सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

मेसेजेस टॅबचा जास्तीत जास्त उपयोग करणे

मेसेजेस जलद आणि सहजपणे शोधणे, पाठवणे आणि शेड्युल करण्यासाठी हे सल्ले वापरून पहा.
Airbnb यांच्याद्वारे 5 डिसें, 2025 रोजी

मेसेजेस टॅब हा तुमचा Airbnb इनबॉक्स आहे. हे तुमचे होस्टिंग, प्रवास आणि सपोर्टशी संबंधित सर्व मेसेजेस एकाच ठिकाणी ठेवते. मेसेजेस टॅबमधील वैशिष्ट्यांच्या सहाय्याने तुम्ही हे करू शकता:

  • मेसेजेस फिल्टर आणि सर्च करा.
  • झटपट उत्तरे नावाच्या पूर्व-लिखित टेम्प्लेट्ससह मेसेजेस पाठवा आणि शेड्युल करा.
  • अलीकडील मेसेजेस बदला आणि अनसेंड करा.
  • एका थ्रेडमध्ये रिझर्व्हेशनमधील प्रत्येक गेस्टशी कम्युनिकेट करा.
  • गेस्ट्स तुमचे मेसेजेस कधी पाहतात हे वाचल्याच्या पावत्या वापरून पहा. 
  • तुमचे गाईडबुक शेअर करा आणि स्थानिक Airbnb अनुभव आणि सेवांची शिफारस करा.
  • मेसेजेसमध्ये फोटोज आणि व्हिडिओज अटॅच करा.

मेसेजेस फिल्टर करणे आणि शोधणे

मेसेजेस टॅब मेसेजेसची कॅटेगरीजमध्ये क्रमवारी लावतो. मुख्य कॅटेगरीज म्हणजे घरे, अनुभव, सेवा, प्रवास, सपोर्ट आणि डायरेक्ट मेसेजेस

सर्व, हा डिफॉल्ट व्ह्यू फक्त तुमच्या Airbnb अकाऊंटशी संबंधित कॅटेगरीज दाखवतो. प्रकारानुसार मेसेजेस फिल्टर करण्यासाठी कोणतीही कॅटेगरी निवडा. 

घरे यामध्ये, तुम्ही हे अतिरिक्त फिल्टर्स वापरू शकता:

  • न वाचलेले मध्ये फक्त न उघडलेले मेसेजेस दाखवले जातात.
  • ट्रिपचा टप्पा यामध्ये रिझर्व्हेशनच्या विनंत्या, आगामी रिझर्व्हेशन्स, सध्या होस्ट करत असलेली किंवा मागील रिझर्व्हेशन्स यानुसार मेसेजेसची क्रमवारी लावली जाते.
  • लिस्टिंग्ज यामध्ये, तुमच्याकडे एकापेक्षा जास्त लिस्टिंग असल्यास, लिस्टिंगनुसार मेसेजेसची क्रमवारी लावली जाते.
  • स्टार केलेले तुम्ही केवळ स्टारने मार्क केलेले मेसेजेसच दाखवते.

अनुभव आणि सेवा यामध्ये, तुम्ही हे अतिरिक्त फिल्टर्स वापरू शकता:

  • न वाचलेले मध्ये फक्त न उघडलेले मेसेजेस दाखवले जातात.
  • स्टार केलेले तुम्ही केवळ स्टारने मार्क केलेले मेसेजेसच दाखवते.
  • ग्रुप मेसेजेस एकापेक्षा जास्त बुकिंग गेस्ट्ससह असलेल्या संभाषण थ्रेड्सची रिझर्व्हेशननुसार क्रमवारी लावतात.

तुमच्याकडे को-होस्ट असल्यास किंवा तुम्ही सुपरहोस्ट ॲम्बेसेडर असल्यास, तुम्हाला हे फिल्टर्स मेसेजेस टॅबमध्ये आढळतील:

  • को-होस्ट तुमच्या आणि लिस्टिंगवरील कोणत्याही को-होस्ट्समधील संभाषणे दाखवते.
  • सुपरहोस्ट अ‍ॅम्बेसेडर तुम्ही आणि तुमच्याशी मॅच केलेल्या होस्ट्समधील मेसेजेस दाखवते.

प्रवास फिल्टर तुम्ही गेस्ट म्हणून पाठवलेले आणि तुम्हाला आलेले मेसेजेस दाखवते. सपोर्ट फिल्टर तुमची Airbnb सपोर्टसोबतची संभाषणे दाखवते.

विशिष्ट संभाषण शोधत आहात? तुम्ही नावे, शब्द किंवा वाक्यांश वापरून मेसेजेस शोधू शकता. रिझल्ट्स तुम्ही लागू केलेले कोणतेही फिल्टर्स विचारात घेतात, ज्यामुळे तुम्हाला संभाषणे जलद शोधण्यात मदत होते.

झटपट उत्तरे पाठवणे

झटपट उत्तर म्हणजे एक लहान, पूर्व-लिखित मेसेज जो तुमच्या मेसेजिंग सेटिंग्जमध्ये टेम्प्लेट म्हणून सेव्ह केला जातो.

गेस्टच्या नावासारख्या तपशिलांसाठी असलेले प्लेसहोल्डर्स तुमच्या लिस्टिंगमधून किंवा रिझर्व्हेशनमधून माहिती काढून घेऊन प्रत्येक मेसेज पर्सनलाईझ करतात.

झटपट उत्तरे तुम्हाला त्वरित प्रतिसाद देण्यास आणि तुमचा वेळ वाचवण्यास मदत करतात. लगेच पाठवण्यासाठी किंवा महत्त्वाच्या क्षणी नंतर डिलिव्हरीसाठी शेड्युल करण्याकरता तुमची स्वतःची झटपट उत्तरे तयार करा किंवा Airbnb च्या टेम्पलेट्समध्ये बदल करा.

घर,अनुभव किंवासेवा होस्ट्ससाठी झटपट उत्तरांबद्दल अधिक जाणून घ्या.

एखाद्या ग्रुपशी कम्युनिकेट करणे

प्रत्येक रिझर्व्हेशन मेसेजेस टॅबमध्ये एक नवीन संभाषण सुरू करते. बुकिंग गेस्ट त्यांच्यासोबत प्रवास करणार्‍या इतर गेस्ट्सना रिझर्व्हेशनमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करू शकतात. आमंत्रण स्वीकारणाऱ्या गेस्ट्सना संभाषणात जोडले जाते. 

तुम्ही एखादा अनुभव होस्ट करत असल्यास, त्याच तारखेसाठी आणि वेळेसाठी बुकिंग करणारे सर्व गेस्ट्स ऑटोमॅटिक पद्धतीने एका ग्रुप संभाषणात जोडले जातात. ते त्यांच्या सहप्रवाशांनाही सामील होण्यासाठी आमंत्रित करू शकतात.

होस्ट्स आणि को-होस्ट्स संपूर्ण ग्रुपला मेसेजेस पाठवतात. गेस्ट्स संभाषण सुरू झाल्यानंतर सामील झाले तरीही ते सर्व मेसेजेस वाचू शकतात, म्हणून तुम्हाला तुमचा मेसेज पुन्हा पाठवण्याची गरज नाही.

सामील झालेल्या प्रत्येकाचा समावेश असलेल्या लिस्टसह रिझर्व्हेशन आणि संभाषणाविषयी अधिक माहितीसाठी तपशील बटणावर टॅप करा. गेस्ट्सची प्रोफाईल ॲक्सेस करण्यासाठी आणि तुम्ही कुणाला होस्ट करत आहात याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांचा फोटो निवडा.

इतर मेसेजिंग फीचर्स वापरणे

मेसेजेस टॅबमधील इतर वैशिष्ट्ये होस्ट्स आणि को-होस्ट्सना गेस्ट्सशी बुकिंगपूर्वी, दरम्यान आणि नंतर तसेच एकमेकांशी संपर्क साधण्यात मदत करतात.

  • थ्रेडमध्ये उत्तरे तुम्हाला एखाद्या मेसेजला उत्तर देताना थ्रेड सुरू करू देतात, ज्यात मूळ मेसेजच्या खाली तुमचा प्रतिसाद दिसतो.
  • एडिटिंग टूल्स तुम्हाला मेसेज पाठवल्यानंतर 15 मिनिटांच्या आत त्यात बदल आणि 24 तासांच्या आत मेसेज अनसेंड करू देतात.
  • जर गेस्ट्स किंवा इतरांनी हे वैशिष्ट्य त्यांच्या अकाऊंट सेटिंग्जमध्ये बंद केलेले नसेल तर वाचल्याच्या पावत्या त्यांनी तुमचे मेसेजेस पाहिले आहेत की नाही हे दाखवतात.
  • शिफारसी वापरून तुम्ही सहजपणे तुमचे गाईडबुक शेअर करू शकता आणि फक्त काही टॅप्समध्ये स्थानिक अनुभव किंवा सेवांची शिफारस करू शकता.
  • फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग तुम्हाला तुमच्या मेसेजेसमध्ये फाईल्स अटॅच करून को-होस्ट्सना आणि बुकिंग कन्फर्म झाल्यानंतर गेस्ट्सना पाठवू देते.

मेसेजेस टॅबसंबंधी प्रश्नोत्तरे

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
5 डिसें, 2025
हे उपयुक्त ठरले का?