सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

प्रभावीपणे संवाद साधा

गेस्ट्सना स्पष्ट आणि वेळेवर मेसेजेस पाठवा.
Airbnb यांच्याद्वारे 10 जाने, 2024 रोजी
26 जुलै, 2024 रोजी अपडेट केले

गेस्ट्सशी प्रभावीपणे कम्युनिकेशन केल्याने चांगल्या वास्तव्याचे रूपांतर उत्तम वास्तव्यामध्ये होण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाचे तपशील आणि रिमाइंडर्स शेअर करण्यासाठी, प्रश्नांना त्वरित उत्तर देण्यासाठी आणि आपलेपणाने स्वागत करण्यासाठी Airbnb ची मेसेजिंग वैशिष्ट्ये वापरा.

मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करणे

तुम्ही कोणत्या पद्धतीने माहिती देता यामुळे वास्तव्याचा विशिष्ट मूड सेट करण्यात मदत होते. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा:

  • उपलब्ध रहा. गेस्ट्सचे मेसेजेस त्वरित मिळण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी नोटिफिकेशन्स चालू करा. सॅन फ्रान्सिस्कोमधील होस्ट ॲनेट, गेस्ट्सना अगदी किरकोळ समस्यांसाठीही, “ताबडतोब आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही त्याची काळजी घेऊ” असे सांगतात.

  • पारदर्शकता ठेवा. गेस्ट्सनी कशाची अपेक्षा केली पाहिजे ते अचूकपणे दाखवा. “तुम्ही तुमच्या गेस्ट्सना काय मिळणार आहे असे सांगता आणि ते आल्यावर त्यांना प्रत्यक्षात काय मिळते यात तफावत नसणे गरजेचे आहे,” सॅन फ्रान्सिस्कोमधील होस्ट डॅनियल म्हणतात.

  • वागण्यात मोकळेपणा ठेवा. गेस्ट्सना आरामदायक आणि आपलेपणा वाटण्यात तुम्ही कशी मदत करू शकता हे त्यांना विचारा. “होस्ट्स म्हणून आम्हाला अपेक्षित नसलेल्या गोष्टी घडतात,” सँटा फे, न्यू मेक्सिकोमधील सुपरहोस्ट सेडी म्हणतात.

  • इतरांची काळजी घ्या. तुम्ही एखाद्या समस्येला कसा प्रतिसाद देता, यावरून गेस्ट्सच्या मनात कायमची छाप पडू शकते. न्यू साऊथ वेल्स, ऑस्ट्रेलियामधील होस्ट सल्लागार बोर्डाच्या सदस्या आणि सुपरहोस्ट फेलिसिटी म्हणतात, “सहानुभूती दाखवून आणि उपाययोजना करण्यासाठी त्वरेने काम करून, तुम्ही कठीण परिस्थितीला दुसऱ्या बुकिंगमध्ये बदलू शकता.”

महत्त्वाच्या क्षणी मेसेज पाठवणे

एक सुरळीत अनुभव देण्यासाठी आणि प्रश्नांची संख्या कमी करण्यासाठी गेस्ट्सना काय माहीत असणे आवश्यक आहे याचा अंदाज घ्या. ट्रिपच्या प्लॅनिंगमध्ये आणि प्रवासाच्या महत्त्वाच्या क्षणांमध्ये खालील बाबी समाविष्ट आहेत:

  • बुकिंगची चौकशी किंवा विनंती. गेस्ट्सनी संपर्क साधल्यावर प्रतिसाद देण्यासाठी तुमच्याकडे 24 तास असतात, पण शक्य तितक्या लवकर प्रतिसाद देणे कधीही चांगले असते. बहुतेक होस्ट्स एका तासाच्या प्रतिसाद देतात.

  • बुकिंग कन्फर्मेशन. कनेक्ट करण्यासाठी “बुकिंग केल्याबद्दल धन्यवाद” असा मेसेज पाठवा आणि तुम्ही कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपलब्ध आहात हे गेस्ट्सना कळवा.

  • आगमन. गेस्ट्सच्या आगमनाच्या एक किंवा दोन दिवस आधी ते ॲपमध्ये तुमच्या चेक इनच्या सूचना कुठे पाहू शकतात याची त्यांना आठवण करून द्या आणि लिस्टिंगमध्ये प्रवेश करण्याशी संबंधित कोणत्याही महत्त्वाच्या टिप्स असल्यास त्या शेअर करा.

  • वास्तव्यादरम्यान. गेस्ट्स आल्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्याकडे त्यांचे वास्तव्य आरामदायक करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत का हे विचारा. तुम्ही तुमच्या आवडत्या स्थानिक दुकानांची, रेस्टॉरंट्सची आणि आकर्षणांची शिफारस करू शकता.

  • गेस्ट्स गेल्यानंतर. गेस्ट्सनी चेक आऊट केल्यानंतर थोड्याच वेळानंतर त्यांना धन्यवाद देणारी आणि रिव्ह्यू देण्याची विनंती करणारी एक नोट पाठवा. तुम्हीसुद्धा त्यांच्याबद्दल शक्य तितक्या लवकर रिव्ह्यू द्या.

तुमचे मेसेजेस स्वयंचलित करणे

चांगला प्रतिसाद दर असणे हा तुमची लिस्टिंग Airbnb वर गेस्ट्सच्या सर्चेसमध्ये वर दिसण्यास मदत करणाऱ्या अनेक घटकांपैकी एक घटक आहे.

मेसेजेस टॅबमधील ही वैशिष्ट्ये वापरून सामान्यपणे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आधीच अंदाज बांधा आणि त्यांची उत्तरे त्वरित द्या:

झटपट उत्तरे

  • माहिती सहजपणे शेअर करण्यासाठी मेसेज टेम्प्लेट्स तयार करा, जसे की गाडी कुठे पार्क करायची किंवा गेस्ट्स चेक इन करण्यापूर्वी सामान ड्रॉप ऑफ करू शकतात का.

  • गेस्ट, रिझर्व्हेशन आणि लिस्टिंगचे तपशील आपोआप भरणाऱ्या शॉर्टकोड्ससह तुम्ही हे टेम्प्लेट्स पर्सनलाईज करू शकता.

  • तुम्ही झटपट उत्तरे सेट केल्यानंतर, मेसेजेस टॅबमधील एक वैशिष्ट्य AI चा वापर करून गेस्टचा प्रश्न समजून घेते आणि तुमचे सर्वात योग्य उत्तर आपोआप सुचवते.

शेड्युल केलेले मेसेजेस

  • स्टँडर्ड मेसेजेस तयार करा आणि वर नमूद केलेल्या महत्त्वाच्या क्षणांना ते गेस्ट्सना डिलिव्हर केले जातील अशाप्रकारे शेड्युल करा.

  • तुम्ही हे मेसेजेस शॉर्टकोड्ससह पर्सनलाईजदेखील करू शकता.

पब्लिकेशननंतर या लेखात असलेल्या माहितीमध्ये कदाचित बदल झालेला असू शकेल.

Airbnb
10 जाने, 2024
हे उपयुक्त ठरले का?