रिमोट वर्कर्ससाठी तुमची जागा आरामदायी कशी करायची

वेगवान वायफाय आणि स्वतंत्र वर्कस्पेससारख्या सुविधा गेस्ट्सना आकर्षित करू शकतात.
Airbnb यांच्याद्वारे 11 मे, 2022 रोजी
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
11 मे, 2022 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

रिमोट वर्क बऱ्याच ठिकाणी अधिकाधिक सामान्य होत असताना, लोक कसे आणि का प्रवास करतात यात मोठे बदल झाल्याचे आमच्या लक्षात आले आहेत. यामुळे गेस्ट्सचे अशा जागांमधील स्वारस्य वाढलेले आहे ज्या जागांमुळे त्यांना कुठूनही त्यांचे काम करणे शक्य होते.

योग्य सुविधा कशा द्याव्यात, एक स्वतंत्र वर्कस्पेस कशी सेट अप करावी आणि तुमची जागा प्रमोट कशी करावी ते येथे दिलेले आहे.

जलद आणि विश्वासार्ह वायफाय ऑफर करा

व्हिडिओ कॉल्स आणि इतर कामे करता येण्यासाठी जलद, विश्वासार्ह वायफायची गरज असलेल्या रिमोट वर्कर्ससाठी इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यकच आहे.

तुम्ही वायफाय स्पीड टेस्ट वापरून Airbnb ॲपवरूनच तुमच्या लिस्टिंगचा वायफाय स्पीड व्हेरिफाय करू शकता. या टूलद्वारे तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीच्या वायफाय स्पीडची चाचणी करू शकता आणि नंतर तो थेट तुमच्या लिस्टिंग पेजवर दाखवू शकता—ज्यामुळे अशा आणखी गेस्ट्सना आकर्षित करण्यासाठी मदत होते ज्यांना वेगवान कनेक्शनची आवश्यकता असते.

तुमच्या जागेच्या काही भागात कमकुवत सिग्नल असल्यास, वायफाय बूस्टर्स आणि एक्सटेंडर्स त्याची कार्यक्षमता सुधारू शकतात. तुमचे वायफाय मॉनिटर करण्यासाठी तुमचा राऊटर रिमोट पद्धतीने कसा तपासायचा हे जाणून घेणे देखील उपयुक्त ठरू शकते.

वायफाय स्पीड टेस्ट करा

स्वतंत्र वर्कस्पेस सेट अप करा

गेस्ट्स मुख्य सुविधा म्हणून स्वतंत्र वर्कस्पेस शोधत आहेत—आणि ती तयार करणे तुम्हाला वाटते त्यापेक्षा सोपे आहे. ही सुविधा तुमच्या लिस्टिंगमध्ये जोडण्यासाठी, तुम्हाला एक टेबल किंवा डेस्क जो फक्त काम करण्यासाठी वापरला जातो, पॉवर आऊटलेटचा ॲक्सेस आणि एक आरामदायक खुर्ची ऑफर करायची आहे.

रिमोट पद्धतीने काम करणाऱ्‍या जोडप्यांना वेगवेगळ्या वर्कस्पेसेसची गरज भासू शकते, त्यामुळे दोन वर्कस्पेसेस सेट अप करण्याचा विचार करा. तुमच्या लिस्टिंगच्या सुविधा विभागामध्ये स्वतंत्र वर्कस्पेस निवडून आणि तुमच्या लिस्टिंगच्या वर्णन, फोटोज आणि कॅप्शन्समधील कोणत्याही वर्कस्पेसेस हायलाइट करून तुम्ही गेस्ट्सना या वैशिष्ट्यांविषयी माहिती देऊ शकता.

ज्या होस्टकडे स्वतंत्र वर्कस्पेससाठी जागा नाही ते तरीही रिमोट पद्धतीने काम करणाऱ्यांना सामावून घेऊ शकतात. जेव्हा गेस्टला रिमोट पद्धतीने काम करण्याची आवश्यकता असते, तेव्हा “मी स्वयंपाकघरातील टेबलच्या खुर्च्यांपैकी एकीच्या जागी कुशन केलेली आणि चाके असलेली ऑफिस आर्मचेअर देते,” असे ओरोनो, मेन मधील सुपरहोस्ट एमिलीया यांनी सांगितले. "मला वाटते की त्या एका खुर्चीमुळे मोठा फरक पडतो."

इतर उपयुक्त सुविधांचा विचार करा

स्वतंत्र वर्कस्पेसच्या पलीकडे, गेस्ट्स अतिरिक्त गोष्टींना देखील महत्त्व देतात ज्या रिमोट वर्क अधिक आनंददायक आणि उत्पादक बनवू शकतात.

तुमच्या जागेसाठी विचार करण्यासाठी येथे काही पर्याय दिले आहेत:

  • पर्यायी वर्कस्पेसेस. लिव्हिंग रूम, डायनिंग रूम किंवा पॅटीओच्या वेगवेगळ्या दृश्यांमुळे एक ताजातवाना बदल मिळू शकतो—आणि त्यामुळे एकाधिक लोकांनी एकाच वेळी काम करण्याची सोय होते.
  • एर्गोनॉमिक सपोर्ट. लॅपटॉप स्टँड, एर्गोनॉमिक ऑफिसची खुर्ची आणि ॲडजस्ट करता येण्याजोग्या फूटरेस्टमुळे कामकाजाचे लांबलचक दिवस अधिक आरामदायक बनवण्यात मदत होऊ शकते.
  • चांगला प्रकाश. नैसर्गिक प्रकाश प्रदान करणाऱ्या खिडक्या किंवा काचेच्या दरवाजे आदर्श आहेतच, सोबतच एक डेस्क लॅम्प वर्कस्पेसला आणखी उजळण्यात मदत करू शकतो.
  • कॉफी मेकर आणि चहाची केटल. अनेक गेस्ट कामाची सुरुवात करण्यासाठी कॅफिनची सोबत मिळाल्यावर खुश होतात. तुम्ही चहा आणि कॉफी देखील देऊ शकता—आणि आणखी वरच्या पायरीवर जाण्यासाठी, नॅशव्हिल, टेनेसीमधील सुपरहोस्ट, लाइफस्टाइल ब्लॉगर एल्सी फ्रेंच प्रेस आणि ऑटोमॅटिक कॉफी मेकरसारखे एकाधिक ब्रूइंग पर्याय ऑफर करण्याचा सल्ला देतात.
  • ऑफिसची सामग्री. नवीन पेन आणि नोटपॅडसारखे साधे आयटम्स बरेचदा उपयोगी पडतात, तर प्रिंटरचा अ‍ॅक्सेस आपल्या लिस्टिंगला वेगळे दाखवण्यात मदत करू शकतो.
  • टेक सपोर्ट. कॉम्प्युटर मॉनिटर, स्मार्ट स्पीकर्स आणि अतिरिक्त फोन चार्जर तुमच्या वर्कस्पेसला पुढील स्तरावर नेऊ शकतात.
  • व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पार्श्वभूमी. सतत व्हिडिओ कॉल्सवर असणार्‍या गेस्ट्सना वर्कस्पेसच्या पार्श्वभूमीवर असलेला मनोरंजक वॉलपेपर, झाडे किंवा कलाकृती अपील होऊ शकतात.
  • गोंगाट कमी करणे. पडदे, गालिचे, ब्लँकेट्स आणि उशा यांसारख्या कापडी वस्तूंमुळे गोंगाट कमी होऊन लक्ष विचलित न होण्यास मदत होऊ शकते.

तुमच्या वर्क-फ्रेंडली जागेला प्रमोट करा

तुम्ही तुमची जागा रिमोट वर्कर्ससाठी आरामदायी बनवल्यानंतर, तुमचे लिस्टिंगचे वर्णन,सुविधा आणि फोटोज अपडेट करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमच्याकडे कामासाठी अनुकूल जागा आहे हे गेस्ट्सना कळेल.

  • सर्च फिल्टर्सचा फायदा घ्या. लिस्टिंग्ज ब्राउझ करताना, अनेक गेस्ट्स त्यांना हव्या असलेल्या सुविधांसह जागा शोधण्यासाठी फिल्टर्स वापरतात, त्यामुळे तुम्ही देऊ केलेल्या स्वतंत्र वर्कस्पेस आणि इतर कोणत्याही सुविधांवर खूण केल्याची खात्री करा.
  • तुमचे फोटोज आणि कॅप्शन्स अपडेट करा. वर्णन वाचण्यापूर्वी गेस्ट तुमचे लिस्टिंग फोटोज तपासू शकतात, त्यामुळे तुमच्या फोटोंमध्ये तुम्ही पुरवत असलेल्या वर्कस्पेसेसचा समावेश असल्याची खात्री करा. उत्तम फोटोज कसे काढायचे ते शिका
  • गेस्ट्सना ते स्वत: तुमच्या जागेत असल्याची कल्पना करू द्या. रिमोट पद्धतीने काम करणाऱ्या गेस्ट्सना तुमची जागा कशी सामावून घेते याचे वर्णन तुमची लिस्टिंग प्रतिबिंबित करते याची खात्री करा. जर तुम्हाला खरोखरच उठून दिसायचे असेल तर तुम्ही तुमच्या लिस्टिंग शीर्षकात ती माहिती समाविष्ट करू शकता.

गेस्ट्स येण्यापूर्वी त्यांना मेसेज करणे देखील उपयुक्त ठरू शकते. तुम्ही कॉफी किंवा कॉम्प्युटर मॉनिटरसारख्या गोष्टी ऑफर करत असल्यास, त्यांना त्याची आठवण देऊन तुम्ही त्यानुसार प्लॅन करण्यात त्यांना मदत करू शकता.

आम्हाला आशा आहे की ह्या टिप्स तुम्हाला एक स्वागतार्ह जागा तयार करण्यात मदत करतील. तुमच्या गेस्ट्सच्या गरजा लक्षात घेऊन, तुम्ही रिमोट वर्कर्ससाठी आरामदायी आणि उत्पादक वास्तव्य ऑफर करू शकाल.

हायलाइट्स

Airbnb
11 मे, 2022
हे उपयुक्त ठरले का?