को-होस्ट पेआऊट्स आणि मेसेजिंगसाठी नवीन पर्याय
एडिटरची टीपः हा लेख Airbnb 2023 च्या विंटर रिलीझचा भाग म्हणून प्रकाशित झाला होता. प्रकाशनानंतर कदाचित माहितीमध्ये बदल झालेला असू शकेल. आमच्या नवीनतम उत्पादन रीलीजबद्दलअधिक जाणून घ्या.
तुम्ही स्वच्छता शुल्काचे पेआऊट तुमच्या क्लीनर किंवा को-होस्टसह शेअर करण्याचे मार्ग विचारले आहेत. तुम्ही Airbnb वरील तुमच्या इनबॉक्समधूनच को-होस्ट्सना मेसेज पाठवण्याच्या क्षमतेबाबत देखील विचारले आहे. आजपासून तुम्ही हे दोन्ही करू शकता.
को-होस्ट पेआऊट्स
तुमचे स्वच्छता शुल्क शेअर करा
जर तुमच्याकडे स्वच्छता शुल्क असेल तर तुम्ही आता ते तुमच्या क्लीनर किंवा इतर को-होस्टसह शेअर करू शकता. असे करण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्या क्लीनर किंवा दुसर्या प्राप्तकर्त्याला को-होस्ट म्हणून जोडा.
पेआऊट पर्याय निवडा
तुम्ही आता चार पेआऊट पर्यायांपैकी एक निवडू शकता:
- स्वच्छता शुल्क शेअर करा
- स्वच्छता शुल्क अधिक बुकिंग रकमेची टक्केवारी शेअर करा
- प्रत्येक पेआऊटची टक्केवारी शेअर करा
- प्रत्येक पेआऊटची निश्चित रक्कम शेअर करा
लक्षात ठेवा की तुम्ही को-होस्ट्स म्हणून एकापेक्षा जास्त क्लीनर जोडल्यास, केवळ एकाला तुमचे स्वच्छता शुल्क मिळू शकते. तुमचे लोकेशन, तुमच्या को-होस्टचे लोकेशन आणि तुमची जागा कुठे आहे त्या आधारावर को-होस्ट्ससह पेआऊट्स शेअर करण्याच्या काही मर्यादा आहेत.
तुमच्या को-होस्ट्सना मेसेज करणे
तुम्ही आता तुमच्या Airbnb इनबॉक्समधून थेट तुमच्या को-होस्टला मेसेज पाठवू शकता. तुम्ही तुमची लिस्टिंग मॅनेज करू शकाल आणि तुम्ही गेस्ट्सना मेसेज पाठवलेल्या त्याच ठिकाणाहून आगामी रिझर्व्हेशन्स समन्वयित करू
शकाल. हे को-होस्ट टूल्सAirbnb 2023 च्या हिवाळी रिलीझचा एक भाग आहेत. तुम्ही अर्ली ॲक्सेस ऑप्ट इन केल्यावर आजच नवीन वैशिष्ट्ये वापरण्यास सुरुवात करा.