या प्रॉपर्टी मॅनेजरने Airbnb टूल्स वापरुन बुकिंग्ज वाढवली
कॅन्डससाठी, ब्रेकेनरिज, कोलोरॅडोच्या व्यस्त स्की रिसॉर्ट शहरातील खाजगी घरमालकांसाठी 120 पेक्षा जास्त रेंटल प्रॉपर्टी मॅनेज करण्याचे काम म्हणजे कधीही न संपणारी तारेवरची कसरत आहे.
VisitBreck, एक प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनी, येथे सेल्स डायरेक्टर म्हणून कॅडन्स यांना मालक आणि त्यांच्या गरजा माहित असणे आवश्यक आहे. तिला प्रत्येक प्रॉपर्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, जे उतारावरील टाऊनहाऊसेसपासून ते नऊ बेडरूमच्या डोंगराळ हवेल्यांपर्यंत आहेत आणि त्यांच्या सुविधा आणि देखभाल आवश्यकतांचे सखोल ज्ञान असावे. आणि तिला उपलब्धतेचा ट्रॅक ठेवणे आवश्यक आहे, तर जास्तीत जास्त ऑक्युपन्सी वाढवण्यासाठी प्रत्येक घराचे भाडे सतत ॲडजस्ट करणे आवश्यक आहे.
“आमचे बरेच मालक, त्यांच्या कुटुंबासह आनंद घेऊ शकतील असे एक सुंदर दुसरे घर करण्यासाठी, ते परवडावे म्हणून त्यांना भाड्याने देतात,” कॅडन्स म्हणतात, जे स्नोबोर्ड कॉलेज नंतर या माजी गोल्ड रश गावात आले आणि पुन्हा परत गेले नाहीत. “पण त्यांच्यापैकी बर्याच लोकांसाठी, हे देखील सत्य आहे की जेव्हा ते येथे नसतात तेव्हा येथे कोणीतरी त्यांचे घर सांभाळते.” आणि थंड हवामानात, पाईप कधी फुटेल हे माहीत असताना, उदाहरणार्थ, “ही एक मोठी गोष्ट आहे,” त्या म्हणतात.
Airbnb प्लॅटफॉर्म पोहोच आणि साधेपणा यांचा मेळ साधतो
त्यांच्या घरमालकांचे बाहेर जाण्याचे वेळापत्रक ट्रॅक करण्यासाठी आणि नियमितपणे गेस्ट्स मिळवण्यासाठी, सुमारे पाच वर्षांपूर्वी कँडिस Airbnb कडे वळल्या. त्यावेळी, VisitBreck त्यांच्या कार्याचा अधिक विस्तार करण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना अधिक प्रभावशाली बनवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून अधिक प्रभाव जोडू पाहत होती. “आम्ही Airbnb निवडले कारण ते तेजीने पुढे जात होते,” त्या म्हणतात. “आम्हाला वाटले की ते आमच्या प्रॉपर्टीजसाठी एक चांगले प्लॅटफॉर्म आहे.”
लावलेल्या डावाचा अपेक्षेपेक्षाही जास्त फायदा झाला. Airbnb वापरण्यास सुरुवात केल्यापासून, कॅनडेस म्हणतात की बुकिंग्ज वाढले आहेत.* त्या फक्त Airbnb च्या आवाक्यालाच नाही तर त्याच्या अनेक व्यवस्थापन टूल्सना पण श्रेय देतात, ज्यामुळे त्यांच्या कामाशी निगडित अनेक लॉजिस्टिक्सच्या कटकटीसुद्धा सोप्या झाल्या आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा त्या त्यांच्या प्लॅटफॉर्म डॅशबोर्डमध्ये लॉग इन करतात तेव्हा त्या मल्टी-लिस्टिंग कॅलेंडरवर क्लिक करू शकतात जे त्यांना एकाच वेळी सर्व 120 पेक्षा जास्त प्रॉपर्टीज पाहू देते. “टूलकिटमध्ये ही एक उत्तम जोड आहे,” त्या म्हणतात.
प्राईसिंग टूल्स प्रॉपर्टी मॅनेजरला ऑक्युपन्सी वाढवण्यात मदत करतात
जेव्हा ती बऱ्याच प्रॉपर्टीज आणि वेगवेगळ्या ऋतूंमध्ये, प्रत्येक त्याच्या वेगळ्य प्रकारच्या अभ्यागतांसह (हिवाळ्यात स्की करणारे, पानगळीच्या मौसमात पानांचा रंग पाहणारे, उन्हाळ्यात हायकिंग करणारे), वेगवेगळ्या भाड्याचे दर जुळवण्याचा प्रयत्न करीत असते तेव्हा कॅलेंडर उपयुक्त ठरते. “माझ्याकडे चांगल्या परफॉर्म न करणाऱ्या प्रॉपर्टीज असल्यास, मी कॅलेंडरमध्ये जाऊन कोणतीही प्रॉपर्टी निवडू शकते आणि प्रमोशनल रेंटल रेट जोडू शकतो,” त्या म्हणतात.
Airbnb च्या भाडे नियमांच्या संचाद्वारे त्यांना हंगामीपणासारख्या गोष्टींवर आधारित विशिष्ट तारखांद्वारे दर वाढवता येतात आणि कमी करता येतात. त्या म्हणतात की विविध प्राईसिंग टूल्सनी, VisitBreck च्या ऑक्युपन्सी दरांमध्ये अंदाजे 30% वाढ होण्यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. “आम्ही दर अधिक सहजपणे मॅनेज करू शकतो,” त्या म्हणतात, “आणि म्हणून आमची खरोखरच वाढ झाली आहे.”
आपल्या यशामुळे, VisitBreck नवीन प्रॉपर्टीज घेत आहे आणि घरमालकांपर्यंत आपल्या सेवांचा विस्तार करत आहे. ते इंटिरिअर डिझाइनसुद्धा करून देतात आणि त्यांनी स्वत:चा रिटेल फर्निचर विभाग स्थापन केला आहे, जिथे ते स्थानिक कारागिरांकडून आणि इतर अनेकांकडून सोर्सिंग करतात.
*Airbnb वर प्रत्येक होस्टचा होस्टिंगचा अनुभव युनिक आहे. होस्टची कमाई उपलब्धता, भाडे, स्वीकृती आणि कॅन्सलेशन दर, ऑक्युपन्सी दर आणि लिस्टिंग लोकेशनमधील मागणी यासह अनेक घटकांवर अवलंबून मोठ्या प्रमाणात बदलते.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.