एका अनुभवी सुपरहोस्टकडून कळलेली गुपिते
हायलाइट्स
कम्युनिकेशन हा चांगल्या होस्टिंगचा पहिल्या क्रमांकाचा नियम आहे
उत्तम फोटो, तपशीलवार वर्णन आणि गेस्ट्ससाठी स्पष्ट अपेक्षा सेट करून नजरेत भरा
रिझर्वेशन्स मिळवण्यासाठी कमी भाड्यापासून सुरुवात करा आणि छोटे मोठ्या समस्यांचे निराकरण करून उत्तम रिव्ह्यूज देण्यासाठी गेस्ट्सना प्रोत्साहित करा
- तुमच्या होस्टिंगचा स्तर उंचावण्यासाठी आमचे संपूर्ण गाईड वाचून अधिक शिका
2014 मध्ये जेव्हा या कार्यक्रमाची सुरुवात झाली तेव्हा सुपरहोस्ट दर्जा मिळवणारी निक्की Airbnb च्या पहिल्या होस्ट्स पैकी एक होती. तिने सलग 16 पेक्षा जास्त क्वार्टर्ससाठी हा दर्जा कायम ठेवला आहे.
निक्की हे कसे करते? सॅन फ्रॅन्सिस्कोमधील तिच्या स्वतःच्या अंगणातील एका छोट्या कॉटेजपासून सुरुवात करून ती अगदी सुरुवातीपासून होस्टिंग शिकली. त्या सिंगल लिस्टिंगने इतके चांगले प्रदर्शन केले की कुटुंबाबरोबरच्या सुट्टीच्या वेळी तिचे पूर्ण तीन बेडरूमचे घर भाड्याने देण्यास ती प्रेरित झाली.
येथे निक्की तिच्या सुपरहोस्ट यशाची गुपिते शेअर करते.
होस्ट म्हणून सुरुवात करणे
“सहा वर्षांपूर्वी, मी प्रोव्हेन्स, फ्रान्समध्ये माझ्या पहिल्या Airbnb मध्ये राहिले आणि मला ते आवडले. आइक्सच्या जुन्या शहरात हा एक छोटासा स्टुडिओ होता. त्याने आमच्या गरजा खरोखरच चांगल्या प्रकारे पूर्ण केल्या, परंतु होस्ट्सनी तो मोहक किंवा काहीही बनविण्यासाठी खरोखर जास्त प्रयत्न केले नव्हते. माझ्या लक्षात आले की जर मी त्यात थोडे पैसे घातले तर मी माझ्या अंगणात असलेल्या 200 चौरस फूट गेस्टहाऊसचे काहीतरी एकदम खास बनवू शकेन. मला वाटले की ते फक्त क्वचितच बुक केले जाईल, परंतु जेव्हा संपूर्ण आठवड्यासाठी लगेच बुक केले गेले तेव्हा मला आश्चर्य वाटले.
त्वरीत बुकिंग मिळवणे
“प्रत्येक वेळी जेव्हा मी नवीन लिस्टिंग ऑनलाइन आणते, तेव्हा मी सुरुवातीचे लिस्टिंग भाडे बाजारभावाच्या केवळ 50 -70% ठेवते, जोपर्यंत माझ्याकडे कमीत कमी तीन रिव्ह्यूज येत नाहीत (किंवा जेव्हा मला इतक्या बुकिंग विनंत्या येऊ लागतात की मी बाजारातील चालू असलेल्या भाड्यापर्यंत माझे भाडे वाढवू शकते). मी हे करते जेणेकरून मी चांगले रिव्ह्यूज न गमावता छोट्या मोठ्या समस्यांचे निराकरण करू शकेन, आणि शक्य तितक्या लवकर थोडे रिव्ह्यूज मिळवणे महत्वाचे आहे कारण त्यामुळे शोध रँकिंग्जमध्ये लिस्टिंग वर दिसते.”
Preparing a welcoming space
“सर्व काही एका चांगल्या जागेपासून सुरू होते. तो स्वच्छ असणे आवश्यक आहे. मला माझ्या जागा मोकळ्या आणि हवेशीर असलेल्या आवडतात. पसारा नसलेल्या, परंतु डिझाईन फोकल पॉइंट्ससह जे आपल्या डोळ्यांना विश्रांती घेण्यासाठी जागा देतात. ती आरामदायक देखील असावी, विशेषतः बेड्स. मी मेमरी फोम गाद्यांमध्ये मध्ये गुंतवणूक करते, आणि लोकांना त्या आवडतात. खरे तर, इतरांच्या दृष्टीकोनातून विचार करण्याचा हा एक सराव आहे. तुम्ही आपल्या जागेतून चालत जा आणि लोक त्याचा कसा वापर करतील याचा विचार करा, मग त्याभोवती तुमची डिझाइईन संकल्पना फिट करा.”
Airbnb वर सगळ्यांमध्ये उठून दिसणे
“चांगले फोटो घेतल्याने मोठा फरक पडतो. व्यावसायिक फोटोज आवश्यक आहेत. मी विचार करते की जागा काय आहे, ती कौटुंबिक जागा असो किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारच्या प्रवाशासाठी आदर्श, आणि मी तसे शीर्षकात लिहिते. खरोखर चांगले वर्णन लिहा जे खूप तपशीलवार आणि आकर्षक आहे, जेणेकरून तुम्ही एखाद्यास लिस्टिंगमध्ये ओढून आणाल. बेड्स, बेडशीट्स, विशिष्ट प्रकारच्या सोपचे ब्रँडचे नाव किंवा तुम्ही देत असलेल्या सुविधा या सर्वांचे वर्णन करा.”
गेस्टच्या अपेक्षा सेट करणे
“तुमच्या लिस्टिंगमध्ये, तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीच्या कांगोऱ्यांचे वर्णन समाविष्ट केले आहे याची खात्री करा. त्यांना प्रामाणिक आणि स्पष्ट पद्धतीने समजावून सांगा, अशा पद्धतीने की बुकिंग मधील त्यांची रुची कमी होणार नाही. तुम्ही तुमच्या गेस्ट्सना त्यांना हवी असलेली प्रॉपर्टी निवडण्यात मदत करण्यासाठी पुरेशी पारदर्शकता देणे आवश्यक आहे.”
एक उत्तम कम्युनिकेटर असणे
“माझ्यासाठी, कम्युनिकेशन हा चांगल्या होस्टिंगचा पहिल्या क्रमांकाचा नियम आहे. गेस्टशी तुमचे थेट कम्युनिकेशन पहिल्या चौकशीपासून सुरू होतो. मी नेहमीच संभाव्य गेस्ट्सना प्रत्येक बुकिंग विनंतीनंतर काही पाठपुरावा करणारे प्रश्न विचारते, उद्धट किंवा नसत्या चौकश्या करण्यासाठी न्हवे, तर केवळ त्यांच्यासाठी लिस्टिंग योग्य आहे याची खात्री करण्यासाठी. खरोखर, तुम्ही त्या वेळी 5-स्टार रिव्ह्यू मिळवण्याची प्रक्रिया सुरू करत आहात.”
होस्ट असण्याचे आश्चर्यकारक फायदे
“माझ्यासाठी सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे गेस्ट्स किती छान वागले आहेत. लोक इतकी प्रामाणिक, दयाळू आणि समजूतदार होती. आणि आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर, कमाई पाहून मला आश्चर्य वाटले. मी एवढे चांगले करेन असा विचार करून काही मी सुरुवात केली नव्हती, त्याचे रूपानंतर कारकिर्दीत होईल असा विचार तर मुळीच नाही. होस्टिंगबद्दल मला आवडलेल्या गोष्टींवर मी लक्ष केंद्रित केले आहे आणि जेव्हा संधी समोर आली तेव्हा त्याचा पाठपुरावा केला, आणि त्याचे निष्पन्न खरोखरच चांगले झाले आहे.”
हायलाइट्स
कम्युनिकेशन हा चांगल्या होस्टिंगचा पहिल्या क्रमांकाचा नियम आहे
उत्तम फोटो, तपशीलवार वर्णन आणि गेस्ट्ससाठी स्पष्ट अपेक्षा सेट करून नजरेत भरा
रिझर्वेशन्स मिळवण्यासाठी कमी भाड्यापासून सुरुवात करा आणि छोटे मोठ्या समस्यांचे निराकरण करून उत्तम रिव्ह्यूज देण्यासाठी गेस्ट्सना प्रोत्साहित करा
- तुमच्या होस्टिंगचा स्तर उंचावण्यासाठी आमचे संपूर्ण गाईड वाचून अधिक शिका