कुटुंबांना होस्ट करण्याबद्दल तुम्हाला काय माहीत असणे आवश्यक आहे

तुमच्या प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी तुमची जागा विचारपूर्वक तयार करा आणि तुमची लिस्टिंग अपडेट करा.
Airbnb यांच्याद्वारे 21 जुलै, 2020 रोजी
वाचण्यासाठी 5 मिनिटे लागतील
21 जुलै, 2023 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • कुटुंबांसाठी तुमची जागा तयार केल्याने बुकिंग्ज वाढवण्यात मदत होऊ शकते

  • तुमची जागा कुटुंबांसाठी अनुकूल आहे हे नमूद करण्यासाठी तुमची लिस्टिंग अपडेट करा आणि फोटो समाविष्ट करा

    • पोर्टेबल क्रिब आणि हाय चेअरसारख्या सुविधांचा समावेश करा

    • एखादी समस्या असल्यास कोणता Airbnb सपोर्ट उपलब्ध आहे ते जाणून घ्या

    जगभरातील अनेक कार्यालये, शाळा आणि डेकेअर सेंटर्स बंद असल्यामुळे, पालकांजवळ आता कुठे राहायचे आणि काम करायचे याविषयी अधिक फ्लेक्सिबिलिटी आहे. अनेकांना अधिक प्रवास करण्यात स्वारस्य आहे—अगदी त्यांच्या कुटुंबांना अशा ठिकाणी तात्पुरते स्थानांतरित करण्यातही जिथे अधिक जागा असते आणि निसर्गाशी जास्त संपर्क येतो.

    काही जागांमध्ये मुलांचे पालनपोषण करणे कदाचित सुरक्षित नसू शकते; परंतु तुम्ही त्यांचे तुमच्या जागेत स्वागत करण्यासाठी तयार असल्यास, तुम्हाला काय माहित असले पाहिजे ते येथे दिलेले आहे.

    कुटुंबांना होस्ट करण्यासाठी आधीपासून योजना आखणे नेहमी फायदेशीर ठरते

    तुमच्या जागेत मुलांसह येणार्‍या गेस्ट्सचे स्वागत करण्याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास, अधिक आरामदायक वाटण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता.

    तुमच्या जागेमध्ये काय उपलब्ध आहे—आणि काय नाही—याबद्दल आधीच संवाद साधा.

    पालकांना तुमच्याकडे आधीच उपलब्ध असलेल्या कुटुंबासाठीच्या सर्व सुविधांचा तपशील देऊन त्यानुसार पॅकिंग करण्यास मदत करा. तुमच्या गाईडबुक मध्ये पुरवठा सामग्री कुठे पिकअप करायची किंवा पुन्हा भरायची याबद्दलच्या शिफारसी देखील समाविष्ट असू शकतात.

    कुटुंबांचे होस्टिंग करण्याकडे संक्रमण करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्ही तुमची जागा कालांतराने कशी तयार करू शकता ते येथे दिलेले आहे:

    • मजबूत आणि सुरक्षित फर्निचरची निवड करा आणि शक्य असल्यास काचेचा वापर टाळा
    • गोंधळ आणि अनावश्यक सजावट टाळून स्वच्छता सुलभ बनवा
    • तुटणाऱ्या आणि तीक्ष्ण वस्तू मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा
    • पुन्हा वापरण्यायोग्य प्लास्टिक कप आणि प्लेट्सचा तुमच्या स्वयंपाकघरात साठा करून डिशेसचे फुटणे टाळा
    • कॅबिनेट्समध्ये लॅच आणि पॉवर आउटलेट्समध्ये संरक्षक कव्हर्स जोडण्याचा विचार करा
    • टिकाऊ, स्वच्छ करण्यास सुलभ कापडे निवडा, जसे की बाहेरच्या उशांसाठी वापरले जाणारे कापड
    • धुता येणाऱ्या गालिचांनी हार्डवुड पृष्ठभाग कव्हर करा

    तुमच्या गेस्ट्सचे आणि तुमच्या घराचे संरक्षण करण्यात मदतीसाठी मूलभूत सुरक्षा खबरदार्‍या घ्या.

    • किचन कूकटॉपजवळ स्मोक आणि कार्बन मोनॉक्साईड अलार्म आणि अग्निशामक यंत्र इन्स्टॉल करून प्रत्येकाचे मन निश्चिंत ठेवण्यास मदत करा
    • तुमच्या लिस्टिंगमध्ये या सुविधांचा उल्लेख करण्यास आणि नियमितपणे बॅटरी बदलण्यास विसरू नका
    • तुमच्या घराच्या सुविधा सूचीमध्ये स्थानिक आपत्कालीन क्रमांक आणि गेस्ट्ससाठी त्वरित रेफरन्स कार्ड समाविष्ट करा

    स्वच्छता शुल्क घेण्याबद्दल विचार करा.
    बरेच होस्ट्स पुरवठा सामग्रीचा किंवा व्यावसायिक स्वच्छता सेवेचा खर्च  भरून काढण्यासाठी स्वच्छता शुल्क समाविष्ट करतात. तुम्ही आधीपासून आकारत नसल्यास स्वच्छता शुल्क कसे आकारावे याबद्दल अधिक माहिती येथे दिली आहे.

      एखादी समस्या असल्यास काय करावे ते जाणून घ्या.
      तुम्ही कितीही तयार असाल, तरीही अपघात होऊ शकतात—परंतु Airbnb वर होस्टिंग करताना तुम्हाला स्वतःचे संरक्षण करण्यात मदत करू शकतात असे काही मार्ग आहेत.

      तुम्ही कुटुंबांसह येणार्‍या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक असल्यास, विचारपूर्वक सुविधा तुम्हाला आदर्श होस्ट म्हणून उठून दिसण्यात मदत करू शकतात त्यांचे वास्तव्य अधिक घरासारखे वाटण्यासाठी, अतिरिक्त टॉवेल्स आणि चादरी यांसारख्या सामान्यपणे मागण्यात येणार्‍या वस्तू पुरवण्यास तयार रहा. टॉयलेट पेपर, तसेच मीठ, काळी मिरपूड यांसारखे पॅंट्री आयटम्स आणि स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा साठा करणे देखील उपयुक्त आहे.& nbsp;

      नॅशव्हिल, टेनेसीच्या होस्ट एल्सीकडून अधिक कल्पना मिळवा; त्या कुटुंबांसाठी अनुकूल जागा कशा तयार करतात हे शेअर करत आहेत:

      सल्ला:तुमच्याकडे कधीही स्वच्छता सामग्रीचा खूप जास्त पुरवठा असू शकत नाही—विशेषत: पेपर टॉवेल्स, जंतुनाशक वाइप्स आणि स्टेन रिमूव्हर—किंवादीर्घकालीन वास्तव्यांसाठी तुम्ही कधीही खूप जास्त तयार असू शकत नाही.

      तुम्ही काय ऑफर करता हे गेस्ट्सना माहीत असल्याची खात्री करा

      तुम्ही कुटुंबांसाठी तुमची जागा तयार करण्याच्या या पायऱ्या पार केल्यानंतर, तुमचे लिस्टिंगचे तपशील रीफ्रेश करून आणि तुमच्या सुविधा अपडेट करून तुमची जागा प्रदर्शित करण्याची वेळ आली आहे.

      • लिस्टिंगचे शीर्षक आणि वर्णन अपडेट केल्याने तुम्हाला योग्य प्रकारच्या प्रवाशांना आकर्षित करण्यात—आणि स्पष्ट अपेक्षा सेट करण्यात मदत मिळू शकते
      • मुलांसोबत प्रवास करणारे गेस्ट्स अनुरूप पर्याय शोधण्यासाठी सर्च फिल्टर्स वापरू शकतात, त्यामुळे तुमच्या सुविधा अपडेट करणे लक्षात ठेवा. (तुमच्याकडे एकापेक्षा जास्त लिस्टिंग असल्यास, तुम्ही लिस्टिंग पेजवरून तुमच्या सर्व जागांमधील सुविधा अपडेट करू शकता.) बाळांसोबत येणार्‍या गेस्ट्ससाठी एक क्रिब आणि उंच खुर्ची ह्या अत्यावश्यक सुविधा आहेत.
      • तुमच्या जागेमध्ये एअर कंडिशनिंग, वॉशर/ड्रायर आणि किचन यासारख्या सुविधा असल्यास त्यांचा समावेश करा
      • तुम्ही वॉशर ऑफर करत असल्यास, तुम्ही लॉन्ड्री डिटर्जंट पुरवता का आणि काही अतिरिक्त शुल्क आहे का याचा उल्लेख करा
      • टबमुळे मुलांना आंघोळ करणे सोपे होते—तुमच्याकडे बाथटब असल्यास लिस्टिंगमध्ये त्याचा उल्लेख केल्याचे सुनिश्चित करा आणि तुमच्या इमेज गॅलरीमध्ये त्याचा फोटो समाविष्ट करा
      • तुम्ही वर्णन केलेले सर्व काही तुमच्या फोटोंमधून दिसते का ते पुन्हा तपासून घ्या. तुम्ही प्रवाशांच्या गरजा पूर्ण करत असण्याच्या सर्व मार्गांना कसे हायलाइट करायचे हे जाणून घेण्यासाठी आमचे स्टेप-बाय-स्टेप फोटोग्राफी ट्युटोरियल आत्ताच पहा.

      मुलांसह आलेल्या कुटुंबांचे स्वागत करण्यासाठी तुमची जागा तयार करताना काही अतिरिक्त काम करावे लागू शकते, परंतु या सुविधा विचारपूर्वक जोडणे हा तुमच्या सर्व गेस्ट्सना आनंदित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

      होस्ट्ससाठी AirCover' होस्ट नुकसान संरक्षण, होस्ट दायित्व विमा, आणि अनुभव दायित्व विमा यात जपानमध्ये वास्तव्ये किंवा अनुभव ऑफर करणाऱ्या होस्ट्सचा समावेश नाही, तेथे जपान होस्ट विमा आणि जपान अनुभव संरक्षण विमा लागू आहे किंवा Airbnb Travel LLC द्वारे वास्तव्ये ऑफर करणाऱ्या होस्ट्सचाही यामध्ये समावेश नाही. मेनलँड चीनमध्ये वास्तव्ये किंवा अनुभव ऑफर करणाऱ्या होस्ट्सना, चीन होस्ट संरक्षण योजना लागू होते. कृपया लक्षात घ्या की सर्व कव्हरेज मर्यादा USD मध्ये दर्शवल्या आहेत.

      होस्ट दायित्व विमा आणि अनुभव दायित्व विमा तृतीय-पक्ष विमा कंपन्यांद्वारे अंडरराईट केलेले आहेत. तुम्ही युकेमध्ये होस्टिंग करत असल्यास, होस्ट दायित्व विमा पॉलिसी आणि अनुभव दायित्व विमा पॉलिसी Zurich Insurance Company Ltd. द्वारे अंडरराईट केल्या जातात आणि युकेमधील होस्ट्ससाठी त्यांची व्यवस्था आणि पूर्तता Financial Conduct Authority द्वारे अधिकृत आणि विनियमित Aon UK Limited ची नियुक्त प्रतिनिधी असलेल्या Airbnb UK Services Limited द्वारे कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय करण्यात येते. Aon चा FCA रजिस्टर नंबर 310451 आहे. तुम्ही FCA च्या वेबसाईटला भेट देऊन फायनान्शियल सर्व्हिसेस रजिस्टर वर किंवा FCA शी 0800 111 6768 वर संपर्क साधून हे तपासू शकता. होस्ट्ससाठी AirCover मधील होस्ट दायित्व आणि अनुभव दायित्व पॉलिसीजचे नियमन फायनान्शियल कंडक्ट ऑथॉरिटीद्वारे केले जाते. उर्वरित उत्पादने आणि सेवा Airbnb UK Services Limited द्वारे व्यवस्थापित केलेली नियंत्रित उत्पादने नाहीत. FPAFF610LC 

      होस्ट नुकसान संरक्षण हा विमा नाही आणि तो होस्ट दायित्व विम्याशी संबंधित नाही. होस्ट नुकसान संरक्षणामुळे, गेस्ट्सकडून तुमच्या घराला आणि सामानाला झालेल्या काही प्रकारच्या नुकसानीची तुम्हाला भरपाई केली जाते, जर गेस्ट्सने त्या नुकसानीची भरपाई केली नाही तर. वॉशिंग्टन स्टेटमधील लिस्टिंग्जसाठी, होस्ट नुकसान संरक्षणांतर्गत असलेल्या Airbnb च्या कराराच्या जबाबदाऱ्या, Airbnb ने खरेदी केलेल्या विमा पॉलिसीद्वारे कव्हर केल्या जातात. ज्या होस्ट्सचा राहण्याचा किंवा आस्थापनाचा देश ऑस्ट्रेलिया नाही, अशा होस्ट्ससाठी, हे होस्ट नुकसान संरक्षण नियम लागू होतात. ज्या होस्ट्सचा राहण्याचा किंवा आस्थापनाचा देश ऑस्ट्रेलिया आहे, अशा होस्ट्ससाठी, होस्ट नुकसान संरक्षण ऑस्ट्रेलियन युजर्ससाठी असलेल्या होस्ट नुकसान संरक्षणा च्या अधीन आहे.

      या लेखात दिलेली माहिती लेख पब्लिश झाल्यानंतर कदाचित बदललेली असू शकते.

      होस्ट्ससाठी AirCover चे होस्ट नुकसान संरक्षण, होस्ट दायित्व विमा आणि अनुभव दायित्व विमा याद्वारे मिळणारे संरक्षण जपानमध्ये वास्तव्य किंवा अनुभव ऑफर करणाऱ्या होस्ट्सना लागू होत नाही, जेथे जपान होस्ट विमा आणि जपान अनुभव संरक्षण विमा लागू आहे किंवा Airbnb Travel LLC द्वारे वास्तव्य ऑफर करणाऱ्या होस्ट्सना देखील लागू होत नाही. मेनलँड चीनमध्ये वास्तव्याच्या जागा किंवा अनुभव ऑफर करणाऱ्या होस्ट्सना, चीन होस्ट संरक्षण प्लॅन लागू होतो. कृपया लक्षात घ्या की सर्व कव्हरेज मर्यादा USD मध्ये दाखवल्या आहेत.

      होस्ट दायित्व विमा आणि अनुभव दायित्व विमा तृतीय-पक्ष विमा कंपन्यांद्वारे अंडरराईट केले जातात. तुम्ही युकेमध्ये वास्तव्ये होस्ट करत असल्यास, होस्ट दायित्व आणि अनुभव दायित्व विमा पॉलिसीज Zurich Insurance Company Ltd. द्वारे अंडरराईट केल्या जातात आणि त्यांची व्यवस्था आणि पूर्तता युकेमधील होस्ट्सना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय Airbnb UK Services Limited द्वारे करण्यात येते, जी Financial Conduct Authority द्वारे अधिकृत आणि विनियमित Aon UK Limited ची नियुक्त प्रतिनिधी आहे. Aon चा FCA रजिस्टर नंबर 310451 आहे. तुम्ही फायनान्शियल सर्व्हिसेस रजिस्टर येथे भेट देऊन किंवा FCA शी 0800 111 6768 वर संपर्क साधून हे तपासू शकता. होस्ट्ससाठी Aircover मधील होस्ट दायित्व आणि अनुभव दायित्व पॉलिसीजचे नियमन Financial Conduct Authority द्वारे केले जाते. उर्वरित उत्पादने आणि सेवा Airbnb UK Services Limited द्वारे व्यवस्थापित केलेली नियंत्रित उत्पादने नाहीत. FPAFF405LC

      होस्ट नुकसान संरक्षण हा विमा नाही आणि तो होस्ट दायित्व विम्याशी संबंधित नाही. होस्ट नुकसान संरक्षणाद्वारे, गेस्ट्सकडून तुमच्या घराला आणि सामानाला झालेल्या काही विशिष्ट प्रकारच्या नुकसानीची तुम्हाला भरपाई केली जाते, जर गेस्ट्सने त्या नुकसानीची भरपाई केली नाही तर. वॉशिंग्टन स्टेटमधील लिस्टिंग्जसाठी, होस्ट नुकसान संरक्षणांतर्गत असलेल्या Airbnb च्या कराराच्या जबाबदाऱ्या, Airbnb ने खरेदी केलेल्या विमा पॉलिसीद्वारे कव्हर केल्या जातात. ज्या होस्ट्सचा राहण्याचा किंवा आस्थापनाचा देश ऑस्ट्रेलिया नाही, अशा होस्ट्ससाठी, हे होस्ट नुकसान संरक्षण नियम लागू होतात. ज्या होस्ट्सचा राहण्याचा किंवा आस्थापनाचा देश ऑस्ट्रेलिया आहे, अशा होस्ट्ससाठी, होस्ट नुकसान संरक्षण ऑस्ट्रेलियन युजर्ससाठी असलेल्या होस्ट नुकसान संरक्षणाच्या अधीन आहे.

      हायलाइट्स

      • कुटुंबांसाठी तुमची जागा तयार केल्याने बुकिंग्ज वाढवण्यात मदत होऊ शकते

      • तुमची जागा कुटुंबांसाठी अनुकूल आहे हे नमूद करण्यासाठी तुमची लिस्टिंग अपडेट करा आणि फोटो समाविष्ट करा

        • पोर्टेबल क्रिब आणि हाय चेअरसारख्या सुविधांचा समावेश करा

        • एखादी समस्या असल्यास कोणता Airbnb सपोर्ट उपलब्ध आहे ते जाणून घ्या

        Airbnb
        21 जुलै, 2020
        हे उपयुक्त ठरले का?