तुमच्या लिस्टिंगमध्ये सतत सुधारणा कशी करावी
तुमच्या घराप्रमाणेच, तुमच्या लिस्टिंगला देखील वेळेवर केलेल्या सुधारणांचा फायदा होऊ शकतो. तुमचे फोटोज, सुविधा आणि भाडे अॅडजस्ट केल्याने तुम्हाला अधिक गेस्ट्सना आकर्षित करण्यात आणि तुमची कमाईची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होऊ शकते.
तुमचे फोटोज अपडेट करा
काही गेस्ट्स लिस्टिंगचे वर्णन वाचण्यापेक्षा फोटोज पाहण्यात जास्त वेळ घालवतात. तुमची जागा Airbnb वर जशी दाखवली आहे तशी असावी अशीही त्यांची अपेक्षा असते.
तुम्ही तुमच्या जागेमध्ये अलीकडे काही बदल केले असल्यास, तुमचे फोटोज अपडेट करण्याचा विचार करा. तुम्ही घेऊ शकता अशा इतर पायऱ्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
AI-समर्थित फोटो टूर तयार करा. एकाफोटो टूरच्या माध्यमातून तुमच्या घराचा लेआऊट समजून घेण्यासाठी गेस्ट्सना मदत करा. Airbnb चे कस्टम AI इंजिन तुमच्या लिस्टिंगच्या फोटोजचे 19 प्रकारच्या रूम्स आणि इतर जागांमध्ये त्वरित वर्गीकरण करते. तुम्ही तुमच्या टूरचा रिव्ह्यू घेऊ शकता आणि त्यामध्ये प्रत्येक रूमबद्दलचे तपशील जोडू शकता.
फोटोचे वर्णन जोडा. किचनमध्ये एस्प्रेसो मशीन किंवा बाथरूममध्ये अतिरिक्त फ्लफी टॉवेल्स यासारखे प्रत्येक रूम किंवा जागा काय ऑफर करते हे हायलाईट करणारे कॅप्शन्स लिहा.
आकर्षक, नीटनेटके आणि नैसर्गिक फोटोज घ्या. तुमच्या फोनचे किंवा कॅमेऱ्याचे सेटिंग्ज ॲडजस्ट करण्यासाठी ग्रीड लाईन्स चालू करा आणि इमेज रिझोल्यूशन तपासा. फ्लॅश बंद करून नैसर्गिक प्रकाश वापरण्याचा विचार करा. वाईड-अँगल, मिड-रेंज आणि क्लोज-अप असे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज काढा. अधिक DIY फोटो टिप्स मिळवा
तज्ञाची नेमणूक करा. जर तुमची फोटोग्राफी कौशल्ये तुम्हाला पुरेशी वाटत नसतील तर एखाद्या व्यावसायिकाकडून काम करून घेण्याचा विचार करा. Airbnb तुमच्या भागात व्यावसायिक फोटोग्राफीच्या सेवा देऊ शकते.
तपशील जोडा
तुमची लिस्टिंग पाहिल्यावरच गेस्ट्सना तुमच्या घराची माहिती मिळते. अधिक माहिती पुरवल्याने तुम्हाला बुकिंग्ज आकर्षित करण्यात मदत होऊ शकते.
- टॉप सुविधा हायलाईट करा. गेस्ट्स अनेकदा किचन, वायफाय आणि मोफत पार्किंग असलेल्या जागा शोधतात. ते पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल लिस्टिंग्ज आणि किंग-साईझ बेडसारख्या झोपेच्या व्यवस्थेसाठी देखील फिल्टर करू शकतात.
- अप-टू-डेट रहा. तुमच्या लिस्टिंगमधील सर्व फीचर्स आणि सुविधा वापरता येतील अशी गेस्ट्सची अपेक्षा असते. उदाहरणार्थ, जर स्विमिंग पूल गेस्ट्ससाठी वर्षभर उपलब्ध राहत नसेल, तर त्यांना तसे स्पष्ट सांगा.
- सर्व काही सोपे ठेवा. अपेक्षा निश्चित करण्यावर आणि मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यावर लक्ष केंद्रित करा. गेस्ट्सना तुमच्या जागेत वास्तव्याचा आनंद घेण्यासाठी त्यांना काय काय माहीत असणे आवश्यक आहे ते सर्व सांगा.
- गेस्ट फीडबॅक वापरा. गेस्टने रिव्ह्यूमध्ये तुमच्या अंगणाचे कौतुक केले का? तुमच्या फोटोंमध्ये ते खास वैशिष्ट्य म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करा. तुमची जागा एयरपोर्टपासून इतकी दूर आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले असे एखाद्या गेस्टने तुम्हाला सांगितले का? तुमच्या लोकेशनची स्पष्ट माहिती द्या.
सर्वोत्तम मूल्य ऑफर करा
तुमचे गेस्ट्स किती पैसे देतात ते समजून घेणे तुम्हाला सर्वोत्तम मूल्य ऑफर करण्यात मदत करू शकते. त्यांच्या एकूण भाड्यात तुमचे प्रति रात्र भाडे, तुम्ही सेट केलेले कोणतेही अतिरिक्त शुल्क (साफसफाईसाठी, अतिरिक्त गेस्ट्ससाठी किंवा पाळीव प्राण्यांसाठी), Airbnb सेवा शुल्क आणि कर यांचा समावेश आहे.
स्पर्धात्मक किंमत तुमच्या लिस्टिंगला ठळकपणे दिसून येण्यास मदत करू शकते आणि सर्च रिझल्ट्समध्ये उच्च रँकिंग मिळवू शकते. अल्गोरिदम जवळपासच्या मिळत्याजुळत्या लिस्टिंग्जच्या तुलनेत एकूण भाडे आणि लिस्टिंगची गुणवत्ता यांना प्राधान्य देते.
तुम्ही तुमच्या भाड्यात समाविष्ट करत असलेल्या काही खर्चांची गेस्ट्सना स्पष्ट कल्पना नसू शकते. तुम्ही लक्झरी बाथ प्रॉडक्ट्स किंवा स्ट्रीमिंग सर्व्हिसेस सारख्या अतिरिक्त सुविधा ऑफर करता का? गेस्ट्सना तुमच्या भाड्याचे मूल्य शोधण्यात मदत करण्यासाठी तुमच्या लिस्टिंगच्या वर्णनामध्ये ते स्पष्ट करा.
पब्लिश झाल्यानंतर या लेखात असलेल्या माहितीमध्ये कदाचित बदल झालेला असू शकेल.