सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

तुमच्या पहिल्या गेस्ट्सना आकर्षित करणे

तुमच्या अनुभवाचा बिझनेस वाढवण्यासाठी तुमचे कॅलेंडर आणि प्राईसिंग टूल्स वापरा.
Airbnb यांच्याद्वारे 4 डिसें, 2025 रोजी

आता तुमचा Airbnb अनुभव पब्लिश झाला असल्यामुळे तुम्ही गेस्ट्सना आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. उपलब्धता जोडणे, स्पर्धात्मक भाडे सेट करणे आणि तुमचे पहिले 5-स्टार रिव्ह्यूज मिळवणे यामुळे गती वाढवण्यात मदत होऊ शकते.

तुमचे कॅलेंडर अपडेट करा

तुम्ही उपलब्धता जोडेपर्यंत तुमची लिस्टिंग Airbnb वर दिसणार नाही. तुमचे कॅलेंडर लगेच अपडेट करा जेणेकरून गेस्ट्स बुकिंग करू शकतील. ॲक्टिव्हिटीचा कालावधी, तुमची उपलब्धता आणि तुमच्या बिझनेसच्या उद्दिष्टांच्या आधारे, तुम्ही ॲक्टिव्हिटी किती वेळा ऑफर कराल हे ठरवा. तुमच्याकडे को-होस्ट असल्यास, तुमच्यापैकी प्रत्येकजण अनुभव कधी होस्ट करेल ते ठरवा.

उपलब्धता जोडण्यासाठी, तुम्हाला ज्या दिवशी होस्ट करायचे आहे तो दिवस निवडा आणि अनुभव शेड्युल करा वर टॅप करा. वेळ, बुकिंगचा प्रकार, भाडे, ग्रुपचा आकार आणि इतर तपशील निवडा. तुम्ही पूर्वतयारी करण्यासाठी किंवा साफसफाईसाठी ॲक्टिव्हिटीच्या आधीचा आणि नंतरचा वेळ ब्लॉक करू शकता.

तुमची लिस्टिंग नजरेत भरण्यास मदत होण्यासाठी हे सल्ले वापरून पहा.

  • अधिक उपलब्धता खुली करा: तुम्ही जितक्या जास्त तारखा आणि वेळा उपलब्ध करून द्याल तितकी जास्त बुकिंग्ज तुम्हाला मिळण्याची शक्यता असते. यशस्वी होस्ट्स अनेकदा दरमहा 10 किंवा त्याहून अधिक वेळा अनुभव ऑफर करतात, ज्यात दर आठवड्यात किमान एक वीकेंडचा दिवस समाविष्ट असतो.
  • आगाऊ प्लॅन करा: बुकिंग मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी बरेच होस्ट्स 3 महिन्यांपर्यंतची उपलब्धता जोडतात. तुम्ही दररोज ऑफर करत असलेला अनुभव 60 दिवसांपर्यंत अगोदर आणि आठवड्यातून एकदा ऑफर करत असलेला अनुभव 52 आठवड्यांपर्यंत अगोदर शेड्युल करू शकता.
  • तुमची कॅलेंडर्स सिंक करा: एकाच ठिकाणी सर्व काही ट्रॅक करण्यात आणि चुकून डबल बुकिंग्ज टाळण्यात मदत करण्यासाठी तुमची Airbnb आणि Google बिझनेस कॅलेंडर्स सिंक करा. उदाहरणार्थ, जेव्हा एका कॅलेंडरमध्ये एखादी रात्र बुक केली जाते, तेव्हा ती दुसऱ्या कॅलेंडरमध्ये आपोआप ब्लॉक केली जाते.
  • संधी शोधा: तुम्ही होस्टिंग सुरू केल्यानंतर, कमी गर्दीच्या आणि जास्त गर्दीच्या वेळा ओळखा आणि त्यानुसार तुमची उपलब्धता आणि भाडे ॲडजस्ट करण्याचा विचार करा. तुम्ही आता जितकी जास्त उपलब्धता ऑफर कराल, तितकी जास्त मागणी असलेल्या वेळी तुम्ही ती मागणी पूर्ण करण्याची शक्यता जास्त असेल.

स्पर्धात्मक भाडे सेट करा

तुमचे भाडे फाईन-ट्यून केल्याने तुम्हाला तुमची पहिली बुकिंग्ज मिळवण्यात आणि गती वाढवण्यात मदत होऊ शकते. 4 मुख्य घटक विचारात घ्या.

  • ऑपरेटिंग खर्च: तुमचे भाडे तुमचा खर्च भागवत असल्याची खात्री करा.
  • कमाई: काहीवेळा प्रति व्यक्ती कमी भाडे ऑफर केल्याने अधिक गेस्ट्स आकर्षित होऊ शकतात आणि तुमची कमाई वाढू शकते. उदाहरणार्थ:
    • 4 गेस्ट्सनी प्रत्येकी $75 USD ला बुक केले = $300 USD
    • 8 गेस्ट्सनी प्रत्येकी $60 USD ला बुक केले = $480 USD
  • याच प्रकारचे अनुभव: स्थानिक भाड्यांची तुलना करण्यासाठी आणि स्पर्धात्मक काय आहे हे समजून घेण्यासाठी Airbnb आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर तुमच्यासारख्या ॲक्टिव्हिटीसारख्या ॲक्टिव्हिटीजचा शोध घ्या. Airbnb अनुभवासाठी जागतिक सरासरी भाडे श्रेणी $65 ते $81 USD आहे.*
  • एकूण भाडे: तुमच्या भाड्यात सर्व शुल्क आणि ग्रॅच्युईटीज समाविष्ट असणे आवश्यक आहे.

सवलत जोडणे हा तुमची लिस्टिंग नजरेत भरण्यास मदत करण्याचा आणखी एक मार्ग आहे. तुमच्या भाडे सेटिंग्जमध्ये 3 सवलती उपलब्ध आहेत.

  • मर्यादित काळासाठी: 90 दिवसांसाठी 5% ते 50% सवलत देऊन तुमच्या पहिल्या गेस्ट्सना आकर्षित करा आणि लवकर रिव्ह्यूज मिळवा.
  • अर्ली बर्ड: 2 आठवड्यांपेक्षा जास्त आधी बुकिंग करणाऱ्या गेस्ट्सना 20% सवलत द्या. हे आधीपासून प्लॅन करणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करते आणि तुम्हाला तुमचे कॅलेंडर भरण्यात मदत करते.
  • मोठा ग्रुप: तुम्ही मोठ्या ग्रुप्सना आकर्षित करण्यासाठी प्रति व्यक्ती सवलतीचे दर सेट करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही 2 ते 3 लोकांसाठी 10% सवलत, 4 ते 5 लोकांसाठी 20% सवलत आणि 6 पेक्षा जास्त लोकांसाठी 30% सवलत ऑफर करू शकता. बहुतेक गेस्ट्स किमान एका अन्य व्यक्तीसह अनुभव बुक करतात.*

तुमची सवलत तुमच्या एकूण भाड्याच्या 10% पेक्षा जास्त असल्यास, गेस्ट्सना सर्च रिझल्ट्समध्ये आणि तुमच्या लिस्टिंगमध्ये तुमच्या काट मारलेल्या मूळ भाड्याच्या बाजूला सवलतीचे भाडे दिसते.** तुम्ही एकापेक्षा जास्त सवलती जोडल्यास, गेस्टना सर्वात जास्त बचत करून देणारी सवलत मिळेल. त्यांना एकाच रिझर्व्हेशनवर अनेक सवलती मिळू शकत नाहीत.

खाजगी बुकिंग्ज ऑफर करा

तुम्हाला तुमचा अनुभव एखाद्या विशिष्ट गेस्टला किंवा ग्रुपला कस्टम भाड्यात ऑफर करायचा असेल. उदाहरणार्थ, तुमचा अनुभव कुटुंबासह आणि मित्रांसह कमी भाड्यात किंवा विनामूल्य शेअर करणे हा तुमचे पहिले 5-स्टार रिव्ह्यूज मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

खाजगी इन्स्टंस तयार करण्यासाठी, तुमच्या कॅलेंडरवर तारीख आणि वेळ निवडा, बदल करा वर टॅप करा आणि व्हिजिबिलिटी खाजगीला सेट करा. कस्टम लिंक कॉपी करा आणि ती एखाद्या विशिष्ट गेस्टसह किंवा ग्रुपसह शेअर करा. केवळ रिझर्व्हेशनमध्ये सामील होणारे गेस्ट्सच रिव्ह्यू देऊ शकतात.

*जगभरातील 30 शहरांमधील 13 मे 2025 ते 20 जुलै 2025 पर्यंतच्या अनुभव रिझर्व्हेशन्सवर आधारित

**तुमच्या एकूण भाड्यावर किमान $3 USD किंवा स्थानिक समतुल्य सवलत असणे आवश्यक आहे

तुमची भाडी आणि इतर सेटिंग्ज नेहमी तुमच्याच नियंत्रणात असतात. तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स वेगवेगळे असू शकतात.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

 

Airbnb
4 डिसें, 2025
हे उपयुक्त ठरले का?