रेटिंग्ज आणि रिव्ह्यूज यामध्ये सुधारणा केली आहे

रेटिंग्जचे वितरण, वर्गीकरण आणि बरेच काही असलेले पुन्हा डिझाइन केलेले रेटिंग्ज पेज.
Airbnb यांच्याद्वारे 8 नोव्हें, 2023 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
2 मे, 2024 रोजी अपडेट केले

एडिटरची टीपः हा लेख Airbnb 2023 च्या विंटर रिलीझचा भाग म्हणून प्रकाशित झाला होता. प्रकाशनानंतर कदाचित माहितीमध्ये बदल झालेला असू शकेल. आमच्या नवीनतम उत्पादन रीलीजबद्दलअधिक जाणून घ्या.

बुकिंग करण्यापूर्वी घराची गुणवत्ता समजून घेण्यासाठी गेस्ट्स रेटिंग्स आणि रिव्ह्यूजवर अवलंबून असतात. परंतु गेस्ट्सनी आम्हाला त्यांच्याशी संबंधित रिव्ह्यूज शोधणे खूप अवघड होते असे सांगितले.

म्हणूनच आम्ही रेटिंग्ज पेज रीडिझाइन केले आहे आणि तीन नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत ज्यामुळे रिव्ह्यूज वाचणे सोपे होते आणि अधिक उपयुक्त होते.

रेटिंग्जचे वितरण

तुमच्या लिस्टिंग पेजवरील रिव्ह्यूज विभागात, एक नवीन चार्ट एक ते पाच स्टार्स मधील रिव्ह्यूजचे वितरण दर्शवतो. यामुळे गेस्ट्सना तुमच्या घराच्या संपूर्ण इतिहासामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिव्ह्यूजची संख्या लगेच दिसून येते.

रिव्ह्यूची क्रमवारी लावा

गेस्ट्स आता तुमचे रिव्ह्यूज सर्वाधिक रेट केलेले किंवा सर्वात अलीकडील अशारीतीने क्रमवार लावू शकतात, ज्यामुळे त्यांना सर्वाधिक काळजी असलेले रिव्ह्यूज शोधणे सोपे होते. हे त्यांना एकतर तुमचे सर्व पाच-स्टार रिव्ह्यूज एकाच ठिकाणी वाचू देते किंवा सर्वात अलीकडील रिव्ह्यूजपासून सुरुवात करून तुमचे रिव्ह्यूज ब्राउझ करू देते.

रिव्ह्यूवर आणि ट्रिपचे तपशील

स्टार रेटिंग आता प्रत्येक रिव्ह्यूच्या बाजूला दिसून येईल, ज्यामुळे गेस्ट्सच्या फीडबॅकचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. एखाद्या गेस्टने तुमच्या जागेला चार स्टार्ससह रेट केले परंतु एक चमकदार रिव्ह्यू दिला, तर भविष्यातील गेस्ट्सना तुमच्या एकूण रेटिंगचा अधिक चांगला अंदाज येईल.

रिव्ह्यूजमध्ये समीक्षक आणि त्यांच्या ट्रिपबद्दल अधिक माहिती देखील समाविष्ट असते, ज्यात ते कुठून आले आहेत, ते किती काळ राहिले आहेत आणि त्यांनी कुटुंब, पाळीव प्राणी किंवा ग्रुपसह प्रवास केला आहे की नाही हे समाविष्ट असते. यामुळे भविष्यातील गेस्ट्सना त्यांच्या स्वतःच्या ट्रिपच्या तपशिलांशी जुळणारे रिव्ह्यूज शोधण्यात मदत होईल. 

उदाहरणार्थ, जर एखादा गेस्ट मुलांसमवेत प्रवास करत असेल तर, मुलांसमवेत राहिल्याचा टॅग त्यांच्या रिव्ह्यूवर दिसेल. जर एखाद्या गेस्टनी सात रात्रींसाठी वास्तव्य केल्यास आठवडाभर वास्तव्य केले हे त्यांच्या रिव्ह्यूवर दिसून येईल.*

सुधारित रेटिंग्ज आणि रिव्ह्यूज, नवीन लिस्टिंग्ज टॅब आणि होस्टसाठी आणखी बरेच अपग्रेड्स हे Airbnb 2023 च्या विंटर रिलीझचा एक भाग आहेत.

Airbnb
8 नोव्हें, 2023
हे उपयुक्त ठरले का?