तुमच्या लिस्टिंगसाठी छान फोटोज कसे काढायचे
उत्तम लिस्टिंग फोटोज लक्ष आकर्षित करतात, स्पष्ट अपेक्षा सेट करतात आणि बुक करण्यासाठी गेस्ट्सना आत्मविश्वास देतात. तुमच्या जागेचे उच्च-गुणवत्तेचे फोटोज घेण्यासाठी या टिप्स वापरून पहा.
फोटोज काढण्याची तयारी करत आहे
तपशीलवार फोटोज गेस्ट्सना तुमची लिस्टिंग त्यांच्या गरजा पूर्ण करते की नाही हे ठरवण्यात मदत करतात. तुम्ही फोटो काढणे सुरू करण्यापूर्वी तुमची जागा नीटनेटकी करा आणि तुमच्या सेशनचे नियोजन करा.
- जागा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. गेस्ट्सना नेमके तेच दाखवा ज्याची ते अपेक्षा करू शकतात. कॅलिफोर्नियाच्या जोशुआ ट्रीमधील फोटोग्राफर आणि सुपरहोस्ट जेफ म्हणतात, “फोटोज काढण्यापूर्वी कित्येक लोक अनावश्यक वस्तू काढून घेऊन जागा मोकळी आणि सुटसुटीत करण्यास विसरून जातात याचे आश्चर्य वाटते.”
- हायलाईट करण्यासाठी वैशिष्ट्ये निवडा. गेस्ट्सना तुमच्या जागेबद्दल काय आवडेल? अनपेक्षित प्रसंग टाळण्यासाठी त्यांना काय माहीत असणे आवश्यक आहे? अनोखे तपशील, लोकप्रिय सुविधा आणि ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये दाखवण्यासाठी फोटोज वापरा.
- एक लिस्ट बनवा. गेस्ट्स वापरतील अशा प्रत्येक रूम आणि भाग वेगवेगळ्या कोनातून कॅप्चर करण्याची योजना बनवा. उदाहरणार्थ, बॅकयार्ड फोटोज संपूर्ण यार्ड, पूल, सन लाउंजर्स असलेले पॅटिओ आणि गेटवरील लॅचवर फोकस करू शकतात.
- चांगला प्रकाश पडणारी वेळ निवडा. सौम्य, नैसर्गिक प्रकाश फोटोंना चटकदार आणि आकर्षक बनवते. जेव्हा तुमच्या रूम्समध्ये सर्वात जास्त प्राकृतिक प्रकाश येत असेल तेव्हा इनडोअर फोटोज घेण्याची योजना करा. सूर्योदयाच्या 60 मिनिटांनंतर आणि सूर्यास्ताच्या आधी “गोल्डन तास” दरम्यान आऊटडोअर फोटोज घ्या.
- या कामासाठी एखाद्या व्यावसायिक फोटोग्राफरला घेण्याचा विचार करा. व्यावसायिक फोटोग्राफी जगभरातील निवडक शहरांमध्ये Airbnb द्वारे उपलब्ध आहे.
उच्च-गुणवत्तेचे फोटो काढत आहे
बहुतेक कॅमेरे लिस्टिंगचे आकर्षक फोटो कॅप्चर करू शकतात. तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा देखील हे काम करू शकतो. तुमचे फोटोज Airbnb वर आकर्षक दिसण्यासाठी काय करावे ते येथे दिले आहे.
- फ्लॅश बंद करा. खिडक्यांचे ब्लाइंड्स, शेड्स आणि पडदे उघडा. तुमच्या जागेवर खूप नैसर्गिक प्रकाश असेल आणि तरीही तुमचे फोटो खूप गडद येत असतील तर लाईट्स चालू करा.
- आडवे फोटो घ्या. आडवे काढलेले फोटो सरळ उभे काढलेल्या फोटोंपेक्षा चांगले काम करते कारण सर्च रिझल्ट्समध्ये तुमचे फोटो चौकोन क्रॉप केले जातात आणि तुमचे लिस्टिंग पेज लँडस्केप मोडमध्ये फोटो दाखवते.
- मुख्य वस्तू-व्यक्ती-जागा फ्रेमच्या मध्यभागी असू द्या. फोटोंना व्यवस्थित करण्यात मदत करण्यासाठी ग्रीड चालू करा.
- सरळ पुढे शूट करा. लेन्स वर किंवा खाली न झुकवता सरळ धरून फोटो काढा जेणेकरून गेस्ट्सना तुमच्या जागेचे खरेखुरे वास्तविक दृश्य मिळेल.
- फोटोज निवडा. तुमच्या अनुभवाचे संपूर्ण चित्र तसेच छोटे-छोटे तपशील शेअर करण्यासाठी वाईड, मिड-रेंज आणि क्लोज-अप इमेजेस, असे सर्व प्रकारचे फोटो निवडा.
- फोटोत बदल करा. तुमच्या फोनवरील ऑटो एडिटिंग बटणासारख्या टूल्सचा वापर करून प्रत्येक फोटोची चमक, कॉन्ट्रास्ट आणि हायलाईट्स अॅडजस्ट करा. आवश्यकतेनुसार फोटो क्रॉप, सरळ किंवा रोटेट करा (जेणेकरून त्यांची बरोबर असलेली बाजू वर असेल).
- हाय रिझोल्युशनमध्ये फोटो अपलोड करा. ते फोटो वापरा ज्यांचे रिझोल्युशन कमीतकमी 1200 x 800 पिक्सेल असेल. फाईलचा आकार मोठा असेल तर चांगले असते—10 मेगाबाईट्सपर्यंत.
फोटो टूर आणि कॅप्शन्स जोडणे
तुम्ही तुमचे फोटो अपलोड केल्यानंतर, तुमची जागा आकर्षकरित्या दाखवण्यासाठी तुमच्या लिस्टिंग्ज टॅबमधील टूल्स वापरा.
- एक फोटो टूर तयार करा. गेस्ट्सना तुमच्या घराचा लेआऊट समजण्यात मदत करण्यासाठी फोटो टूर तुमच्या इमेजेसची रूमनुसार ऑटोमॅटिक क्रमवारी लावते. तुम्ही फोटोंची जागा बदलू शकता, ते काढून टाकू शकता आणि जोडू शकता.
- प्रत्येक रूममध्ये तपशील जोडा. तुम्ही बघू शकता की बेडरूममध्ये एक किंग-साईझ बेड आहे किंवा लिव्हिंग रूममध्ये 55-इंचचा टिव्ही आहे. तुम्ही रूमच्या ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांविषयीची माहिती देखील समाविष्ट करू शकता.
- फोटोचे कॅप्शन्स लिहा. गेस्ट्ससाठी महत्त्वाची असू शकणारी कोणती गोष्ट फोटोमध्ये नाही ते सांगा. उदाहरणार्थ, “ड्रॉप-लीफ डायनिंग टेबल पूर्ण मोठा केल्यावर 10 लोक सहजपणे बसू शकतात.”
- प्रत्येक रूम फ्लोर प्लॅनमध्ये कुठे आहे ते स्पष्ट करा. जसे की, “बेडरूम 1 दुसऱ्या मजल्यावर असून तिथे अटॅच्ड बाथरूम आहे.”
- वैशिष्ट्ये आणि सुविधांवर जोर द्या. लोकप्रिय वस्तूंकडे लक्ष आकर्षित करा. उदाहरणार्थ, “शेअर केलेल्या स्वयंपाकघरात एस्प्रेसो मशीन, इलेक्ट्रिक केटल आणि फ्रीजमध्ये फक्त गेस्ट्ससाठी वेगळी शेल्फची जागा आहे.” तुम्ही बदल करणे पूर्ण केल्यावर, तुमच्या लिस्टिंगचा प्रिव्ह्यू बघण्यासाठी पहा बटणावर टॅप करा.
तुमचे बदल करणे पूर्ण झाल्यावर, तुमच्या लिस्टिंगचा प्रिव्ह्यू बघण्यासाठी पहा बटणावर टॅप करा.
पब्लिश केल्यानंतर या लेखातील माहितीमध्ये बदल झालेला असू शकतो.