सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

वेळ वाचवण्यासाठी झटपट उत्तरे वापरणे

मेसेज टेम्प्लेट्समुळे गेस्ट्सना महत्त्वाचे तपशील पाठवणे सोपे जाते.
Airbnb यांच्याद्वारे 4 डिसें, 2025 रोजी

अनुभव होस्ट्सना अनेकदा वेगवेगळ्या गेस्ट्सच्या त्याच त्याच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात: पुढील आठवड्यात तुमची उपलब्धता काय आहे? आपण कुठे भेटणार आहोत? मला पावसाळी हवामानासाठी कशी तयारी करता येईल?

मेसेजेस टॅबमध्ये झटपट उत्तरे देऊन तुम्ही तुमची उत्तरे पुन्हा वापरू शकता आणि प्रत्येक वेळी झटपट प्रतिसाद देऊ शकता.

झटपट उत्तर म्हणजे काय?

झटपट उत्तर म्हणजे एक लहान, पूर्व-लिखित मेसेज असतो जो तुमच्या मेसेजिंग सेटिंग्जमध्ये टेम्प्लेट म्हणून सेव्ह केला जातो.

गेस्टच्या नावासारख्या तपशिलांसाठी असलेले प्लेसहोल्डर्स तुमच्या लिस्टिंगमधून किंवा रिझर्व्हेशनमधून माहिती काढून घेऊन प्रत्येक मेसेज पर्सनलाईझ करतात.

तुमची स्वतःची झटपट उत्तरे तयार करा किंवा Airbnb च्या टेम्प्लेट्स मध्ये बदल करा. उदाहरणार्थ, तुम्हाला उशिराने येणाऱ्या गेस्ट्सशी वारंवार संपर्क साधावा लागत असल्यास, तुमचा स्टँडर्ड प्रतिसाद झटपट उत्तर म्हणून सेव्ह करून पहा.

तुम्ही झटपट उत्तरे लगेच पाठवू शकता किंवा नंतर स्वयंचलित डिलिव्हरीसाठी शेड्युल करू शकता.

मी झटपट उत्तर कसे पाठवू?

एखाद्या गेस्टला झटपट उत्तर लगेच पाठवण्यासाठी:

  • मेसेजेस टॅबवर जा.
  • तुम्हाला ज्या संभाषणाला उत्तर द्यायचे आहे ते निवडा.
  • मेसेज लिहाच्या शेजारील अधिक चिन्हावर (+) टॅप करा.
  • झटपट उत्तर पाठवा निवडा.
  • एक झटपट उत्तर निवडा, जे तुमच्या संभाषणात दिसते.
  • मेसेजमध्ये बदल करा किंवा तो जसा आहे तसा पाठवा.
  • मेसेज पाठवण्यासाठी बाणावर () टॅप करा.

मेसेजेस टॅबमध्ये सुचवलेली उत्तरेदेखील आहेत, ज्यात गेस्टचा प्रश्न समजून घेऊन तुमच्या झटपट उत्तरांपैकी एक उत्तर सुचवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. सुचवलेले उत्तर तुमच्या संभाषणात दिसून येते, जिथे फक्त तुम्हीच ते पाहू शकता. सुचवलेले उत्तर पाठवण्यापूर्वी तुम्ही ते बदलू शकता किंवा वेगळा प्रतिसाद लिहू शकता.

मी झटपट उत्तर कसे शेड्युल करू?

सर्व गेस्ट्सना एक झटपट उत्तर ऑटोमॅटिक पद्धतीने पाठवण्यासाठी:

  • मेसेजेस टॅबवर जा.
  • तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेल्या सेटिंग्ज आयकॉनवर टॅप करा.
  • झटपट उत्तरे मॅनेज करा वर टॅप करा
  • तुम्हाला शेड्युल करायचे असलेले झटपट उत्तर निवडा आणि पुढील वर टॅप करा.
  • या वेळेसाठी शेड्युल करा वर टॅप करा आणि गेस्ट्सना मेसेज कधी मिळावा अशी तुमची इच्छा आहे ती वेळ निवडा, जसे की बुकिंग कन्फर्मेशनच्या वेळी किंवा अनुभव सुरू होण्याच्या 2 तास आधी.

बुकिंग कन्फर्मेशच्या वेळी, तुमच्याकडे 2 पर्याय आहेत: बुक करणाऱ्या प्रत्येक गेस्टसाठी थेट मेसेज शेड्युल करा किंवा पहिल्या गेस्टने बुक केल्यानंतर ग्रुप मेसेज शेड्युल करा.

जेव्हा तुम्ही ग्रुप मेसेज शेड्युल करता, तेव्हा त्याच तारखेसाठी आणि वेळेसाठी अनुभव बुक करणारे गेस्ट्स ऑटोमॅटिक पद्धतीने त्या थ्रेडमध्ये जोडले जातात. ते थ्रेडमधील सर्व मेसेजेस वाचू शकतात, म्हणून तुम्ही तुमचा मेसेज पुन्हा पाठवण्याची गरज नसते.

जेव्हा शेड्युल केलेले झटपट उत्तर पाठवण्याची वेळ येईल, तेव्हा तुम्हाला गेस्टबरोबरच्या तुमच्या संभाषणात रिमाइंडर दिसेल. तुम्ही आधीच शेअर केलेली माहिती रिपीट होत असल्यास तो मेसेज ॲडजस्ट करा किंवा पाठवू नका.

झटपट उत्तरे वापरण्यासाठी टिप्स

झटपट उत्तर संक्षिप्त आणि एकाच विषयाशी संबंधित असते तेव्हा ते उत्तम प्रकारे कार्य करते. तुम्हाला यासारख्या सामान्य विषयांसाठी मेसेजेस टॅबमध्ये पूर्व-लिखित टेम्प्लेट्स आढळतील. ती महत्त्वाच्या क्षणी पाठवून पहा.

  • बुकिंग कन्फर्मेशन: स्वतःची ओळख करून देण्यासाठी स्वागतपर नोट पाठवा आणि गेस्ट्सना काही प्रश्न किंवा विशेष विनंत्या आहेत का, जसे की विशिष्ट खाद्यपदार्थांच्या गरजा किंवा प्राधान्ये, ते विचारा.
  • तयारी करणे: अपेक्षा सेट करून गेस्ट्सना अनुभवाचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यात मदत करा, जसे की आरामदायक वाटण्यासाठी काय घालायचे किंवा काय आणायचे याबद्दलच्या सल्ल्यांसाठी हवामानाचा अंदाज पाठवणे.
  • अनुभवापूर्वी: गेस्ट्सना तुमच्या सुरुवात करण्याच्या वेळेची आणि भेटण्याच्या जागेची आठवण करून देण्यासाठी 24 तास आधी संपर्क साधा आणि तेथे पोहोचण्यासाठी स्पष्ट दिशानिर्देश द्या.
  • अनुभवानंतर: तुमच्या स्थानिक शिफारसी शेअर करा आणि गेस्ट्सना फीडबॅकची आणि सार्वजनिक रिव्ह्यूची विनंती करण्याचा विचार करा.

तुमच्या झटपट उत्तरांमध्ये फोटोज किंवा व्हिडिओज जोडल्यामुळे तुम्हाला स्वतःचा परिचय करून देण्यात, तुमच्या मीटिंगच्या जागेचे दृश्य प्रदान करण्यात किंवा अनुभवाचे हायलाईट्स कॅप्चर करण्यात मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही ॲक्टिव्हिटीदरम्यान तुमच्या गेस्ट्सचे फोटो काढले असल्यास, ते पाठवण्यापूर्वी तुमच्या “अनुभवानंतर” झटपट उत्तरामध्ये काही फोटो जोडा.

बुकिंग्ज कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही कधीही मेसेजेसमध्ये फाईल्स अटॅच करू शकता. फोटोज PNG किंवा JPG फॉरमॅटमध्ये (50 मेगाबाईट्सपर्यंत) आणि व्हिडिओज MP4 किंवा MOV फॉरमॅटमध्ये (100 मेगाबाईट्स आणि 60 सेकंदांपर्यंत) पाठवा.

लोकेशननुसार युजरचा अनुभव बदलू शकतो. या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
4 डिसें, 2025
हे उपयुक्त ठरले का?