कमाई डॅशबोर्डमध्ये मौल्यवान इन्साईट्स मिळवा
तुमची कमाई समजून घेणे तुम्हाला अधिक यशस्वी होस्टिंग बिझनेस चालवण्यात मदत करू शकते. कमाई डॅशबोर्डमधील वैशिष्ट्ये कशी वापरायची ते येथे दिले आहे.
इंटरॲक्टिव्ह कमाई चार्ट
डॅशबोर्डच्या वरच्या भागात असलेला कमाईचा चार्ट हे दाखवतो:
- मागील सहा महिन्यांतील प्रत्येक महिन्यात तुम्ही किती कमाई केली आहे
- या महिन्यात तुम्ही आतापर्यंत किती कमाई केली आहे
- आगामी बुकिंग्जच्या आधारावर पुढील पाच महिन्यांतील प्रत्येक महिन्यात तुम्ही किती कमाई कराल याचा अंदाज लावला आहे
तुमची कमाई महिन्यानुसार किंवा वर्षानुसार पाहण्यासाठी चार्ट मोठा करा आणि लिस्टिंगनुसार पाहण्यासाठी फिल्टर वापरा.
कमाईच्या इंटरॲक्टिव्ह चार्टखाली, कामगिरीच्या आकडेवारीमध्ये बुक झालेल्या एकूण रात्री आणि वास्तव्याचा सरासरी कालावधी दाखवला जातो.
कमाईचा सारांश चालू वर्षाच्या 1 जानेवारीपासून तुमची एकूण कमाई, वजावटी आणि एकूण निव्वळ पेमेंट हायलाईट करतो.
कमाई कार्ड्स
पेमेंट पाठवले गेल्यावर कमाई डॅशबोर्डवर एक कमाई कार्ड दिसते. त्यात हे दाखवले जाते:
- पेआऊट पद्धत
- व्यवहाराची रक्कम
- प्रॉसेसिंगसाठी लागणारा अंदाजे वेळ
अधिक तपशील पाहण्यासाठी व्यवहार उघडा.
कमाईच्या प्रकारानुसार फिल्टर करा
आगामी किंवा सशुल्क व्यवहारांचा आढावा घेताना तुमची कमाई प्रकारानुसार फिल्टर करा. प्रकारांमध्ये हे समाविष्ट आहे:
- घरे
- अनुभव
- सेवा
- क्रेडिट्स
- रिझोल्युशन्स
तुम्ही तारीख, लिस्टिंग आणि पेआऊट पद्धतीनुसारही व्यवहार फिल्टर करू शकता.
कमाईचे रिपोर्ट्स
Airbnb तुम्ही ज्या महिन्यापासून होस्टिंग सुरू केले, अगदी त्या महिन्यापासून तुमच्यासाठी मासिक आणि वार्षिक स्टेटमेंट्स जनरेट करते. तुम्ही कोणताही रिपोर्ट डाऊनलोड करू शकता किंवा तुमच्या रेकॉर्ड्ससाठी PDF कॉपी ईमेल करू शकता.
तुम्ही निवडलेल्या कोणत्याही लिस्टिंगसाठी आणि तारखांच्या कालावधीसाठी कस्टम रिपोर्ट्ससुद्धा तयार करू शकता. प्रत्येक रिपोर्टमध्ये तुमची एकूण कमाई, वजावटी आणि एकूण निव्वळ पेमेंटचे विवरण दिले जाते.
तुमच्याकडे हेदेखील समाविष्ट करण्याचा पर्याय आहे:
- प्रति पेआऊट अकाऊंटनुसार एकूण कमाई दाखवणाऱ्या पेआऊट पद्धती
- परफॉर्मन्सची आकडेवारी, जी बुक झालेल्या रात्री आणि वास्तव्याचा सरासरी कालावधी दाखवते
तुम्हाला काय समाविष्ट करायचे हे निवडल्यानंतर, तुम्ही तुमच्या रेकॉर्ड्ससाठी रिपोर्टची PDF डाऊनलोड करू शकता किंवा ईमेल करू शकता.
Settings and documents
कमाई डॅशबोर्डच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या गिअर आयकॉनद्वारे तुम्ही या गोष्टी ॲक्सेस करू शकता:
- पेआऊट पद्धती आणि पेआऊट विभाजनाचे पर्याय
- करदात्याचे तपशील आणि करासंबंधी डॉक्युमेंट्स
- कोणत्याही लिस्टिंगसाठी आणि तारखांच्या रेंजसाठी कमाईचे रिपोर्ट्स
- संकटाच्या वेळी लोकांना सहाय्य करण्यासाठी प्रत्येक पेआऊटच्या काही टक्के रक्कम Airbnb.org ला आवर्ती स्वरूपात दिलेली देणगी
User experience may vary by location.
Information contained in this article may have changed since publication.