गेस्ट्सना हव्या असलेल्या सुविधा

या लोकप्रिय वैशिष्ट्यांसह आणि सुविधांसह तुमची लिस्टिंग लक्षवेधी ठरण्यात मदत करा.
Airbnb यांच्याद्वारे 19 नोव्हें, 2020 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
21 नोव्हें, 2023 रोजी अपडेट केले

विशिष्ट वैशिष्ट्ये आणि सुविधा असलेल्या जागा शोधण्यासाठी गेस्ट्स अनेकदा Airbnb सर्च रिझल्ट्स फिल्टर करतात. तुमची जागा ऑफर करत असलेल्या सर्व गोष्टी समाविष्ट करून तुम्ही तुमची लिस्टिंग नजरेत भरण्यास मदत करू शकता.

टॉप सुविधा

या गेस्ट्स सर्वात जास्त शोधत असलेल्या सुविधा आहेत.*

  1. पूल

  2. वायफाय 

  3. किचन 

  4. विनामूल्य पार्किंग

  5. हॉटटब

  6. एअर कंडिशनिंग किंवा हीटिंग 

  7. वॉशर किंवा ड्रायर 

  8. स्वतःहून चेक इन 

  9. टीव्ही किंवा केबल

  10. फायरप्लेस

तुमच्या होस्टिंग अकाऊंटच्या लिस्टिंग टॅबमध्ये सुविधा जोडणे सोपे आहे. फक्त तुमच्या जागेवर आणि सुविधांवर जा, त्यानंतर प्लस चिन्हावर टॅप करा. तुमच्या घराच्या कोणत्याही वैशिष्ट्यापुढे अॅड निवडा. तुम्ही एक फोटो टूर देखील तयार करू शकता आणि सुविधा, गोपनीयता माहिती आणि झोपण्याच्या व्यवस्थेसह खोलीनुसार तपशील जोडू शकता.

    आवश्यक आयटम्स

    आरामदायी वास्तव्यासाठी तुमच्या जागेत या आवश्यक गोष्टी मिळतील अशी गेस्ट्सची अपेक्षा असते:

    • टॉयलेट पेपर

    • हात आणि शरीराचा साबण

    • प्रति गेस्ट एक टॉवेल

    • प्रति गेस्ट एक उशी

    • प्रत्येक गेस्टच्या बेडसाठी लिनन्स

    मोठ्या ग्रुपसाठी आणि दीर्घकालीन वास्तव्यांसाठी अधिक सामग्री देण्याचा विचार करा. तुम्ही तुमच्या गेस्ट्सना त्यांना काय हवे आहे ते विचारण्यासाठी मेसेज करू शकता.

    गेस्टची सुरक्षा

    काही मूलभूत खबरदार्‍या तुमच्या घरातील जोखीम कमी करण्यात मदत करू शकतात.

    आम्ही सर्व होस्ट्सना इंधनावर चालणारी उपकरणे असणार्‍या जागांमध्ये स्मोक आणि कार्बन मोनॉक्साईड अलार्म्स इन्स्टॉल करण्याची आग्रही शिफारस करतो. तुम्ही अग्निशमन उपकरण आणि प्रथमोपचार किट देखील देऊ शकता.

    तुमची लिस्टिंग तयार करण्याबद्दल अधिक जाणून घ्या

    ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये

    ॲक्सेसिबिलिटीच्या गरजा असलेले गेस्ट्स बहुतेकदा पायऱ्यांशिवाय प्रवेश, बाथरूममध्ये लावलेले ग्रॅब बार आणि ॲक्सेसिबल पार्किंग यासारखी वैशिष्ट्ये शोधतात. ही वैशिष्ट्ये तुमच्या लिस्टिंगमध्ये समाविष्ट केल्याने तुमची जागा त्यांच्यासाठी योग्य आहे का हे गेस्ट्सना कळण्यास मदत होते. 

    ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांसाठी आमची मार्गदर्शक तत्त्वे वाचा

    रिमोट वर्कस्पेसेस

    प्रवास करत असताना रिमोट पद्धतीने काम करणाऱ्या गेस्ट्सची पुढील वैशिष्ट्ये आणि सुविधांना पसंती असते:

    • जलद आणि विश्वासार्ह वायफाय
    • स्वतंत्र वर्कस्पेस
    • एर्गोनॉमिक सपोर्ट, जसे की लॅपटॉप स्टँड
    • उत्तम प्रकाशयोजना
    • पेन, पेपर आणि युनिव्हर्सल चार्जरसह ऑफिसची पुरवठा सामग्री

    रिमोट वर्क सपोर्ट करण्याबद्दल अधिक जाणून घ्या

    मुले- आणि पाळीव प्राणी-अनुकूल वैशिष्ट्ये

    पुढील उपयुक्त गोष्टी पुरवून मुले किंवा पाळीव प्राण्यांसह येणार्‍या आणखी गेस्ट्सचे स्वागत करा:

    • उंच खुर्ची
    • एक प्रवासी क्रिब
    • बेबी सेफ्टी गेट्स
    • फर्निचरचे कव्हर
    • पाळीव प्राण्यांच्या अन्न आणि पाण्यासाठी बाऊल
    • दाराजवळ पंजे पुसण्यासाठी टॉवेल्स
    • स्वच्छतेची अतिरिक्त सामग्री

    तुमच्या सुविधा, लिस्टिंगचे वर्णन आणि फोटोज अपडेट करून तुम्ही केलेले बदल दाखवण्याची खात्री करा. गेस्ट्सना नक्कीच हव्या असलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू पुरवल्यामुळे त्यांना तुमच्या जागेत अधिक आरामदायक वाटू शकते—त्यामुळे तुम्हाला उत्तम रिव्ह्यूजही मिळण्याची शक्यता असते.

    *ही माहिती 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत जगभरात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या सुविधांचे मोजमाप करणाऱ्या Airbnb च्या अंतर्गत डेटावर आधारित आहे.

    या लेखात असलेली माहिती प्रकाशित झाल्यानंतर बदललेली असू शकते.
    Airbnb
    19 नोव्हें, 2020
    हे उपयुक्त ठरले का?