सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

कमाई डॅशबोर्डमध्ये नवीन मौल्यवान इन्साईट्स आहेत

आता तुम्ही कमाईच्या प्रकारानुसार कस्टम रिपोर्ट्स तयार करू शकता आणि फिल्टर करू शकता.
Airbnb यांच्याद्वारे 16 ऑक्टो, 2024 रोजी
16 ऑक्टो, 2024 रोजी अपडेट केले

तुमची कमाई समजून घेणे तुम्हाला अधिक यशस्वी होस्टिंग बिझनेस चालवण्यात मदत करू शकते. म्हणूनच आम्ही होस्टच्या फीडबॅकने प्रेरित होऊन कमाई डॅशबोर्डवर नवीन वैशिष्ट्ये जोडत आहोत.

  • कस्टम रिपोर्ट्स: तुम्ही निवडलेल्या कोणत्याही लिस्टिंगसाठी आणि तारखांच्या कालावधीसाठी कमाईचे रिपोर्ट्स तयार करा.
  • कमाईच्या प्रकारानुसार फिल्टर करा: तुमची कमाई वास्तव्ये, क्रेडिट्स, रिझोल्युशन्स आणि इतर अनेक गोष्टींनुसार पहा.
  • कमाई कार्ड्स: पेमेंट्स निघाली की आम्ही तुम्हाला सांगू.

कमाई डॅशबोर्डमध्ये नवीन काय आहे, यापासून सुरुवात करून तुम्हाला दिसणारी वैशिष्ट्ये कशी वापरायची ते येथे दिले आहे.

नवीन कस्टम रिपोर्ट्स

तुम्ही निवडलेल्या कोणत्याही लिस्टिंगसाठी आणि तारखांच्या कालावधीसाठी कस्टम रिपोर्ट्स तयार करा. Airbnb अजूनही तुम्ही ज्या महिन्यापासून होस्टिंग सुरू केले, अगदी त्या महिन्यापासून तुमच्यासाठी मासिक आणि वार्षिक स्टेटमेंट्स जनरेट करते.

प्रत्येक रिपोर्टमध्ये तुमची एकूण कमाई, वजावटी आणि एकूण निव्वळ पेमेंटचे विवरण दिले जाते. तुमच्याकडे हेदेखील समाविष्ट करण्याचा पर्याय आहे:

  • प्रति पेआऊट अकाऊंटनुसार एकूण कमाई दाखवणाऱ्या पेआऊट पद्धती
  • परफॉर्मन्सची आकडेवारी, उदा. बुक झालेल्या रात्री आणि वास्तव्याचा सरासरी कालावधी

काय समाविष्ट करायचे हे तुम्ही निवडल्यानंतर, तुम्ही तुमच्या रेकॉर्ड्ससाठी रिपोर्टची PDF डाऊनलोड करू शकता किंवा ईमेल करू शकता.

कमाईच्या प्रकारानुसार फिल्टर करण्याचा नवीन पर्याय

आगामी किंवा सशुल्क व्यवहारांचा आढावा घेताना तुमची कमाई त्याच्या प्रकारानुसार फिल्टर करा. प्रकारांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • वास्तव्याच्या जागा
  • अनुभव
  • क्रेडिट्स
  • रिझोल्युशन्स

तुम्ही तारीख, लिस्टिंग आणि पेआऊट पद्धतीनुसारही व्यवहार फिल्टर करू शकता.

नवीन कमाई कार्ड्स

पेमेंट येत असताना कमाई डॅशबोर्डवर कमाई कार्ड दिसते. त्यात हे दिसते:

  • पेआऊट पद्धत
  • व्यवहाराची रक्कम
  • प्रक्रियेला लागणारा अंदाजे वेळ

अधिक तपशील पाहण्यासाठी व्यवहार उघडा.

इंटरॲक्टिव्ह कमाई चार्ट

डॅशबोर्डच्या वरच्या भागात असलेला कमाईचा चार्ट हे दाखवतो:

  • मागील सहा महिन्यांतील प्रत्येक महिन्यात तुम्ही किती कमाई केली आहे
  • या महिन्यात आतापर्यंत तुम्ही किती कमाई केली आहे
  • आगामी बुकिंग्जच्या आधारावर पुढील पाच महिन्यांतील प्रत्येक महिन्यात तुम्ही किती कमाई करण्याचा अंदाज आहे

तुमची कमाई महिन्यानुसार किंवा वर्षानुसार पाहण्यासाठी चार्ट मोठा करा आणि लिस्टिंगनुसार पाहण्यासाठी फिल्टर वापरा.

कमाईच्या इंटरॲक्टिव्ह चार्टखाली, कामगिरीची आकडेवारी बुक झालेल्या एकूण रात्री आणि वास्तव्याचा सरासरी कालावधी दाखवते.

कमाईचा सारांश चालू वर्षाच्या 1 जानेवारीपासून तुमची एकूण कमाई, वजावटी आणि एकूण निव्वळ पेमेंट हायलाईट करतो.

सेटिंग्ज आणि डॉक्युमेंट्स

कमाईच्या डॅशबोर्डच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या गिअर आयकॉनद्वारे तुम्ही या गोष्टी ॲक्सेस करू शकता:

  • पेआऊट पद्धती आणि पेआऊट विभाजनाचे पर्याय
  • करदात्यांचे तपशील आणि करासंबंधी डॉक्युमेंट्स
  • कोणत्याही लिस्टिंगसाठी आणि तारखांच्या रेंजसाठी कमाईचे रिपोर्ट्स
  • संकटाच्या वेळी लोकांना सहाय्य करण्यासाठी प्रत्येक पेआऊटच्या काही टक्के रक्कम Airbnb.org ला आवर्ती स्वरूपात देणगी देणे

कमाई डॅशबोर्डची नवीन वैशिष्ट्ये वापरून पाहण्यासाठी आजच अर्ली ॲक्सेस मिळवा.

लोकेशननुसार युझरचा अनुभव बदलू शकतो.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
16 ऑक्टो, 2024
हे उपयुक्त ठरले का?