गेस्ट्सना आवडतील असे तपशील ॲड करा
हायलाइट्स
तुमच्या गेस्ट्ससाठी एक अविस्मरणीय अनुभव तयार करणे तुमची जागा विचारपूर्वक डिझाइन केल्यापासून सुरू होते
तज्ञांच्या सल्ल्यांमध्ये तुमच्या जागेसाठी टोन सेट करणे, उबदार जाणवणारे कोनाडे तयार करणे आणि तुमचे डिझाईन वैयक्तिकृत करण्याचा समावेश आहे
लहान, स्थानिक भेटवस्तू आणि सुविधा गेस्ट्सचे वास्तव्य वाढवण्यात मदत करू शकतात
- तुमच्या होस्टिंगचा स्तर उंचावण्यासाठी आमचे संपूर्ण गाईड वाचून अधिक शिका
जेव्हा गेस्ट्स कॅलिफोर्नियामधील हॉलीवूड बीच येथील बीच लॉजमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांना ताबडतोब टिफनी कॅलिवा-टॅल्डो कोण आहे याची जाणीव होते. त्यांची विचारशीलता आणि डिझाइनबद्दलचे प्रेम तिच्या सजावटीच्या-रंग, पोत आणि प्रत्येक वैयक्तिकृत स्पर्शातील निवडींतून दिसून येते. एके काळच्या सर्जनशील दिग्दर्शक म्हणून, त्यांनी नेहमीच तपशीलांवर लक्ष ठेवले आहे. येथे, ती Airbnb च्या यशाचे रहस्य शेअर करणार आहे.
द बीच लॉजचे नवीन रंग-रूप
“आम्ही बीच लॉजची दुरूस्ती करण्यापूर्वी, ते म्हणजे एक कुरूप गडद हिरवे घर होते. लोक त्याला ‘ड्रग अड्डा’ म्हणत असत आणि पुढे गेल्यावर तेथून पळत असत! शेजार्यांना वाटले की आम्ही ते खरेदी करायला वेडे आहोत, परंतु मला त्यात काहीतरी विशेष दिसले—आणि मला असा विचार होता की जर आपण ते पूर्ववत करू शकलो तर लोक येतील. मी त्यात जीव ओतला आहे—आणि मला वाटते की गेस्ट्स त्यामुळेच पुन्हा-पुन्हा येतात."
अतिरिक्त प्रयत्नांबाबतच्या टिफनीचे 7 सल्ले
एक वाईब घडवा
“अविस्मरणीय अनुभव तयार करणे हे नेहमीच योग्य टोन सेट करण्यापासून सुरू होते. जेव्हा मी स्पेस डिझाईन केली, तेव्हा मी माझ्या ग्राहकांना थीमऐवजी भावनेने सुरुवात करण्यास सांगितली. जेव्हा तुमचे गेस्ट्स तुमच्या घरी येतात तेव्हा तुम्हाला कसे वाटते? बीच लॉजसाठी, शब्दश: समुद्राच्या थीमसह जाण्याऐवजी, मी रंग, पोत आणि तपशीलांबद्दल सर्वांगीण विचार केला:हवेच्या मध्यम छटांमध्ये उठून दिसणार्या पॅटर्न्स, वाळूचा भास व्हावा अशा छटा आणि आऊटडोअरची भावना घराच्या आतच आणावी यासाठी भरभरून वनस्पती आणून ठेवल्या."
किमान खर्चात डिझाइन करा
“सजावट करणे महागच असायला हवे असे काही नाही! फ्ली मार्केट्स आणि थ्रिफ्ट स्टोअर्समध्ये स्वस्तात मिळणारा खजिना आणि अनेकातून एखादी मिळेल अशा वेचक गोष्टी ज्यांची आपलीच एखादी कहाणी असावी असे भासतात. तुम्हाला फक्त जरा शोधून काढावे लागतील. मी विशेषतः माझ्या फिलिपिनो आणि आशियाई वारशाचे प्रतिनिधित्व करणार्या वस्तूंकडे आकर्षित झाले आहे. तुम्ही तुमच्या जागेसाठी निवडलेल्या आयटम्सनी काहीतरी सांगावे आणि ते समुच्चयाने तुमच्या घराची एक मोठी गोष्ट सांगण्यास मदत करतील.”
खेळवत ठेवा
“मी माझ्या क्लायंट्सना आणखी एक सल्ला शेअर करते ते म्हणजे स्वत:च्या कल्पकतेला खेळवत ठेवा. सजावट बदलून टाका. नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक सीझनच्या काळामध्ये नवीन काहीतरी अनुभवू द्या तुम्ही काय साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहात आणि काय नाही हे शोधण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. तुमची जागा म्हणजे एक जटीलता आणि व्यक्तित्व असलेली व्यक्ती असल्याची कल्पना करा. तुमच्याप्रमाणे, ती बदलली पाहिजे, बदलत राहिली पाहिजे आणि सुखद क्षणांसाठी स्वत:चीच एक सर्वोत्तम आवृत्ती बनली पाहिजे.”
लहानशा बसायचा जागा तयार करा
“मला अनपेक्षित मार्गांनी जागांशी आणि व्हिज्युअल इंटरेस्टसह खेळायला आवडते. मी शिफारस करते अशी टीप म्हणजे तुमच्या घराभोवती—लहानशी गेटअवे क्षेत्रे बनवा जेथे गेस्ट्स वाचनात हरवू शकतील. मी कोपर्यावर काही ब्लॅंकेट्स, उश्या आणि एखादे पेंटिंग लावू शकतो जेणेकरून ती व्यवस्थाच लोकांना निवांत वेळ घालवण्यासाठी आमंत्रित करेल. तुम्ही जागोजागी लहानसे विकासकोनाडे कसे तयार करू शकाल याचा विचार करा.
प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी जागा बनवा
“जिथे शक्य असेल तिथे, तुमच्या गेस्ट्सच्या वास्तव्याला खास असा कल्पनास्पर्श द्या जो अधिक उठावदार वाटून जाईल. उदाहरणार्थ, जर कोणी ते वाढदिवस साजरा करत आहेत असे नमूद केले तर मी माझ्या आवडत्या जवळच्या बेकरीमधून कपकेक देऊन जाईन. जर ते व्हीगन असतील तर मी स्थानिक रेस्टॉरंटची यादी तयार करेन. जर ते मुलांना घेऊन आलेले कुटुंब असेल तर मी अधिक दांडगटांसाठी उश्या आणि लिनन्स बदलून ठेवेन. या विचारपूर्वक केलेल्या गोष्टी खरोखरच गेस्ट्सच्या नजरेत भरणार्या ठरतात. तुम्हाला ते तुमच्या रिव्ह्यूज आणि रिपीट बुकिंग्जमध्ये दिसून येईल.”
त्यांना टेक-होम ट्रीट द्या
“जवळच्या बिझनेसना गिफ्ट कार्ड्स किंवा स्थानिक कलाकारांकडून पोस्टकार्ड्स यासारख्या, खास आणि स्वागतार्ह वाटणाऱ्या साध्या भावनांच्या रूपात आल्यावर मी गेस्ट्सना स्मृतिचिन्ह किंवा कीपके देण्याची शिफारस करेन.”
"ती कल्पना आणखी पुढे नेण्यासाठी, गेस्ट्स थेट बीच लॉजमधून किंवा मी तयार केलेल्या ऑनलाइन स्टोअरमधून आयटम खरेदी करू शकतात, ज्यात निसर्ग-अनुरूप कपडे आणि लिनन्स तसेच व्हिंटेजचे तुकडे असू शकतील. मी मला महत्त्वाचे असलेल्या महिलांच्या मालकीचे आणि स्थानिक ब्रॅंड्सना विशेष उठाव देण्याचा प्रयत्न केला. मी कोणताही नफा घेत नाही. याचा उद्देश लोकांना या ब्रॅंड्सशी जोडण्याचा आहे. हा माझ्यासाठी कुठल्याही गेटअवेच्या पलीकडचा आहे.”
एखाद्या क्रूझ डायरेक्टरच्या भूमिकेत जा
“आम्ही आमच्या घराचे नाव बीच लॉज ठेवले आहे कारण आमच्यासाठी, लोक एकत्र येण्यासाठी लॉज ही मायेची ऊब असलेली एक जागा आहे. मी येथे बोर्ड गेम्स, योगा मॅट्स, हस्तकला, कारिगिरीचे साहित्य, बार्बेक्यु ग्रिल, बीच टॉवेल्स, बाईक्स, हरवून जाण्यासाठी पुस्तकांसह आणि रेकॉर्ड प्लेअर स्टॉक करून ठेवलेले असतात. प्रवास म्हणजे क्षितिजे विस्तारण्याची क्रिया आहे आणि या कृतींमुळे लोकांना आठवणी आणि अस्तित्वाचे नवीन मार्ग तयार करण्यात मदत होऊ शकते. कोणत्या सुविधांमुळे त्यांचा एकूण अनुभव वाढण्यास मदत होऊ शकते याचा विचार करा.”
लक्षात ठेवा की हे फक्त आणि फक्त लहानसहान गोष्टींकडे बारकाईने लक्ष देण्याबाबत आहे! या विचारपूर्वक केलेल्या गोष्टींमधून, गेस्ट्सना तुम्ही तुमच्या जागेत घेत असलेली काळजी खरोखरच जाणवेल—आणि ते पुन्हा-पुन्हा येत राहतील.
हायलाइट्स
तुमच्या गेस्ट्ससाठी एक अविस्मरणीय अनुभव तयार करणे तुमची जागा विचारपूर्वक डिझाइन केल्यापासून सुरू होते
तज्ञांच्या सल्ल्यांमध्ये तुमच्या जागेसाठी टोन सेट करणे, उबदार जाणवणारे कोनाडे तयार करणे आणि तुमचे डिझाईन वैयक्तिकृत करण्याचा समावेश आहे
लहान, स्थानिक भेटवस्तू आणि सुविधा गेस्ट्सचे वास्तव्य वाढवण्यात मदत करू शकतात
- तुमच्या होस्टिंगचा स्तर उंचावण्यासाठी आमचे संपूर्ण गाईड वाचून अधिक शिका