सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

तुमचे भाडे धोरण सेट करणे

तुमची भाडी नियमितपणे ॲडजस्ट करा आणि गेस्टची मागणी आणि सीझनचा विचार करा.
Airbnb यांच्याद्वारे 4 डिसें, 2025 रोजी

Airbnb ॲपमुळे तुमचे भाडे आणि उपलब्धता मॅनेज करणे सोपे होते. तुम्हाला अधिक बुकिंग्ज मिळवण्यात आणि तुमच्या कमाईच्या उद्दिष्टांना सपोर्ट करण्यात मदत करण्यासाठी तुमची होस्टिंग टूल्स कशी वापरावी ते येथे दिले आहे.

तुमच्या कॅलेंडरचा नियमितपणे आढावा घ्या

गेस्ट्स उत्तम मूल्य देऊ करणारे Airbnb अनुभव शोधत असतात. स्पर्धात्मक राहण्यासाठी तुम्ही किती शुल्क आकारता आणि तुम्ही किती वेळा होस्ट करता याचे पुनर्मूल्यांकन करण्याची सवय लावून घ्या.

तुम्ही तुमची भाडे आणि उपलब्धता सेटिंग्ज थेट तुमच्या कॅलेंडरमध्ये ॲडजस्ट करू शकता. या घटकांना सर्वात जास्त महत्त्व द्या.

  • आठवड्याचा दिवस: वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी भाडी सेट करण्याचा विचार करा. उदाहरणार्थ, लोकांना बुकिंग करण्यास प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही कमी मागणी असलेल्या दिवसांसाठी कमी शुल्क आकारू शकता.
  • दिवसाची वेळ: विविध गेस्ट्सना आकर्षित करण्यासाठी आणि उपलब्धता जोडण्यासाठी सर्वोत्तम वेळांचा विचार करा. उदाहरणार्थ, दिवसा काम करणाऱ्या आणि जास्त गर्दीचे वीकेंड्स टाळू इच्छिणाऱ्या स्थानिकांना वीकडेची संध्याकाळ आकर्षित करू करते.
  • ग्रुप सवलती: तुम्ही मोठ्या ग्रुप्सना आकर्षित करण्यासाठी प्रति व्यक्ती सवलतीचे दर ऑफर करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही 2 ते 3 लोकांसाठी 10% सवलत, 4 ते 5 लोकांसाठी 20% सवलत आणि 6 पेक्षा जास्त लोकांसाठी 30% सवलत ऑफर करू शकता.
  • कुटुंबे: 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना विनामूल्य किंवा कमी भाड्यात सहभागी होण्याची परवानगी देण्याचा विचार करा.
  • शेवटच्या क्षणी बुकिंग्ज: एखादा अनुभव केवळ अंशतः बुक केला गेला असल्यास, उर्वरित स्पॉट्स भरण्यासाठी तुमचे भाडे ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करा.
  • ग्रुपचा आकार: तुम्ही तुमचा अनुभव दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ऑफर करत असल्यास ओव्हरसेलिंग टाळण्यासाठी तुम्ही तुमचे रिकामे स्पॉट्स ॲडजस्ट करू शकता.

जास्त गर्दीच्या वेळांसाठी तयारी करा

उच्च मागणीचे सीझन्स तुमचा बिझनेस वाढवण्यात मदत करू शकतात. या भाडे सल्ल्यांसह गेस्ट्सकडून अधिक मागणीसाठी नियोजन करा.

  • इन्स्टंसेस जोडा: हवामान, सुट्ट्या आणि कॉन्सर्ट्स, फेस्टिव्हल्स आणि स्पोर्ट्स टूर्नामेंट्स यांसारख्या मोठ्या इव्हेंट्समुळे तुमच्या भागात अधिक पर्यटक येतात तेव्हा तुमचा अनुभव जास्त वेळा ऑफर करा.
  • गेस्ट्सची संख्या अपडेट करा: शेवटच्या क्षणी येणाऱ्या गेस्ट्सना आकर्षित करण्यासाठी सीट्सची संख्या वाढवण्याचा आणि भाडे ॲडजस्ट करण्याचा विचार करा. तुम्ही हे बदल तुमच्या 'आज' टॅबमध्ये करू शकता.

गर्दीचे सीझन्स ही देखील तुमची लिस्टिंग सर्चमध्ये नजरेत भरेल अशा प्रकारे अपडेट करण्याची एक चांगली संधी आहे. वर्षातील वेळ हायलाईट करण्यासाठी तुमचे शीर्षक आणि वर्णन ॲडजस्ट करण्याचा किंवा नवीन इमेजेस जोडण्याचा विचार करा.

कमी गर्दीच्या वेळांसाठी प्लॅन करा

कमी मागणीच्या काळात तुमची लिस्टिंग नजरेत भरण्यासाठी मदत करणारे मार्ग येथे दिले आहेत.

  • सवलती जोडा: अगदी कमी सवलतीदेखील सर्चमधील तुमची प्लेसमेंट सुधारू शकतात. अर्ली बर्ड आणि मोठ्या ग्रुपसाठी सवलती देऊन कमी भाडे ऑफर करण्याचा विचार करा. तुमची सवलत एकूण भाड्याच्या 10% पेक्षा जास्त असल्यास, सर्च रिझल्ट्समध्ये आणि तुमच्या लिस्टिंग पेजवर तुमच्या काट मारलेल्या मूळ भाड्याच्या बाजूला तुमचे सवलतीचे भाडे दाखवले जाईल.*
  • शेवटच्या क्षणीच्या बुकिंगसाठी वाव ठेवा: तुमच्या बुकिंगसाठीचा कटऑफ वेळ कमी करा म्हणजे गेस्ट्स त्याच दिवशी किंवा एक दिवस आधी बुक करू शकतील. सर्व बुकिंग्जपैकी निम्मी बुकिंग्ज अनुभव सुरू होण्यापूर्वी 1 आठवड्यापेक्षा कमी काळात होतात.** स्थानिक लोक आणि लवचिक प्लॅन्स असलेले पर्यटक यांच्यासारखे गेस्ट्स कमी गर्दीच्या काळात नेहमीपेक्षा उशिरा बुकिंग करतात.

*तुमच्या एकूण भाड्यावर किमान $3 USD किंवा स्थानिक समतुल्य सवलत असणे आवश्यक आहे

**जगभरातील 30 शहरांमधील 13 मे 2025 ते 20 जुलै 2025 पर्यंतच्या अनुभव रिझर्व्हेशन्सवर आधारित

तुमची भाडी आणि इतर सेटिंग्ज नेहमी तुमच्याच नियंत्रणात असतात. तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स वेगवेगळे असू शकतात.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
4 डिसें, 2025
हे उपयुक्त ठरले का?