफर करा.
Airbnb यांच्याद्वारे 1 डिसें, 2020 रोजी
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
9 जाने, 2025 रोजी अपडेट केले

तुमच्या भाड्याचा नियमितपणे आढावा घेतल्याने तुम्हाला स्पर्धात्मक राहण्यास मदत होते. तुम्ही तुमचे भाडे धोरण विकसित करत असताना खालील टिप्सचा विचार करा.

नियमितपणे काय करावे

तुम्हाला किती वेळा तुमच्या भाड्याचा आढावा घेऊन त्यात सुधारणा करायची आहे ते ठरवा. तुमच्या शेड्युलनुसार करण्यासाठी येथे काही आकर्षणे दिली आहेत.

  • अधिक रात्री खुल्या करा: तुम्ही होस्ट करू शकता हे तुम्हाला माहीत असलेल्या कोणत्याही रात्री तुमच्या कॅलेंडरमध्ये अनब्लॉक करा. यामुळे तुमची लिस्टिंग जास्त सर्च रिझल्ट्समध्ये दिसण्यात मदत होऊन तुमची कमाई वाढू शकते.
  • ट्रिपचा कालावधी कस्टमाईझ करा: बुकिंग्जच्या मधील रिकाम्या तारखा पाहा. या रिकाम्या तारखा तुमच्या ट्रिपच्या किमान कालावधीपेक्षा कमी असल्यास, कोणीही त्या रात्री बुक करू शकत नाही. विशिष्ट तारखांसाठी किमान वास्तव्याचा कालावधी कमी सेट केल्याने तुम्हाला तुमचे कॅलेंडर भरण्यात मदत करू शकते.
  • मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची तुलना करा: तुमच्या भागातील बुक केलेल्या आणि बुक न केलेल्या घरांची भाडी तपासल्याने तुम्हाला स्पर्धात्मक भाडे सेट करण्यात मदत होऊ शकते.

“मला मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्ज पाहायला आवडते, जेणेकरून मी माझ्या भाड्यांची तुलना करू शकेन, माझे भाडे खूप जास्त किंवा खूप कमी नाही याची खात्री करू शकेन आणि आदर्श भाडे किती असावे हे शोधू शकेन,” नेल्सन, कॅनडामधील एक सुपरहोस्ट कॅरेन म्हणतात.

तुम्ही स्थानिक मागणीनुसार तुमचे भाडे आपोआप ॲडजस्ट करण्यासाठी कधीही स्मार्ट रेट देखील चालू करू शकता. विशेषतः, तुम्हाला तुमच्या भाड्यावर सतत लक्ष न ठेवता ते ऑप्टिमाईझ करायचे असेल, तर हे टूल उपयुक्त ठरते.

कमी गर्दीच्या काळात काय करावे

सर्वात लोकप्रिय लिस्टिंग्जनासुद्धा कमी मागणीच्या काळात बुकिंग्ज कमी मिळतात. तुम्ही कमी मागणीच्या काळासाठी तयारी करत असताना तुमची लिस्टिंग नजरेत भरण्यात मदत करण्याचे काही मार्ग येथे दिले आहेत.

  • सवलती ऑफर करा: साप्ताहिक आणि मासिक वास्तव्यांसाठीच्या सवलतींमुळे तुमचे कॅलेंडर भरण्यात आणि चेक आऊटनंतरची तयारी कमी वेळा करण्यात मदत होऊ शकते. अखेरची सवलत जोडणे आगमनाच्या 1 ते 28 दिवस आधी बुकिंग करणाऱ्या गेस्ट्सना आकर्षित करू शकते.
  • ॲडव्हान्स नोटिसचा कालावधी कमी करा: गेस्ट्सना चेक इनच्या जवळ बुकिंग करू देणे तुम्हाला अधिक बुकिंग्ज आकर्षित करण्यात मदत करू शकते. गेस्टचे बुकिंग आणि त्यांचे आगमन या दरम्यान तुम्हाला किती वेळ हवा आहे यावर अवलंबून, कमीत कमी त्याच दिवसाइतका लीड वेळ निवडा.
  • अल्पकालीन वास्तव्यास परवानगी द्या: तुमचा किमान ट्रिपचा कालावधी कमी करणे अल्पकालीन वास्तव्ये बुक करणाऱ्या गेस्ट्सना आकर्षित करू शकते. तुमच्याकडे आठवड्याच्या दिवसानुसार तुमचा ट्रिपचा किमान कालावधी कस्टमाईझ करण्याचा पर्याय आहे.

“मला निश्चितच कमी कालावधीच्या वास्तव्यांची अधिक बुकिंग्ज मिळत आहेत,” पाम स्प्रिंग्ज, कॅलिफोर्नियामधील सुपरहोस्ट जिमी म्हणतात. “ही अखेरच्या क्षणी बुक केलेली अशी वास्तव्ये असतात जी लोकांनी प्लॅन केली असतीलच असे नाही, कारण दोन दिवसांची सुट्टीसुद्धा छान वाटते. ही लवचिकता लोकांना आकर्षित करते.”

जास्त गर्दीच्या काळात काय करावे

गेस्ट्सची मागणी जास्त असतानाच्या वेळेचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यात अनेक Airbnb टूल्स तुम्हाला मदत करू शकतात. विचार करण्याजोग्या काही युक्त्या येथे दिल्या आहेत.

  • अर्ली बर्ड सवलत जोडा: चेक इनच्या 1 ते 24 महिने आधी केलेल्या बुकिंग्जवर सवलत ऑफर केल्याने तुम्हाला आधीपासून प्लॅन करणाऱ्या गेस्ट्सना आकर्षित करण्यात मदत होते. 3% किंवा त्याहून अधिक सवलतींसाठी, गेस्ट्सना सर्च रिझल्ट्समध्ये आणि तुमच्या लिस्टिंग पेजवर एक विशेष कॉलआऊट दिसतो. तुमचे सवलत दिलेले भाडे तुमच्या मूळ भाड्याच्या बाजूला दिसते, ज्यावर काट मारलेली असते.
  • कस्टम प्रमोशन सेट करा: प्रमोशन्स चालवणे हा विशिष्ट वेळी अधिक बुकिंग्ज मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जेव्हा तुम्ही 15% किंवा त्याहून अधिक सवलती ऑफर करता, तेव्हा गेस्ट्सना तुमच्या लिस्टिंग पेजवर आणि सर्च रिझल्ट्समध्ये एक विशेष कॉलआऊट दिसतो. प्रमोशन चालवण्यासाठी काही विशिष्ट आवश्यकता आहेत, जसे की गेल्या वर्षभरात किमान एक बुकिंग मिळाले असले पाहिजे.
  • तुमची उपलब्धता विंडो वाढवा: तुम्ही तुमचे कॅलेंडर जास्तीत जास्त दोन वर्षे आधीपासून खुले करू शकता. तुमची लिस्टिंग जास्त सर्च रिझल्ट्समध्ये दिसून येईल—आणि त्या वेळी कमी जागा उपलब्ध असल्यास, रिझल्ट्सच्या आणखी छोट्या लिस्टमध्येसुद्धा दिसून येईल.

“कधीकधी लोकांनी त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी वर्षभर आधी किंवा ख्रिसमससाठी सहा महिने आधी केलेली बुकिंग्ज मला मिळतात,” टारागोना, स्पेनमधील सुपरहोस्ट अ‍ॅन म्हणतात. “आगाऊ बुकिंग करणारे लोक सहसा कॅन्सल करत नाहीत. हे यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे की पुढे काय होणार आहे हे तुम्हाला कळेल.”

तुमची भाडी आणि इतर सेटिंग्ज नेहमी तुमच्याच नियंत्रणात असतात. तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स वेगळे असू शकतात.

होस्ट्सना मुलाखतींमध्ये भाग घेतल्याबद्दल पैसे देण्यात आले होते.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
1 डिसें, 2020
हे उपयुक्त ठरले का?