सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

लिस्टिंगचे प्रभावी वर्णन लिहिणे

तुमच्या जागेत राहिल्यास कसे वाटेल हे समजण्यास गेस्ट्सना मदत करा.
Airbnb यांच्याद्वारे 18 नोव्हें, 2020 रोजी
28 नोव्हें, 2023 रोजी अपडेट केले

अपेक्षांना निश्चित करण्याचा आणि बुकिंग्ज मिळवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे आपल्या जागेचे सखोल वर्णन लिहिणे. गेस्ट्सना त्यांचे आगमन झाल्यावर त्यांना नक्की काय मिळेल हे त्यांना सांगा.

तुमचे लिस्टिंगचे वर्णन लिहा

Airbnb वर 70 लाखांहून अधिक घरे आहेत. तुमची जागा का वेगळी आहे याचे वर्णन करण्यासाठी लिस्टिंगचे वर्णन हा सेक्शन वापरा.

  • थोडक्यात वर्णन ठेवा. मुख्य वैशिष्ट्यांसाठी गेस्ट्स सहसा लिस्टिंगचे वर्णन पाहतात. सर्वात महत्त्वाचे काय आहे ते लिहून सुरुवात करा आणि तुमच्या लिस्टिंगच्या इतर भागांमध्ये दिसणारी माहिती पुन्हा लिहिणे टाळा, जसे की तुमच्याकडे दिल्या जाणाऱ्या सुविधांची संपूर्ण यादी.
  • तुमच्या जागेची कथा सांगा. तुम्ही पाहुण्यांना जे अनुभव देत आहात त्याबद्दल अचूक आणि संक्षिप्त माहिती द्या. मुख्य शहरापासून दूर एक साधी रूम "शहर एक्सप्लोर करण्यासाठी योग्य ठिकाण" असू शकते. झाडांनी वेढलेले, वरच्या मजल्यावरील अपार्टमेंट तुम्हाला “तुम्ही एखाद्या ट्रीहाऊसमध्ये राहत आहात” असा अनुभव देऊ शकते.

  • खास वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करा. गेस्ट्सना हव्या असलेल्या सर्वोच्च सुविधा हायलाइट करून तुमचे स्थान का वेगळे आहे ते स्पष्ट करा. प्रेरणेसाठी इतर लिस्टिंग्जचे वर्णन आणि रिव्ह्यूज वाचा आणि कोणत्या प्रकारची माहिती गेस्ट्सना पाहिजे असते हे जाणून घ्या.

  • वास्तववादी रहा. अति स्तुती किंवा अतिशयोक्ती केल्याने निराशा होऊ शकते आणि नकारात्मक रिव्ह्यूज मिळू शकतात. तुमच्या प्रोपर्टीच्या अशा पैलूंबद्दल आधीच माहिती द्या जे मर्यादित गतिशीलता असलेल्या किंवा मुले सोबत असलेल्या काही गेस्ट्ससाठी आव्हान ठरू शकतात.

इतर सर्व विभाग भरा

गेस्ट्सना तुमच्या जागेत राहण्याचा अनुभव कसा असेल हे समजण्यात मदत करण्यासाठी उर्वरित विभाग वापरा.

  • तुमची प्रॉपर्टी. तुमच्या रूम्स आणि जागांचे सामान्य वर्णन लिहा आणि गेस्ट्सना कदाचित जाणून घ्यायला आवडतील अशा मजेदार परंतु व्यावहारिक तपशीलांवर जोर द्या. उदाहरणार्थ, “मागील अंगणाला कुंपण असल्याने मुलांना आणि पाळीव प्राण्यांना बिनधास्त फिरता येईल.”
  • गेस्ट ॲक्सेस. गेस्ट्स कोणती जागा वापरू शकतात हे त्यांना कळवा. उदाहरणार्थ, “गेस्ट्स मुख्य घरासोबत असलेले अंगण वापरू शकतात.”
  • गेस्ट्सशी संवाद. अपेक्षा सेट करण्यासाठी तुमचे वैयक्तिक संवादाचे प्राधान्य निवडा. गेस्ट्ससोबत वेळ घालवण्यापासून ते अ‍ॅपद्वारे संवाद साधण्यापर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत.
  • लक्षात घेण्यासारखे इतर तपशील. तुमच्यामते गेस्ट्सना माहित असले पाहिजे असे कोणतेही तपशील द्या जे इतर कुठेही दिलेले नाहीत. उदाहरणार्थ, “हे घर शहराच्या मध्यभागापासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे.”

पब्लिश झाल्यानंतर या लेखात असलेल्या माहितीमध्ये कदाचित बदल झालेला असू शकेल.

Airbnb
18 नोव्हें, 2020
हे उपयुक्त ठरले का?