व्यस्त सीझनमध्ये होस्टिंग सुलभ करण्यासाठी टिप्स
खास कारणामुळे याला गर्दीचा सीझन म्हणतात: कॅलेंडर बुकिंगने भरले असेल आणि दोन गेस्ट्सच्या बुकिंग्ज दरम्यान कमी दिवस असतील, तर सर्व मॅनेज करणे फार कठीण असते. गर्दीच्या वेळी चांगले आदरातिथ्य करण्यासाठी या टिप्स वापरून पहा.
झटपट चेक आऊटनंतरची तयारी हाताळणे
तुमच्याकडे लागोपाठ बुकिंग्ज असतात तेव्हा, प्रत्येक चेक आऊटनंतर एकाच नित्यक्रमाचे पालन केल्याने दोन बुकिंग्जच्या मधे लिस्टिंग लवकर तयार करायला मदत होते. रॉबिन, ऑस्ट्रेलियाच्या माऊंट बार्करमधील एक सुपरहोस्ट, चेकलिस्ट वापरण्याची शिफारस करतात, मग भले तुम्ही स्वतः साफसफाई करत असाल किंवा त्यासाठी इतरांवर अवलंबून असाल.
“चेकलिस्ट वापरण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यामुळे मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि माझ्याकडून कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष होत नसल्याची खात्री होते,” असे रॉबिन म्हणतात. "जेव्हा व्यत्यय येतात तेव्हा वेगळा मार्ग काढणे सोपे होते, आणि सर्व लहानसहान तपशील लक्षात ठेवल्याने गेस्ट्सना आणि मला होस्टिंगचा एक मस्त अनुभव मिळतो."
लिस्टिंग झटपट तयार करण्यासाठी अजून काही टिप्स:
लिनन्सचा दुप्पट किंवा तिप्पट साठा ठेवणे. ज्यादा शीट्स आणि टॉवेल्स ठेवल्याने बेडरूम, बाथरूम आणि किचनमध्ये त्यांची कमतरता भासत नाही आणि ताबडतोब लाँड्री पण करावी लागत नाही. मेकअप किंवा तेलासारखे हट्टी डाग पडल्यावर, लिननचा अतिरिक्त साठा असल्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
डुवेट कव्हर्स आणि उशी व गादीचे खोळ वापरा. या गोष्टींचा देखील अतिरिक्त साठा ठेवा जेणेकरून एक गेस्ट जाऊन दुसरा येण्याआधी हे झटपट बदलता येतील.
डिलिव्हरीच्या सेवांसाठी साईन अप करा. साफसफाईचे साहित्य, टॉयलेटमधील साहित्य, किराणा सामान किंवा तुम्हाला नियमितपणे लागत असलेल्या इतर गोष्टी किंवा तुम्ही गेस्टना पुरवत असलेल्या गोष्टी यांचा नियमितपणे साठा करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सारख्या स्टोअरच्या फेर्या मारायला नको.
साफसफाई, देखभाल आणि बागकाम यासाठी एक भरवशाचा बॅक-अप प्लॅन तयार ठेवा. यामुळे तुम्ही आणि तुमचे कर्मचारी उपलब्ध नसताना देखील, सगळे काम वेळेवर होईल. तुमच्या कामाचा खूप ताण पडत असेल तर एखादा को-होस्ट घेण्याचा विचार करा.
चेक आऊट टूल्स वापरून वेळ वाचवणे
चेक आऊटची प्रक्रिया अशी असावी की तुम्हाला आणि तुमच्या गेस्ट्सना फार कष्ट घ्यायला लागू नये. ही प्रक्रिया सगळ्यांसाठी सुरळीत करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले चेक आऊट टूल्स आम्ही मे महिन्यात उपलब्ध करून दिले आहेत.
नवीन वैशिष्ट्यांमध्ये ऑटोमॅटिक पुश नोटिफिकेशन्स आणि वन-टॅप चेक आऊटचा समावेश आहे. Airbnb चेक आऊटच्या आदल्या दिवशी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5:00 वाजता तुमची चेक आऊटची वेळ आणि सूचना गेस्ट्सना पाठवते. मोबाइल डिव्हाइसवर हे ॲप वापरणाऱ्या आणि पुश नोटिफिकेशन्स चालू असलेल्या कोणत्याही गेस्टना हे मेसेजेस मिळतील. ते एक बटण टॅप करून तुम्हाला चेक आऊट केल्याचे कळवू शकतात जेणेकरून तुम्ही पुढच्या गेस्टसाठी लिस्टिंग तयार करू शकता.
जोह, कॅलिफोर्नियाच्या फॉरेस्टविलमधील एक सुपरहोस्ट, चेक आऊटच्या आसपास स्वतः शेड्यूल केलेले मेसेजेस पाठवणे पसंत करतात, विशेषतः गर्दीच्या सीझनमध्ये. “मी गेस्ट्सना सांगते की पुढील गेस्ट्ससाठी अपार्टमेंटची साफसफाई करायला क्लीनर सकाळी 11:00 वाजता येईल, जेणेकरून वेळेवर चेक आऊट करणे का महत्त्वाचे आहे हे त्यांना समजेल,” त्या सांगतात.
चेक आऊट टूल्स वापरून वेळ वाचवण्याच्या अजून काही टिप्स:
चेक आऊटच्या मूलभूत सूचना निश्चित करा. तुम्ही पाच नियमित कामांच्या यादीमधून निवड करून झटपट सूचना तयार करू शकता. तुम्ही प्रत्येक कामासाठी तपशील जोडू शकता. उदाहरणार्थ, “कचरा फेकून द्या” अंतर्गत तुम्ही गेस्ट्सना कचरा एका डब्यात आणि रिसायकल होणार्या वस्तू दुसर्या डब्यात टाकायला सांगू शकता.
तुमच्या घराशी संबंधित विनंत्या समाविष्ट करा. तुमच्या सुविधांमध्ये आऊटडोअर ग्रिलचा समावेश असल्यास, तुम्ही गेस्ट्सना वापरानंतर त्याचे कव्हर परत घालायला सांगू शकता.
चेक आऊट कार्ड्स जोडा. मूलभूत चेक आऊट सूचना निश्चित केल्यावर, तुम्ही शेड्युल केलेल्या मेसेजमध्ये किंवा झटपट उत्तरामध्ये चेक आऊट कार्ड जोडू शकता, जे त्याच चेक आऊट सूचनांना लिंक केलेले असेल. पुश नोटिफिकेशन्स चालू न करता Airbnb ॲप वापरणाऱ्या गेस्ट्सना आठवण करून देण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
हंगामी सुविधा हायलाईट करणे
Airbnb ग्लोबल डेटानुसार, 2023 च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये स्विमिंग पूल असलेल्या लिस्टिंग्जच्या शोधाचे प्रमाण, 2022 मधील त्याच महिन्यांच्या तुलनेत, 60% वाढले होते. सर्वाधिक बुक झालेल्या Airbnb कॅटेगरी होत्या बीच, अप्रतिम पूल आणि केबिन्स.
तुमची लिस्टिंग अपडेट करून हंगामी वैशिष्ट्ये आणि सुविधा हायलाईट केल्याने, त्याच वैशिष्ट्यांच्या आणि सुविधांच्या शोधात असलेल्या गेस्ट्सना तुमची लिस्टिंग सापडायला आणि ती बुक करायला मदत होऊ शकते.
“माझी बहीण एक इंटिरियर डिझायनर आहे, आणि ती शहरातल्या गिफ्ट शॉपमधून सीझननुसार वस्तू उधारीवर आणून आमच्या जागेचा लुक बदलते,” असे प्लेसेंशिया, बेलीझमधील एक सुपरहोस्ट फ्रेड सांगतात. “दरवर्षी आम्ही नवीन सुविधा जोडतो - येऊन गेलेल्या गेस्ट्सना पुन्हा आकर्षित करण्यासाठी काहीतरी खास. आम्ही एक गझिबो, एक ऑब्जर्व्हेटरी आणि पाण्याच्या वर एक बार समाविष्ट केले आहेत.
हंगामी सुविधा हायलाईट करण्याविषयीच्या अजून काही टिप्स:
सीझनच्या वैशिष्ट्यांचे फोटो जोडा. तुमच्या संभाव्य गेस्ट्सना उन्हाळ्यात तुमचा अप्रतिम पूल, आऊटडोअर ग्रिल, हॅमॉक किंवा बीचकडे जाणारा मार्ग दाखवा. थंडीच्या दिवसांमध्ये फायरप्लेस, हॉट टब किंवा लिफ्टपर्यंत घेऊन जाणारे स्की-इन/स्की-आऊट ट्रेलचे फोटो शेअर करा.
तुमच्या लिस्टिंगचे वर्णन रीफ्रेश करा. तुम्ही अलीकडेच फ्रेड आणि त्याच्या बहिणीसारखी प्रॉपर्टीमध्ये सुविधांची भर घातली आहे का? तुमच्या लिस्टिंगच्या वर्णनामध्ये त्यांचा नवीन म्हणून उल्लेख करा आणि फोटो जोडा.
तुमचे लिस्टिंगचे तपशील अपडेट करा. तुमच्या अकाऊंटच्या सेटिंग्जचा रिव्ह्यू करा आणि सध्या तुमच्या लिस्टिंगमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांच्या समोरचा चेकमार्क तुम्ही निवडला असल्याची खात्री करा. जेव्हा तुम्हाला अधिक तपशील समाविष्ट करण्यास सांगितले जाईल, तेव्हा तसे करा.
या लेखात दिलेल्या माहितीत लेख पब्लिश झाल्यानंतर बदल झाला असल्याची शक्यता आहे.