ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांचे फोटोज कसे घ्यावेत
बुकिंग करण्यापूर्वी गेस्ट्सना जाणून घ्यायचे आहे की ते घरामध्ये सुरक्षितपणे आणि आरामात फिरू शकतील. ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांचे स्पष्ट, तपशीलवार फोटोज शेअर केल्याने तुमचे लोकेशन त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करते की नाही हे ठरवण्यात गेस्ट्सना मदत होते.
“एखादी जागा माझ्यासाठी योग्य आहे का हे मला एका फोटोमधून कळते,” व्हीलचेअर वापरणारे गेस्ट जॉर्ज म्हणतात. “किंवा, ‘सॉरी मित्रांनो, तुम्ही कृपया ते टेबल हलवू शकता का?’ हे एकदम ठीक आहे.”
लिस्टिंगच्या ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये विभागात दाखवले जाण्यापूर्वी Airbnb सर्व ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये आणि फोटोंचा आढावा घेते; हा विभाग इमेज गॅलरी किंवा फोटो टूरपेक्षा वेगळा आहे.
सामान्य मार्गदर्शक तत्त्वे
तुमच्या लिस्टिंगमध्ये अॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये जोडण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा. एखादा फोटो विशिष्ट निकषांची पूर्तता करत नसल्यास, आम्ही तुम्हाला वेगळा फोटो अपलोड करण्यास किंवा तुमच्या लिस्टिंगमधून हे वैशिष्ट्य काढून टाकण्यास सांगू शकतो.
- तुमच्या घरातील प्रत्येक ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्याचा किमान एक फोटो द्या.
- दरवाजाच्या खांबांची रुंदी आणि काऊंटरटॉपची उंची यांसारखी परिमाणे दाखवण्यासाठी फोटोंमध्ये एक टेप समाविष्ट करा.
- गेस्ट्सना रूम किंवा जागा अधिक चांगल्या प्रकारे समजण्यात मदत करण्यासाठी, प्रत्येक वैशिष्ट्याचे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अनेक फोटो अपलोड करा.
- रूम्स आणि इतर जागांची ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यात मदत करणारी वर्णनात्मक कॅप्शन्स लिहा, जसे की लाईटिंगबद्दलचे तपशील.
- केवळ काही भाग ॲक्सेसिबल असल्यास, गेस्ट्सना तसे कळू द्या. उदाहरणार्थ, “पायऱ्यांशिवाय ॲक्सेस, रुंद दरवाजा आणि ग्रॅब बार्स असलेले हे घरातील एकमेव बाथरूम आहे.”
फोटोग्राफीबाबत टिप्स
तुमच्या घराच्या ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांचे फोटोज काढण्यासाठी या टिप्स वापरून पहा.
घरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्यांशिवाय ॲक्सेस
घराच्या प्रवेशद्वारावर किंवा त्याकडे जाणाऱ्या मार्गावर पायऱ्या, जिने किंवा 2 इंचापेक्षा (5 सेंटीमीटर्स) जास्त उंचीचे अडथळे नाहीत हे दाखवा. यामध्ये बाहेरील साईडवॉक्स, हॉलवेज, एलिव्हेटर्स आणि आत जाण्यासाठी गेस्ट्सना आवश्यक असलेली इतर वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.
- घराच्या प्रवेशद्वाराच्या मार्गावरील सर्व दरवाजे आणि गेट्स उघडा. पोर्टेबल किंवा थ्रेशोल्ड रॅम्प्स वापरून पायऱ्यांशिवाय ॲक्सेस दिला जात असल्यास, ते रॅम्प्स त्यांच्या ठिकाणी ठेवले आहेत याची खात्री करा.
- गेस्ट्स जिथे येतात किंवा पार्क करतात तिथून फोटो घ्यायला सुरुवात करा आणि त्यानंतर प्रवेशद्वारापर्यंतच्या मार्गावर प्रत्येक 10 फुटांवर (3 मीटर्स) एक फोटो घ्या. मार्गाचा पृष्ठभाग कॅप्चर करण्यासाठी कॅमेरा जमिनीकडे किंचित झुकवा.
- प्रवेशद्वाराचा बाहेरून एक स्वतंत्र फोटो घ्या. खुल्या दरवाजाचा फोटो काढण्यासाठी कमीतकमी 8 फूट (2.4 मीटर्स) मागे जा आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंचा मार्ग दाखवा.
रूमचा पायऱ्यांशिवाय ॲक्सेस
कोणत्या रूम्स आणि इतर जागा पायऱ्या, सांधे किंवा 2 इंचांपेक्षा (5 सेंटीमीटर्स) जास्त उंच उंबरठ्यांशिवाय ॲक्सेसिबल आहेत ते दाखवा. आतील आणि बाहेरील जागांचे फोटोज घ्या, ज्यात सर्व डेक्स, बाल्कनीज आणि पॅटिओज यांचा समावेश असेल.
- उंबरठ्याचा क्लोज-अप फोटो काढण्यासाठी दरवाजा पूर्णपणे उघडा. फ्लोअर प्लेट किंवा सांध्याच्या दोन्ही बाजूंचा मार्ग कॅप्चर करण्यासाठी कॅमेरा जमिनीकडे किंचित झुकवा.
- रूमच्या ॲक्सेसचा बाहेरून फोटो काढण्यासाठी कमीतकमी 5 फूट (1.5 मीटर्स) मागे जा.
- पुन्हा हीच पद्धत वापरून रूमच्या आतील बाजूने असाच फोटो घ्या.
- जर रूमला अनेक प्रवेशद्वारे असतील, तर प्रत्येकाचा फोटो घ्या.
- त्या रूमच्या मुख्य दरवाजाकडे जाणारा मार्ग दाखवण्यासाठी अतिरिक्त फोटोज घ्या.
रुंद प्रवेशद्वारे
तुमच्या घराचे कोणते दरवाजे किमान 32 इंच (81 सेंटीमीटर्स) रुंद आहेत ते दाखवा. पुढच्या दरवाजाची आणि इतर प्रवेशाच्या पॉईंट्सची नेमकी रुंदी जाणून घेतल्याने गेस्ट्सना एखादी जागा त्यांच्या व्हीलचेअर किंवा मोबिलिटी डिव्हाईससाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यात मदत होते.
- दरवाजा शक्य तितका रुंद उघडा. संपूर्ण फ्रेममध्ये मेजरिंग टेप धरा. मेजरिंग टेपची दोन्ही टोके आणि त्यावरील नंबर्स स्पष्टपणे दिसत आहेत याची खात्री करा.
- कमीतकमी दोन फोटोज घ्याः फ्रेममध्ये मेजरिंग टेप धरून दरवाजाचा एक फोटो आणि अंतिम मोजमापाच्या क्लोज-अपचा एक फोटो, जेणेकरून ते वाचणे सोपे होईल.
“दरवाजाचे मोजमाप दिलेले असेल, तर माझी चेअर त्यामध्ये योग्यरीत्या फिट होणार की नाही हे मला माहीत असते,” जॉर्ज म्हणतात.
बाथरूममध्ये केलेले बदल
पायऱ्यांशिवाय असलेले शॉवर, टॉयलेट आणि शॉवर ग्रॅब बार्स आणि शॉवर किंवा बाथ चेअरसह गेस्ट्सना बाथरूममध्ये हालचाल करण्यास मदत करणारी वैशिष्ट्ये दाखवा. तुमच्याकडे असलेल्या विशिष्ट वैशिष्ट्यांच्या क्लोज-अप दृश्यांसह, संपूर्ण बाथरूम आणि शॉवर दाखवणारे फोटोज द्या.
- पायऱ्यांशिवाय असलेले शॉवरः पडदा किंवा दरवाजे उघडा. 1 इंचापेक्षा (2.5 सेंटीमीटर्स) जास्त उंच उंबरठे किंवा वॉटर गार्ड्स नाहीत हे दाखवण्यासाठी कॅमेरा जमिनीकडे किंचित झुकवा.
- ग्रॅब बार्स: शॉवरमध्ये आणि टॉयलेटजवळ ग्रॅब बार्सचे लोकेशन स्पष्टपणे दाखवा. तुम्ही ही वैशिष्ट्ये बाथरूमच्या विस्तीर्ण शॉट्समध्ये एकत्रितपणेदेखील दाखवली असली, तरीही प्रत्येकाचे स्वतंत्र फोटोज घ्या.
- शॉवर किंवा बाथ चेअर: शॉवर किंवा बाथमधील संपूर्ण सीट, तसेच ती भिंतीला लावलेली आहे की फ्रीस्टँडिंग आहे हे दाखवा.
दिव्यांगांसाठी पार्किंग स्पॉट
एका वाहनासाठी तुमची खाजगी पार्किंगची जागा दाखवा, जी कमीतकमी 11 फूट (3.35 मीटर्स) रुंद आहे, किंवा दिव्यांग व्यक्तीसाठी नियुक्त केलेली सार्वजनिक पार्किंगची जागा दाखवा.
- खाजगी पार्किंग: रेफरन्ससाठी गेस्टच्या जागेच्या शेजारी एक कार पार्क करून दूरवरून फोटो घ्या. किंवा जागेची रुंदी कन्फर्म करण्यासाठी मेजरिंग टेप वापरा.
- सार्वजनिक पार्किंग: दिव्यांग व्यक्तींसाठी जागा राखीव असल्याचे दर्शवणारी चिन्हे आणि रस्त्यावरील इतर खुणा कॅप्चर करा.
गेस्टच्या प्रवेशद्वाराकडे जाणारा प्रकाशित मार्ग
अंधार पडल्यावर गेस्टच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या मार्गावर किंवा साईडवॉकवर चांगला प्रकाश असतो हे दाखवा.
- मार्ग प्रकाशित करणारे बाहेरील सर्व लाईट्स सुरु करा.
- बाहेरच्या लाईटिंगला अडथळा निर्माण करणारे कोणतेही आतील लाईट्स बंद करा.
- मार्गावर बाहेरील लाईट्स कुठे आहेत हे तुमच्या फोटोजमध्ये दिसेल याची खात्री करा.
हॉईस्ट्स
तुमच्या घरातील असे मोटराईझ्ड किंवा मॅन्युअल डिव्हाईसेस दाखवा जे गेस्ट्सना व्हीलचेअर, स्विमिंग पूल किंवा हॉट टबमध्ये जाण्यात आणि तिथून बाहेर येण्यात मदत करण्यासाठी विशेषतः डिझाईन केलेले आहेत.
- हॉईस्ट छताला लावलेले आहे की फ्रीस्टँडिंग आहे यासह, त्याचे फोटोज जास्तीत जास्त तपशिलाने काढा.
- बेड, टॉयलेट, पूल किंवा हॉट टबच्या शेजारी त्याचे लोकेशन स्पष्टपणे दाखवणारा विस्तीर्ण शॉट घ्या.
- वापरात असताना त्याचा आकार आणि स्थिती दाखवण्यासाठी आजूबाजूचा भाग कॅप्चर करा.
लिस्टिंगमध्ये अॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये जोडण्यासाठीच्या आवश्यकतांबद्दल अधिक जाणून घ्या.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.