तुमची जागा इतकी स्वच्छ आहे की ती चकाकेल याची खात्री करणे
स्वच्छ जागा देणे हा पंचतारांकित आदरातिथ्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. होस्ट्ससाठीच्या मुख्य नियमांचा एक भाग म्हणून, जेव्हा गेस्ट्स चेक इन करतात तेव्हा Airbnb वर लिस्ट केलेल्या सर्व जागा स्वच्छ आणि आरोग्यासाठीच्या धोक्यांपासून मुक्त असाव्यात. साफसफाईची सुदृढ रणनीती असलेले होस्ट्स सर्वात यशस्वी होतील.
एक स्वच्छता धोरण तयार करा
तुम्ही हे काम स्वतः करत असलात किंवा क्लीनर भाड्याने घेत असलात तरी, गेस्ट्सच्या दोन वास्तव्यामध्ये, प्रत्येक वेळी तुमची जागा पूर्णपणे स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.
जर गेस्ट्सना बाथरूममध्ये केस किंवा सिंकमध्ये घाणेरडी भांडी पडली दिसली तर त्यांचे वास्तव्य विस्कळीत होईल. यामुळे ते खराब रिव्ह्यू लिहू शकतात किंवा त्यांच्या वास्तव्याचा कालावधी कमी करू शकतात.
तुम्ही क्लीनर भाड्याने घेत असल्यास, स्वच्छता प्रक्रिया स्वतः हजर राहून करवून घ्या जेणेकरून नेमके काय करावे लागेल हे तुम्हाला माहीत असेल. संपूर्ण काम व्यवस्थित करण्यासाठी दोन बुकिंग्ज दरम्यान तुम्ही पुरेसा वेळ शेड्युल केला आहे याची खात्री करा. तुमचे क्लीनर एखाद्या दिवशी येऊ शकले नाही तर दुसरा क्लीनर आधीच नेमून ठेवा किंवा इतर बॅकअप प्लॅन तयार ठेवा.
तुमची योजना बनवताना, इतर होस्ट्सकडील या टिप्स वापरून पहा:
- सर्वप्रथम अंथरुणांची चादरी काढा आणि ती धुण्यास सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला आवश्यक असल्यास अनेक वेळा कपडे धुण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
- सर्व पृष्ठभाग झाडून-पुसून स्वच्छ करा रिमोट्स आणि दाराची हॅंडल्स अशा जास्त स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागाकडे विशेष लक्ष द्या.
- बिछाने लावा टॉवेल्स बदला, सजावटीचे ब्लँकेट्स आणि उशा नीटनेटक्या ठेवा आणि आवश्यक असेल तिथे लिंट रोलर वापरा.
- जर हवामान ठीक असेल तर साफसफाई करताना खिडक्या उघडा आणि ताजी हवा आत येऊ द्या.
- धूळ किंवा बारीक कचरा साफ करण्यासाठी सगळ्यात शेवटी फरशी झाडून-पुसून घ्या.
ही स्वच्छता चेकलिस्ट फॉलो करा
- सर्व पृष्ठभाग झाडून-पुसून स्वच्छ केले आहेत.
- सर्व फरशा व्हॅक्यूम केलेल्या किंवा झाडलेल्या आणि पुसलेल्या आहेत.
- सर्व जागा किडे, कीटक, कोळीच्या जाळ्या, बुरशी आणि डाग रहित आहेत.
- सर्व लिनेन्स आणि टॉवेल्स स्वच्छ, ताजे आणि डागमुक्त आहेत.
- सर्व बिछाने लावलेले, फुलवलेले आणि लिंट रोल केलेले आहेत.
- सर्व शौचालये, सिंक्स, शॉवर्स आणि टब्स स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण केले आहेत.
- सर्व शॅम्पू, बॉडी वॉश, हात धुवायचा साबण किंवा भांडी धुवायचा साबण पुन्हा भरून ठेवले आहे.
- सर्व वैयक्तिक वस्तू नजरेआड ठेवल्या आहेत.
- सर्व डिशेज, कुकवेअर आणि भांडी स्वच्छ करून लावून ठेवली आहेत.
- फ्रीज, स्टोव्ह आणि ओव्हनसह किचनची सर्व उपकरणे स्वच्छ आणि वापरासाठी तयार आहेत. फ्रीजमध्ये शिल्लक असलेले कोणतेही खाद्यपदार्थ नाहीत.
- सर्व कचरा बाहेर काढला आहे.
- जागा ताजीतवानी आणि स्वच्छ दरवळणारी आहे.