आम्ही होस्ट्सना एक स्थान कसे मिळवून देतो

सादर करीत आहोत Airbnb होस्ट सल्लागार बोर्ड आणि Airbnb होस्ट सपोर्ट फंड.
Airbnb यांच्याद्वारे 30 ऑक्टो, 2020 रोजी
वाचण्यासाठी 6 मिनिटे लागतील
3 एप्रि, 2025 रोजी अपडेट केले

Airbnb एक सार्वजनिक कंपनी बनण्याची तयारी करत असताना, आम्ही होस्ट्ससोबत आमच्या भागीदारीला अत्यंत महत्त्व देत आहोत. जगभरातील होस्ट नेतृत्वासोबत काम केल्यानंतर, आम्ही होस्ट्सना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी हा प्रोग्रॅम औपचारिकरित्या लाँच करत आहोत आणि आमच्या कंपनीच्या यशामध्ये सहभागी होण्याची संधी देत आहोत.

याचे दोन तितकेच महत्वाचे भाग आहेत:
  • Airbnb होस्ट सल्लागार बोर्ड: Airbnb वरील होस्ट्सचा एक वैविध्यपूर्ण गट जो होस्ट कम्युनिटीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि होस्ट्सच्या कल्पना ऐकल्या जातील हे सुनिश्चित करण्यासाठी Airbnb कार्यकारी क्झिक्युटिव्ह्जना नियमितपणे भेटतो
  • Airbnb होस्ट सपोर्ट फंड: एक असा फंड ज्याचा हेतू आता आणि भविष्यात आमच्या होस्ट कम्युनिटीला सपोर्ट प्रदान करणे हा असून त्याला सुरुवातीला Airbnb स्टॉकच्या 92 लाख शेअर्समधून फंडिंग केले जाईल अशी आमची अपेक्षा आहे

तुम्हाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे म्हणजे होस्ट कम्युनिटीला सपोर्ट करणाऱ्या प्रोग्रॅम्समध्ये आणि उपक्रमांमध्ये गुंतवणूक करणे—आणि आम्ही एक कंपनी म्हणून पुढचे पाऊल टाकत असताना तुमचा आवाज ऐकला जाईल याची खात्री करण्यात मदत करणे.

आम्हाला माहीत आहे की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, म्हणून येथे काही उत्तरे दिली आहेत.

होस्ट सल्लागार बोर्डची भूमिका काय आहे? ते कशावर प्रभाव पाडू शकतील?
सल्लागार बोर्ड Airbnb च्या नेतृत्वासाठी Airbnb होस्ट्सचा आवाज असेल. आम्हाला अशी अपेक्षा आहे की सल्लागार बोर्ड दर महिन्याला Airbnb ला भेटेल आणि त्यांचे एक सल्लागार मंडळ फोरम असेल
ज्याचे कार्यकारी दरवर्षी होस्ट कम्युनिटीकडून जमा केलेले प्रस्ताव सादर करतील—शिवाय, ते आपल्या प्रगतीचे अपडेट्स कम्युनिटीसह नियमित शेअर करतील.

त्यांच्या भूमिकेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे जेव्हा वितरणासाठी निधी उपलब्ध असेल तेव्हा आम्ही Airbnb होस्ट सपोर्ट फंडची गुंतवणूक कशी करावी यासंदर्भातली माहिती ते आम्हाला देतील. यामध्ये धोरणातील बदल, अनुदान कार्यक्रम आणि नवीन उत्पादनांच्या संकल्पना समाविष्ट असू शकतील. त्याआधी, सल्लागार मंडळाला अजूनही Airbnb च्या भविष्यातील व्यूहनीती आणि दीर्घकालीन योजनांवर प्रभाव पाडण्याची क्षमता असेल.

होस्ट सल्लागार बोर्डमध्ये कोण असेल आणि त्यांची निवड कशी झाली?

2021 साठी, सल्लागार बोर्डामध्ये—आमच्या कम्युनिटी सेंटरमध्ये सक्रिय असलेल्या होस्ट्ससह आमच्या होस्ट लीडर्स प्रोग्रामच्या 10 ते 15 सदस्यांचा समावेश असेल. प्रदेश, वंश, लिंग, सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी आणि होस्टच्या प्रकारासह वैविध्यपूर्ण प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी काळजी घेण्यात आली.

त्यांचा प्रारंभिक कार्यकाळ एक वर्षाचा असेल आणि भविष्यातील सल्लागार बोर्डाच्या सदस्यांसाठी निकष आणि निवड प्रक्रिया निश्चित करण्यासाठी ते जबाबदार असतील. वर्षाच्या अखेरीस तुम्हाला त्यांचा परिचय करून दिला जाईल.

होस्ट सल्लागार बोर्ड Airbnb नेतृत्वाकडे माझे प्रतिनिधित्व कसे करेल?
सल्लागार बोर्डाची भूमिका होस्ट्सना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेण्याची खात्री करणे ही आहे.

  • ते Airbnb होस्ट्स आणि Airbnb नेतृत्व यांच्यातील औपचारिक लिंक असतील, होस्ट्सच्या कल्पना सादर करण्यासाठी दर महिन्याला Airbnb सोबत मीटिंग्जमध्ये आणि दरवर्षी अधिकृत सल्लागार बोर्ड फोरममध्ये भाग घेतील
  • होस्ट कम्युनिटीसह ते नियमितपणे त्यांच्या मीटिंग्जमधील निर्णय आणि अपडेट्स शेअर करतील
  • नवीन ग्रुपसाठी, ते सल्लागार बोर्डाचे भविष्यातील सदस्य निवडण्याची प्रक्रिया देखील निश्चित करतील आणि होस्ट कम्युनिटीकडून कल्पना गोळा करण्याची औपचारिक प्रक्रिया विकसित करतील
होस्ट सल्लागार बोर्ड तुमच्या सूचना गोळा करण्यासाठी आणि तुमचा आवाज ऐकला जाईल याची खात्री करण्यासाठी आम्ही आयोजित करत असलेली सध्या चालू असलेली फीडबॅक सेशन्स आणि वर्कशॉप्सचा आधार घेत आहे. त्या भावनेने, आम्ही सल्लागार मंडळाच्या सदस्यांना या प्रोग्रॅमच्या महत्त्वपूर्ण घटकांबाबत माहिती देण्याची परवानगी देऊ इच्छितो. आम्ही वर्षाच्या अखेरीस आमच्या प्रारंभिक सल्लागार मंडळाच्या सदस्यांना भेटण्यास सुरुवात करू; कारण आम्हाला सुरुवातीपासूनच त्यांचे मार्गदर्शन समाविष्ट करायचे आहे.

मला एक कल्पना कशी सबमिट करता येईल? मला कसे कळेल की तिचा खरोखरच विचार केला गेला आहे?
आम्ही अधिकृत होस्ट सल्लागार बोर्डाच्या फोरममध्ये Airbnb लीडर्सपर्यंत पोचवल्या जाणाऱ्या कल्पना सबमिट करण्यासाठी होस्ट्सकरता औपचारिक प्रक्रिया तयार करण्यासाठी पहिल्या होस्ट सल्लागार बोर्डाबरोबर काम करू. आम्ही सल्लागार बोर्ड सदस्यांचा परिचय करून दिल्यावर याविषयी अधिक तपशील शेअर करण्याची आमची योजना आहे.

एन्डॉवमेंट म्हणजे काय?
एन्डॉवमेंट ही एक वित्तीय एंटीटी आहे, जी एखाद्या संस्थेद्वारे निर्दिष्ट केलेल्या विशिष्ट कारणांसाठी किंवा प्रोग्राम्ससाठी—या बाबतीत स्टॉक्स—फंड ठेवण्यासाठी वापरली जाते. बऱ्याच वेळा, ते ना-नफा संस्थांशी किंवा विद्यापीठांशी संबंधित असतात.

ते “मुद्दल” कायम ठेवून (या प्रकरणात, $1 अब्जचे लक्ष्य) आणि उपलब्ध असेल तेव्हा व्याजातून किंवा मुद्दलाच्या वाढीतून गुंतवणूक करून दीर्घकालीन सपोर्ट शक्य करतात.

येथे एक उदाहरण दिले आहे. एखाद्या विद्यापीठाकडे $10 कोटी एन्डॉवमेंट असू शकते, जी व्याजामुळे दरवर्षी 5% वाढेल. त्यातून विद्यापीठाला निधी कमी न होता शिष्यवृत्तीसारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी $50 लाख डॉलर्स मिळतात.

Airbnb होस्ट सपोर्ट फंड म्हणजे काय?
Airbnb यशस्वी झाल्यास, होस्ट्सना त्या यशाचा हिस्सा मिळायला हवा. होस्ट सपोर्ट फंड हा Airbnb ने तयार केलेला एक फंड असून त्याला सुरुवातीला Airbnb स्टॉकच्या 92 लाख शेअर्समधून फंडिंग केले जाईल अशी आमची अपेक्षा आहे. जेव्हा कधी त्याचे मूल्य $1 अब्ज पर्यंत पोहोचेल, तेव्हा Airbnb वरील होस्ट्सना सपोर्ट करणाऱ्या प्रोग्रॅम्सना आणि प्रस्तावांना निधी पुरवण्यासाठी $1 अब्जपेक्षा जास्त रकमेचा वापर सुरू करण्याचे आमचे नियोजन आहे.

आम्ही हा प्रोग्रॅम डिझाइन करत असताना होस्ट्सकडून मिळालेला एक महत्त्वाचा फीडबॅक म्हणजे लवचिकतेला परवानगी देणे. म्हणूनच आम्ही हा सपोर्ट फंड कसा वापरता येईल याविषयी होस्ट कम्युनिटीकडून नवीन कल्पना आणि फीडबॅक मागू—आणि म्हणूनच आम्ही दरवर्षी फंडिंग करत असलेले प्रोग्रॅम्स त्या फीडबॅकच्या आधारे बदलू शकतात.

एन्डॉवमेंटचे वितरण कसे केले जाईल?
एन्डॉवमेंट होस्ट्सच्या फायद्यासाठी तयार केली गेली होती आणि त्या त्या वर्षात निधीचे वितरण होस्ट फीडबॅक आणि आमच्या होस्ट सल्लागार बोर्डद्वारे निश्चित केले जाईल. सहाय्य आवश्यक असलेल्या होस्टच्या एका छोट्या गटावर किंवा एखादा विशिष्ट महत्त्वाचा टप्पा गाठला आहे त्यांच्यावर हे केंद्रित केले जाऊ शकते—किंवा ज्यातून सर्वांना फायदा होईल अशा नवीन उत्पादनात गुंतवणूक केली जाऊ शकते.

होस्ट कार्यशाळांमध्ये चर्चा झालेल्या संभाव्य प्रोग्राम्सच्या उदाहरणांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • संकटाच्या वेळी होस्ट्ससाठी आपत्कालीन निधी
  • होस्ट्सच्या यशाला सहाय्य करण्यासाठी नवीन उत्पादनांमध्ये गुंतवणूक
  • Airbnb चे मिशन सर्वांत पुढे नेणाऱ्या होस्ट्सच्या निवडक गटाला वार्षिक पेआऊट
  • होस्ट्सना आणि त्यांच्या कुटुंबियांना शैक्षणिक खर्चासाठी सहाय्य करण्यासाठी अनुदान प्रोग्राम्स

हा प्रोग्राम लवचिक असेल आणि 2020 सुपरहोस्ट रिलीफ फंडमधून शिकलेल्या गोष्टींवर आधारित, वितरण होईल त्या प्रत्येक वर्षी होस्ट्सकडे कम्युनिटीमध्ये कशी गुंतवणूक केली जाते, यावर प्रभाव पाडण्याची क्षमता असेल.

आम्हाला सल्लागार बोर्डाचे सुरुवातीपासून मार्गदर्शन हवे आहे, म्हणून आम्ही वर्षाच्या अखेरीस आमच्या दृष्टिकोनाबाबत सल्लामसलत करण्यासाठी त्यांना भेटू.

पैसा कसा वापरला जातो याचा निर्णय कोण घेईल?
होस्ट्सना फायदा होईल आणि होस्ट्सच्या कल्पना आणि फीडबॅकद्वारे आकार दिला जाईल अशी दीर्घकाळ टिकणारी देणगी निधी तयार करण्याचा आमचा हेतू आहे. फंड्सचे वितरण कसे करावे याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार Airbnb कडे असला तरी आम्ही ते होस्ट कम्युनिटीच्या सल्ल्याने आणि फीडबॅकने करू.

होस्ट सल्लागार बोर्ड, होस्ट कम्युनिटीच्या कल्पना मांडण्यासाठी अधिकृत सल्लागार बोर्डाच्या फोरम्ससह—कल्पनांना पुढे आणण्यासाठी नियमितपणे Airbnb कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेईल.

जर पैसे कुठे जातील याबाबत कंपनीचे म्हणणे अंतिम असेल तर सपोर्ट फंड खरोखरच होस्ट्सद्वारे ठरवला जातो का?
जर होस्ट्सना त्याद्वारे सक्षम आणि समर्थित वाटत असेल तरच हा प्रोग्राम यशस्वी होईल, म्हणूनच आम्ही त्याकडे मोठ्या चित्राचा एक भाग म्हणून पाहतो. होस्ट्सना मत मांडण्याची संधी, औपचारिक प्रस्ताव प्रक्रिया आणि आम्ही कालांतराने होस्ट कम्युनिटीमध्ये कशी गुंतवणूक करतो त्याला आकार देण्यासाठी अर्थपूर्ण निधी देणाऱ्या प्रोग्राम्सचा एक संच तयार करणे हा आमचा हेतू आहे.

Airbnb सर्व गुंतवणुकींबद्दल स्वत: निर्णय घेईल, पण आम्ही ज्या प्रस्तावांना निधी देतो ते आमच्या होस्ट कम्युनिटीकडून येतील किंवा कम्युनिटीने तयार केलेले असतील.

फंडमधून पैसे काढण्यापूर्वी फंडाचे मूल्य $1 अब्जपर्यंत पोहोचण्याची आम्ही प्रतीक्षा का करत आहोत?
हा सपोर्ट फंड ही आमच्या होस्ट्समधील एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे आणि जोपर्यंत Airbnb आहे तोपर्यंत ती अस्तित्त्वात राहावी हा हेतू आहे. आमची अशी इच्छा आहे की त्या यशातून केवळ आजच्या होस्ट्सनाच नव्हे तर Airbnb कम्युनिटीमध्ये सामील होणाऱ्या भविष्यातील होस्ट्सना देखील सपोर्ट करता यावा.

हा सपोर्ट फंड सुरुवातीला $1 अब्जपर्यंत वाढू दिल्याने आम्हाला भविष्यात नवीन प्रस्ताव आणि प्रोग्रॅम्ससाठी त्यातून पैसे काढण्याच्या अधिक संधी मिळतील, जेणेकरून विस्तारित कालावधीत होस्ट्सच्या प्रस्तावांना फंडिंग करण्यात मदत होईल.

फंडाचे मूल्य काय आहे याची आम्ही तुम्हाला नियमितपणे माहिती देऊ आणि ते $1 अब्ज या मर्यादेपर्यंत पोहोचण्यापूर्वी, आम्ही कम्युनिटीकडून फीडबॅक आणि प्रस्ताव गोळा करत राहू आणि आज जसे आम्ही त्यांना निधी देत आहोत तसे त्यांना निधी देत राहू.

जर देणगी कमी झाली किंवा $ 1 बिलियन पर्यंत पोहोचली नाही तर काय होईल?
आम्हाला आशा आहे की देणगी $ 1 बिलियनपर्यंत पोहोचेल आणि कालांतराने देणगी इतकेच आम्ही कंपनीच्या एकूण मूल्याच्या 2% पर्यंत अतिरिक्त स्टॉक योगदान देऊ शकू.

या दरम्यान, आम्ही आमच्या होस्ट सल्लागार बोर्डाच्या मदतीने आणि प्रभावासह होस्ट कम्युनिटीकडून येणाऱ्या कल्पना आणि प्रस्तावांमध्ये गुंतवणूक करत राहू.

Airbnb चे कम्युनिटी ग्रँट्स काय आहे आणि ते कसे काम करते?
देणगी $1 बिलियनपर्यंत पोहोचण्यापूर्वी, थेट Airbnb द्वारा फंड केलेले, ना-नफा संस्था किंवा होस्ट्सच्या स्थानिक कम्युनिटीजमधील उपक्रमांना सहाय्य करण्यासाठी, दरवर्षी $10 मिलियन ग्रँट्समध्ये देण्याची आमची योजना आहे. होस्ट सल्लागार बोर्डाकडे होस्ट फीडबॅकच्या आधारे आम्ही कोणाचे समर्थन करतो यावर प्रभाव पाडण्याची क्षमता असेल.

तुम्ही हे उपक्रम कसे विकसित केले?
आम्ही विस्तृत होस्ट फीडबॅकसह हे उपक्रम विकसित केले आहेत. विविध प्रकारच्या होस्ट्ससह अनेक वर्कशॉप्स आणि फोकस ग्रुप्समधून आम्ही 2019 आणि 2020 मध्ये फीडबॅक गोळा करण्यास सुरुवात केली. होस्ट्सच्या भागीदारीत याची संपूर्ण व्याप्ती डिझाईन केली जाईल—जी आमच्या व्हिजननुसार तर खरी आहेच शिवाय गेल्या वर्षभरात होस्ट्ससह आमच्या वर्कशॉप्सचा थेट परिणाम आहे.

Airbnb
30 ऑक्टो, 2020
हे उपयुक्त ठरले का?