को-होस्ट नेटवर्कमध्ये सामील व्हा
अनेक होस्ट्सना उच्च गुणवत्तेचा*, स्थानिक भागीदार त्यांना होस्टिंगमध्ये करण्यात मदत करण्यासाठी हवा आहे. लिस्टिंग सेटअपपासून ते गेस्ट सपोर्टपर्यंत, तुम्ही कोणत्या सेवा ऑफर करता ते तुम्ही निवडू शकता आणि इतरांना होस्ट करण्यात मदत करून पैसे कमवू शकता.
आता सामील व्हा

सादर आहे, को‑होस्ट नेटवर्क
आता तुम्ही को-होस्ट नेटवर्कद्वारे तुमच्या भागातील लिस्टिंग्जच्या होस्टना वैयक्तिकृत सपोर्ट ऑफर करू शकता.
नेटवर्कमध्ये सामील होऊन तुम्ही:- तुमच्या सेवांचा आणि भाड्याचा उत्तम प्रकारे प्रचार करू शकता
- संभाव्य भागीदारांशी कनेक्ट करू शकता
- तुमच्या स्वत:च्या गतीने स्वतंत्रपणे काम करू शकता

को-होस्ट नेटवर्क कसे काम करते

तुम्ही ऑफर करू शकता अशा सेवा
तुमच्या को-होस्ट प्रोफाईलमध्ये तुम्ही तुमच्या कौशल्यांची जाहिरात करता आणि तुम्ही देत असलेल्या सेवांविषयी तपशील जोडता. को-होस्टिंग सेवांच्या यादीतून निवडा:
- लिस्टिंग सेटअप
- भाडे आणि उपलब्धता सेट करणे
- बुकिंग विनंती मॅनेजमेंट
- गेस्टसोबत मेसेजिंग
- ऑनसाइट गेस्ट सपोर्ट
- स्वच्छता आणि देखभाल
- लिस्टिंगची फोटोग्राफी
- इंटिरिअर डिझाइन आणि स्टायलिंग
- लायसन्सिंग आणि होस्टिंगचे परमिट
को-होस्ट नेटवर्कमध्ये सामील होण्यासाठी पात्र ठरण्यासाठी तुम्ही विशिष्ट आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे.
अधिक जाणून घ्यामायकेल, पॅरिसमधील को-होस्ट
"मी को-होस्ट झाल्यापासून मला आता माझ्या कामात एकटेपणा जाणवत नाही. मला असे वाटते की माझा बिझनेस वाढवण्यासाठी आणि माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी मला आवश्यक असलेला सपोर्ट आणि प्रोत्साहन मिळत आहे."
तुम्हाला यशस्वी होण्यात मदत करण्यासाठी सपोर्ट
विशेष टूल्स
तुमचा बिझनेस तुमच्या पद्धतीने मॅनेज करा. नेटवर्क तुम्हाला होस्ट्सशी यशस्वीरित्या जुळवून घेण्यात मदत करण्यासाठी टूल्स ऑफर करते आणि तुम्ही तुमचे को-होस्टिंग आणि बिझनेस वाढवत असताना तुम्हाला सपोर्ट करते.
संसाधने आणि कम्युनिटी
तुम्ही वापरू शकता अशा टूल्सबद्दलच्या शैक्षणिक संसाधनांची मालिका एक्सप्लोर करा आणि तुम्हाला सुरुवात करण्यात मदत करू शकणाऱ्या को-होस्ट्सच्या ॲक्टिव्ह कम्युनिटीशी कनेक्ट करा.

Michael
फ्रान्स (पॅरिस)

Guillermo
स्पेन (ग्रॅनाडा)

Julie
फ्रान्स (ले टूके)

Anne-Lie
स्पेन (टेनेरीफे)

Clarysse & Arthur
फ्रान्स (पॅरिस)

Ousmane
फ्रान्स (नांतेयर)

Gabriel
स्पेन (मार्बेला)

तुम्ही एखाद्या को-होस्टच्या शोधात आहात का?
को-होस्ट नेटवर्कवर तुमच्या घराची आणि गेस्ट्सची काळजी घेणारा एक उच्च गुणवत्तेचा, स्थानिक होस्ट शोधा. को-होस्ट नेटवर्कवरील होस्ट्स सहसा उच्च रेटिंग्ज, कमी कॅन्सलेशन दर आणि Airbnb वर होस्टिंगचा पुरेसा अनुभव असलेले असतात. रेटिंग्ज त्यांनी होस्ट केलेल्या किंवा को-होस्ट केलेल्या लिस्टिंग्जच्या गेस्ट रिव्ह्यूजवर आधारित असतात आणि त्या कदाचित को-होस्टच्या अनोख्या सेवांचे पूर्ण किंवा योग्य चित्रण असणार नाही.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
को-होस्ट बनण्यासाठी कोणत्या आवश्यकता आहेत?
को-होस्ट नेटवर्कमध्ये सामील होण्यासाठी या आवश्यकता आहेत:
- तुमचे होस्ट म्हणून एक ॲक्टिव्ह लिस्टिंग आहे किंवा को-होस्ट म्हणून संपूर्ण ॲक्सेस किंवा कॅलेंडर आणि मेसेजिंगचा ॲक्सेस आहे.
- तुम्ही गेल्या 12 महिन्यांमध्ये Airbnb वर—10 किंवा त्यापेक्षा जास्त वास्तव्ये—किंवा एकूण किमान 100 रात्रींसाठी तीन किंवा त्यापेक्षा जास्त वास्तव्ये होस्ट किंवा को-होस्ट केली आहेत.
- गेल्या 12 महिन्यांत, तुम्ही होस्ट करत असलेल्या किंवा संपूर्ण ॲक्सेससह अथवा कॅलेंडर आणि मेसेजिंगच्या ॲक्सेससह को-होस्ट करत असलेल्या सर्व लिस्टिंग्जसाठी तुम्ही गेस्ट्सकडून सरासरी 4.8 स्टार्स किंवा त्याहून अधिक रेटिंग कायम राखले आहे.
- तुमच्या नियंत्रणाबाहेरील विशिष्ट वैध कारणांमुळे केलेल्या कॅन्सलेशन्सचा अपवाद वगळता तुमचा कॅन्सलेशन दर 3% पेक्षा कमी आहे.
- तुमचे Airbnb अकाऊंट चांगल्या स्थितीत आहे. तुमच्या ओळखीचे व्हेरिफिकेशन होणे आवश्यक आहे आणि तुमचा प्रोफाईल फोटोे नेटवर्कवर दाखवण्यासाठी त्याने आमच्या फोटोच्या आवश्यकतांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
को-होस्ट नेटवर्क कुठे उपलब्ध असेल?
को-होस्ट नेटवर्क ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युके आणि अमेरिकेसह 12 देशांमध्ये उपलब्ध आहे. नेटवर्क विस्तारादरम्यान कोणते अतिरिक्त देश सामील होत आहेत, हे पाहण्यासाठी संपर्कात रहा.
काही कायदेशीर आवश्यकता आहेत का?
को-होस्ट म्हणून, तुमच्याकडे—आणि तुमच्याबरोबर किंवा तुमच्या वतीने काम करणारे कोणतेही कर्मचारी किंवा एजंट्स यांच्याकडे—तुमच्या सेवांसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या, परवाने, विमा आणि/किंवा पात्रता आहेत, असे तुम्ही घोषित करता आणि त्याची हमी देता. उदाहरणार्थ, प्रॉपर्टी मॅनेजमेंट सेवा प्रदान करण्यासाठी तुम्ही लायसन्सधारक रिअल इस्टेट ब्रोकर असणे आवश्यक असू शकते आणि लायसन्सशिवाय काम केल्यास तुम्हाला आणि/किंवा तुम्ही ज्या होस्टसह काम करत आहात, त्यांना लक्षणीय दंड होऊ शकतो. स्थानिक कायदे कसे लागू होतात, याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असल्यास, फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही नेहमी कायदेशीर सल्ला घेतला पाहिजे.
मी किती कमाईची अपेक्षा करू शकतो?
तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी, तुमची आणि तुमच्या होस्टची तुमच्या सेवांच्या फीबद्दल सहमती झाली पाहिजे. अनेक को-होस्ट्स प्रत्येक बुकिंगसाठी टक्केवारी किंवा ठरविक रक्कम दिली जाणे, निवडतात.**
मी नवीन होस्ट्सशी कसे कनेक्ट करू?
तुम्हाला तुमच्या Airbnb इनबॉक्समध्ये होस्ट्सचे मेसेजेस मिळतील. तुम्ही तुमच्या सहयोगाच्या अटींबद्दल चर्चा करू शकाल, प्रति बुकिंग एका भाड्यावर सहमत होऊ शकाल आणि तुमचा करार एकत्रितपणे अंतिम करू शकाल. तुम्हाला कोणत्या लिस्टिंग्ज मॅनेज करायच्या आहेत आणि तुम्हाला कोणत्या होस्ट्ससह काम करायचे आहे, हे निवडण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे.
सुरुवात कशी करावी?
सर्वप्रथम तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. तुम्ही पात्र असल्यास, तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी, तुमची प्रोफाईल भरण्यासाठी आणि तुमची प्रस्तावित फी सेट करण्यासाठी आमंत्रण मिळेल. त्यानंतर, तुमच्या भागातील सपोर्ट शोधत असलेले होस्ट्स तुम्हाला शोधू शकतील.
को-होस्ट नेटवर्क सध्या ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन आणि युनायटेड किंग्डम (Airbnb Global Services द्वारा संचालित); कॅनडा, युनायटेड स्टेट्स (Airbnb Living LLC द्वारा संचालित) आणि ब्राझील (Airbnb Plataforma Digital Ltda द्वारा संचालित) मध्ये उपलब्ध आहे.अधिक जाणून घ्या
*को-होस्ट नेटवर्कवरील होस्ट्स सहसा उच्च रेटिंग्ज, कमी कॅन्सलेशन दर आणि Airbnb वर होस्टिंगचा पुरेसा अनुभव असलेले असतात. रेटिंग्ज त्यांनी होस्ट केलेल्या किंवा को-होस्ट केलेल्या लिस्टिंग्जच्या गेस्ट रिव्ह्यूजवर आधारित असतात आणि त्यांच्यावरून को-होस्टच्या विशेष सेवांचे संपूर्ण किंवा योग्य चित्र दिसेलच असे नाही. ** अनेक देशांमध्ये, तुम्ही प्रत्येक बुकिंगच्या पेआऊटचा एक भाग Airbnb द्वारा तुमच्या को-होस्टशी शेअर करू शकता. तुमचे आणि तुमच्या को‑होस्टचे लोकेशन किंवा तुमच्या लिस्टिंगचे लोकेशन यानुसार काही मर्यादा लागू होऊ शकतात.