तुमच्या जागेबद्दल माहिती शेअर करण्यासाठी सुविधा सूची लिहा
हायलाइट्स
सुविधा सूची तयार करा
ती संक्षिप्त आणि समजून घेण्यास सोपी असू द्या
आधी वायफाय पासवर्ड समाविष्ट करा
- यशस्वी लिस्टिंग सेट करण्याची पद्धत समजून घेण्यासाठी आमच्या संपूर्ण गाईड मध्ये अधिक माहिती मिळवा
"मी वायफायशी कसे कनेक्ट करू? थर्मोस्टॅट कुठे आहे? कोणता रिमोट काय करतो?" तुमच्या जागेत वास्तव्य करताना गेस्ट्सना पडणाऱ्या प्रश्नांमधील हे फक्त काही प्रश्न आहेत. तुम्ही त्यांना उत्तरे मिळवण्यात मदत करू शकता—आणि तुमच्या घरातील उपकरणे आणि इतर वैशिष्ट्ये योग्यरित्या वापरली जातील याची खात्री करण्यात मदत करू शकता—Airbnb च्या सुविधा सूची टूलसह.
सुविधा सूची टूलमुळे तुम्ही गेस्ट्सना स्पष्ट, टप्प्याटप्प्याने सूचना देऊ शकता आणि त्यांना सुरक्षा साधने किंवा वायफायसाठी राऊटर यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी कुठे सापडतील हे सांगू शकता. तुमची सूची एकदा तयार करा आणि तुम्हाला प्रत्येक बुकिंगसाठी ईमेल्स पुन्हा लिहिण्याची किंवा पुन्हा पाठवण्याची गरज भासणार नाही—त्यामुळे तुमचा भरपूर वेळ वाचेल. आणि गेस्ट्स ॲपवरून ते ॲक्सेस करू शकत असल्यामुळे, ते त्यास कधीही कुठूनही तपासू शकतात. माऊंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया येथील होस्ट नील, यांना हे वैशिष्ट्य त्यांना कसे “रात्री उशिरा आलेले टेक्सट्स, चिंताग्रस्त कॉल्स आणि सर्वात वाईट म्हणजे: खराब रिव्ह्यूज” टाळण्यासाठी मदत करते हे आवडते.
तुमच्यासारख्या होस्ट्सच्या या वापरून पाहिलेल्या आणि चाचणी केलेल्या सल्ल्यांसह सुविधा सूची टूलचा जास्तीत जास्त लाभ घ्या.
वायफाय पासवर्डपासून सुरुवात करा
गेस्ट्स येतात तेव्हा विचारल्या जाणाऱ्या पहिल्या गोष्टींपैकी हे एक आहे, त्यामुळे बरेच होस्ट्स त्यांची सुविधा सूची गेस्ट्सना स्पष्ट दिसेल अशी ठेवतात. ट्रॉम्स, नॉर्वे येथील मरीट ॲन म्हणतात, “त्यांना सर्वांना वायफाय कोड हवा असतो, म्हणून तो मी सुविधा सूचीमध्ये जोडला आहे जेणेकरून गेस्ट्सनी सूची उघडावी आणि अपेक्षेप्रमाणे ती वाचावी यासाठी ही माझी युक्ती आहे.”
रिमोट वर्कर्स साठी वायफाय पासवर्डचा सुलभ ॲक्सेस विशेषकरून उपयुक्त आहे कारण तुमच्या जागी येताच त्यांना व्हर्च्युअल मीटिंगमध्ये सामील होणे, ईमेल पाठवणे किंवा रिपोर्ट टाईप करून पूर्ण करणे आवश्यक असू शकते.
पार्किंगची माहिती समाविष्ट करा
रस्त्यावर पार्क करण्याचे नियम आणि चिन्हे गोंधळात टाकू शकतात, खासकरून जर गेस्ट्स दुसरी भाषा बोलत असतील तर. न्यूझीलंड मधील वेलिंग्टन येथील होस्ट्स बेन आणि एंजेल यांच्यासारख्या स्पष्ट सूचना देणे चांगले राहील: “हेजजवळ, ड्राइव्हवेच्या उजव्या बाजूला पांढऱ्या पीकेटच्या कुंपणाच्या समोर तुम्ही पार्क करू शकता.”
पाळीव प्राणी- आणि कौटुंबिक-अनुकूल वैशिष्ट्ये हायलाईट करा
तुम्ही तुमच्या जागेमध्ये पाळीव प्राणी किंवा मुले यांचे स्वागत करत असल्यास, तुम्ही त्यांना सामावून घेण्यासाठी समाविष्ट केलेल्या सर्व वैशिष्ट्यांची माहिती देणे उपयुक्त ठरू शकते, विशेषकरून कारण त्यांच्या आगमनापूर्वी तुम्ही तुमची सुविधा सूची गेस्ट्ससह शेअर करू शकता जेणेकरून ते पुढची योजना आखू शकतील. तुम्ही तुमची सूची यासाठी वापरू शकता:
- पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थ आणि पाण्यासाठीच्या वाट्या कुठे आहेत ते सांगा
- घाण पाय आणि पंज्यांसाठी कोणते टॉवेल्स वापरावेत ते ठरवा
- मुलांसाठी असलेल्या कोणत्याही सुविधांचा उल्लेख करा, जसे की क्रिब किंवा हाय चेअर
- कोणत्या रूम्समध्ये धूर आणि कार्बन मोनॉक्साईड अलार्म्स आहेत हे सांगा
गेस्ट्सना सुविधा कुठे शोधाव्या (आणि त्या कशा वापराव्या) ते सांगा
लांबचा प्रवास करून आल्यानंतर, काही घरगुती आवश्यक गोष्टी शोधणे आणि वापरणे कठीण होऊ शकते. सॅन फ्रॅन्सिस्कोमधील होस्ट्स जोह आणि जियान ही उदाहरणे देतात:
- “हीटर: टीव्ही जवळ भिंतीवर थर्मोस्टेट लावला आहे. कृपया तुम्ही निघताना तो बंद करण्याचे लक्षात ठेवा.
- टॉयलेट: कृपया टॉयलेटमध्ये टॉयलेट पेपरशिवाय इतर काहीही टाकू नका. इतर सर्व गोष्टींसाठी एक लहान कचरा पेटी आहे.
- किचनमधील वस्तू: डिशेस आणि कप्स मायक्रोवेव्हच्या दोन्ही बाजूंच्या वरच्या कॅबिनेट्समध्ये ठेवले आहेत. ओव्हनच्या डावीकडील ड्रॉवरमध्ये सिल्व्हरवेअर आहे आणि कॅबिनेटमध्ये पॅन्स आहेत. तुमचे स्वादिष्ट जेवण तयार करण्यासाठी आवश्यकतेनुसार यापैकी काहीही मोकळ्या मनाने वापरा. तुमचे काम पूर्ण झाल्यावर, तुम्ही डिशवॉशरमध्ये घाण झालेल्या डिशेस ठेवू शकता. जेव्हा तो पूर्ण भरेल, तेव्हा आम्ही मशीन सुरू करू.”
जे होस्ट्स प्रॉपर्टीवर किंवा जवळपास राहत नाहीत ते या एरियाशी संबंधित कचरा, पाणी आणि इतर तपशीलांविषयीच्या सूचनांचा देखील समावेश करण्याची शिफारस करतात:
- “कचरा: तुमचा कचरा तळघरात असलेल्या 33 गॅलनच्या कचऱ्याच्या डब्यात टाका. कृपया बाहेर किंवा पोर्चवर कचरा ठेवू नका, जेथे पक्षी, रॅकून्स आणि इतर प्राणी त्यात प्रवेश करू शकतात.” —किम, अपसन, विस्कॉन्सिन
- “पाणी आणि वीज: कृपया तुम्ही पाणी आणि वीज किती प्रमाणात वापरता याबद्दल जागरूक रहा. गरम पाण्याची सोय मर्यादित आहे.” —फ्रेड, प्लेसेंशिया, बेलीझ
उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी स्टेप-बाय-स्टेप सूचनांसह तुमचे म्हणणे समाप्त करा
सविस्तर सूचना महत्त्वाच्या आहेत, असे होस्ट्स जोह आणि जियान म्हणतात. ते त्यांच्या स्ट्रीमिंग सेवा वापरण्याचे वर्णन असे करतात:
“Netflix, Prime Video आणि इतर स्ट्रीमिंग सेवांशी कसे कनेक्ट करावे:
- बेडरूममधील टीव्ही चालू करा आणि थोडा वेळ प्रतीक्षा करा. या वेळेदरम्यान, तुम्हाला फक्त पांढरे ठिपके पडताना दिसतील.
- एका मिनिटानंतर, अनेक रंगी, हिऱ्याच्या आकाराचे बटण दाबा.
- तुम्हाला ज्या ॲपशी कनेक्ट करायचे आहे ते निवडा आणि मेन बटण दाबा. Netflix साठी, आम्ही तुमच्याकरता खास तयार केलेला गेस्ट अकाऊंट वापरण्याची विनंती करतो.”
संक्षिप्त आणि मैत्रीपूर्ण असू द्या
बरेच होस्ट तुमच्या सुविधा सूचीला लहान आणि नेमके ठेवण्याच्या महत्त्वावर जोर देतात. कॅनडातील ननाइमो येथील होस्ट टीना म्हणतात, “तुमच्या गेस्ट्सना असे वाटू नये की होस्ट्सना आनंदी ठेवण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागेल.” “तुमच्या गरजांमध्ये आणि तुमच्या गेस्ट्सना तुमच्या घरात आपलेपणा वाटण्यामध्ये योग्य संतुलन असू द्या.”
तुम्ही तुमची सुविधा सूची लिहिल्यानंतर, तुमच्या जागेत कुठेतरी वायफायवर लॉग इन कसे करावे याबद्दल स्पष्ट सूचनांसह तुम्ही लॅमिनेटेड, सुलभतेने स्वच्छ करता येण्याजोगे सूचनाचित्र ठेवण्याचा विचार करू शकता. गेस्ट्ससाठी माहिती सहजपणे अॅक्सेस करण्याचा हा आणखी एक मार्ग आहे. आणि असे केल्यास प्रत्येक वेळी उत्तम रिव्ह्यूज मिळण्यासाठी मदत होऊ शकते.
हायलाइट्स
सुविधा सूची तयार करा
ती संक्षिप्त आणि समजून घेण्यास सोपी असू द्या
आधी वायफाय पासवर्ड समाविष्ट करा
- यशस्वी लिस्टिंग सेट करण्याची पद्धत समजून घेण्यासाठी आमच्या संपूर्ण गाईड मध्ये अधिक माहिती मिळवा