दीर्घकालीन वास्तव्यादरम्यान गेस्ट्सना खुश करण्याचे सोपे मार्ग
तुमच्याकडे 28 किंवा त्यापेक्षा जास्त रात्री राहणाऱ्या गेस्ट्सच्या गरजा वीकेंडला येणाऱ्या गेस्ट्सपेक्षा निराळ्या असतात. त्या गरजांची पूर्तता केल्याने त्यांच्यासाठी प्रवासाचे चांगले अनुभव तयार होतात—आणि यामुळे तुम्हालाही अधिक फाइव्ह-स्टार रिव्ह्यू मिळू शकतात.
तुमच्या मासिक गेस्ट्सच्या समाधानासाठी, ते आल्यानंतर साधारण एक आठवड्याने ही सोपी कामे करून पहा.
गेस्ट्सना काय हवे आहे ते विचारणे
तुम्ही एखादी वस्तू घरी नेहमी वापरता, पण ती पॅक करून आणलेली नसली तर त्याशिवाय एक महिना काढणे कठीण होते. होस्ट म्हणून तुम्ही तुमच्या गेस्ट्सना विचारू शकता की त्यांना काही महत्त्वाच्या वस्तू पाहिजेत का.
त्यांना एखादी उशी किंवा ब्लँकेट पाहिजे असेल, छत्री किंवा किचनमधील वस्तू पाहिजे असेल, जसे की टोस्टर किंवा ब्लेंडर. अशा लहान-सहान, पण सोयीच्या वस्तू पुरवल्याने त्यांची मोठी सोय होईल आणि तुम्ही भावी गेस्ट्सना सुद्धा त्याच वस्तू पुरवू शकाल.
लीवेनवर्थ, वॉशिंगटन येथील सुपरहोस्ट अँड्रिया सांगतात की दीर्घ मुदतीच्या वास्तव्यासाठी त्या किचन व्यवस्थित भरलेले ठेवतात. "माझ्या गेस्ट्ससाठी मी नेहमीच सुट्टा चहा, कॉफी, कॉफी बनवण्यासाठी अनेक उपकरणे आणि स्वयंपाकाचे तेल आणि मसाले तयार ठेवते."
वास्तव्याच्या मधल्या काळात सफाईची ऑफर देणे
बऱ्याच गेस्ट्सना त्यांच्या वास्तव्याच्या दरम्यान विनामूल्य स्वच्छता करून दिलेली आवडते. त्यांच्यासाठी हा एक मोठा फायदा असतो आणि तुम्हाला यावेळी सामान्य देखरेख करण्याची संधी मिळते, जसे की बॅटरी, बल्ब आणि फिल्टर बदलणे.
सॅन फ्रान्सिस्कोमधील सुपरहोस्ट, ॲनेट यांना गेस्ट्सना हे सांगायला आवडते: "तुम्ही येथे किमान एक महिना राहणार असल्याने काहीतरी असे होईल ज्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यावे लागेल. कृपया स्वतः काही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका, मग ते कितीही लहान असो. ताबडतोब आम्हाला सांगा आणि आम्ही ते काम करू."
वास्तव्य सुरू असताना मधल्यावेळी स्वच्छतेचे शेड्यूल तयार करताना गेस्ट्सना हे सांगणे योग्य आहे की त्या जागेमध्ये कोण येणार आहे, ते काम केव्हा सुरू करतील आणि त्यांना तिथे किती वेळ लागू शकेल. स्पष्ट अपेक्षा सेट केल्याने असे कळून येते की तुम्हाला त्यांच्या प्रायव्हसीची आणि सुरक्षेची काळजी आहे.
तुम्ही शुल्का आकारून अधिक वेळा सेवा देऊ शकता, अशाने तुमच्या स्वच्छता टीमचा खर्च काही प्रमाणात निघू शकेल आणि तुमची जागाही स्वच्छ राहील.
स्थानिक सेवांची शिफारस करणे
गेस्ट्सना तुमच्या जागेबद्दल तुमच्याएवढी माहिती नसते. त्यांना स्थानिक सल्ला देण्यासाठी मेसेज पाठवून किंवा एखादे गाईडबुक तयार करून त्यांच्या प्रवासात त्यांची मदत करता येईल.
एक लहानशी यादी तयार करा, अशा सेवांबद्दल विचार करा ज्या दीर्घ मुदतीसाठी वास्तव्य करणाऱ्या गेस्ट्ससाठी गरजेच्या असू शकतात, जसे की कुत्र्यांना फिरवून आणणे, सामान डिलिव्हर करणे किंवा लॅपटॉपची दुरुस्ती. स्थानिक दुकानांची शिफारस केल्याने तुम्ही तुमच्या गेस्ट्सची मदत तर करताच, तसेच तुमच्या कम्युनिटीला सपोर्टसुद्धा करता.
गेस्ट्सना अशा ठिकाणांबद्दल सांगा जी तुम्हाला आवडतात, विशेषकरून कमी प्रसिद्ध जागा ज्या त्यांना आवडू शकतात. त्यांच्या वास्तव्यादरम्यान होणाऱ्या इतर मोठ्या उत्सवांचा किंवा सार्वजनिक कार्यक्रमांचा उल्लेख नक्की करा.
विशेष स्पर्श देणे
अशा खास गोष्टींमुळे गेस्ट्सना बरे वाटते. तुम्ही धन्यवादपर काही शब्द लिहून एखादे कार्ड (“आमच्यासोबत वास्तव्य केल्याबद्दल धन्यवाद”) आणि एखादे विचारपूर्वक गिफ्ट दारावर ठेवू शकता:
- स्थानिक वाईनची बाटली
- ताजी तयार केलेली ब्रेड
- एखादी स्थानिक वस्तू
सॅन फ्रान्सिस्कोमधील सुपरहोस्ट डोना म्हणतात, “वस्तू जेवढी लहान आणि हलकी असेल, तेवढे चांगले.” “मला स्वतःला खाण्याच्या वस्तू आवडतात, अशाने पाहिजे असल्यास ते त्या वस्तूचा लगेच वापर करू शकतात.” स्थानिक वस्तू गेस्ट्सना खूष करू शकतात आणि चेक आऊट केल्यानंतर त्यांना यामुळे तुमच्या जागेची आठवण राहील.