गेस्ट्स जेव्हा बुकिंग कॅन्सल करतात किंवा ते बदलतात तेव्हा काय होते?
हायलाइट्स
जर एखाद्या गेस्टने बुकिंग कॅन्सल केले तर तुमचे कॅन्सलेशन धोरण लागू होते
तुम्ही एखाद्या गेस्टच्या बुकिंगमध्ये बदल मान्य केल्यास, तुम्हाला त्यांच्या नवीन चेक इन वेळेनंतर 24 तासांनी पैसे दिले जातील
तुमच्यासाठी कोणते कॅन्सलेशन धोरण उपयुक्त आहे ते निवडा
जीवन अनिश्चित आहे आणि गेस्ट्सना कधीकधी त्यांची रिझर्व्हेशन्स कॅन्सल करावी लागतात किंवा त्यामध्ये बदल करावा लागतो. तुमच्या कॅन्सलेशन धोरणावर आणि गेस्ट्सनी किती आधी कॅन्सल केले यावर अवलंबून, गेस्टने कॅन्सल केले तरीही—ज्याला आम्ही पेआऊट म्हणतो—ते पेमेंट तुम्हाला मिळू शकते.
तुमच्या गेस्ट्सनी त्यांचे बुकिंग कॅन्सल केले किंवा बदलले किंवा त्यांनी आंशिक रिफंडची विनंती केली तर नेमके काय अपेक्षित आहे ते येथे दिले आहे.
जेव्हा एखादा गेस्ट त्याचे रिझर्व्हेशन कॅन्सल करतो तेव्हा
जर एखाद्या गेस्टने त्यांचे बुकिंग कॅन्सल केले तर तुमचे कॅन्सलेशन धोरण लागू होते. तुम्हाला पेआऊट देणे बाकी असल्यास, तुमच्या गेस्टच्या शेड्युल केलेल्या चेक इन वेळेनंतर सहसा 24 तासांनी हे पैसे तुम्हाला पाठवले जातील.
उदाहरणार्थ, तुमचे ठाम कॅन्सलेशन धोरण असेल आणि तुमच्या गेस्टने चेक इनच्या सात दिवसांपेक्षा कमी दिवस आधी कॅन्सल केल्यास, तुम्हाला सर्व रात्रींसाठी तुमच्या प्रति रात्र भाड्याच्या 100% रक्कम मिळेल, यामधून कुठले कर आणि शुल्कअसल्यास वजा केले जाईल. तुमच्या गेस्टच्या शेड्युल केलेल्या चेक इन वेळेनंतर 24 तासांनी आम्ही हे पाठवू. तुमच्या गेस्टने चेक इन न केल्यास तुम्हाला साफसफाई, पाळीव प्राणी किंवा अतिरिक्त गेस्ट शुल्क मिळणार नाही.
तुम्ही तुमच्या कोणत्याही पेआऊट्स किंवा ॲडजस्टमेंट्सचा रेकॉर्डतुमच्या व्यवहारांच्या इतिहासामध्ये कधीही पाहू शकाल.
जेव्हा एखादा गेस्ट त्याचे रिझर्व्हेशन बदलतो तेव्हा
एखाद्या गेस्टने त्यांच्या बुकिंगमध्ये बदल केल्यास, आम्ही त्यांच्या नवीन चेक इन वेळेनंतर सहसा 24 तासांनी पेमेंट पाठवू. जर तुम्ही दीर्घकालीन वास्तव्ये होस्ट करत असाल तर, तुम्हाला या रिझर्व्हेशन्ससाठी मासिक पेआऊट मिळेल.
उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या बदलण्याच्या विनंतीला मान्यता दिली ज्यामध्ये गेस्ट जूनमध्ये 10 दिवसांसाठी येणार होते परंतु आता ते ऑगस्टमध्ये 10 दिवसांसाठी येतील, तसेच जर त्यांनी हा बदल इतका पूर्वी केला असेल की तुमचे कॅन्सलेशन धोरण लागू होत नाही, तर आम्ही तुमच्या गेस्टच्या नवीन चेक इन वेळेनंतर 24 तासांनी तुमचे पेआऊट पाठवू.
एखादा गेस्टने तुमच्या जागेत असताना त्यांचे रिझर्व्हेशन बदलल्यास, तुमच्या भविष्यातील पेआऊट्सवर परिणाम होऊ शकतो.
उदाहरणार्थ, जर एखाद्या गेस्टने 20 दिवसांच्या रिझर्व्हेशनसाठी तुमच्या जागेत चेक इन केले तर, आम्ही तुमचे पेआऊट त्यांच्या चेक इन वेळेनंतर 24 तासांनी पाठवू. परंतु जर त्यांना 10 व्या दिवशी कॅन्सल करावे लागले आणि निघावे लागले आणि तुमचे सोयीस्कर कॅन्सलेशन धोरण असेल, तर तुम्ही त्यांच्या वास्तव्याच्या प्रत्येक रात्रीचे तसेच एका अतिरिक्त रात्रीचे पेमेंट मिळवू शकता.
या केसमध्ये, तुम्हाला आधीच तुमचे पूर्ण पेआऊट मिळाले असल्याने, आंशिक रिफंडचा खर्च कव्हर करण्यासाठी तुमचे भविष्यातील पेआऊट्स ॲडजस्ट केले जातील.जेव्हा एखादा गेस्ट रिफंडची विनंती करतो तेव्हा
जर एखाद्या गेस्टने सुविधेच्या अपेक्षेने तुमच्या जागेवर चेक इन केले, परंतु ते गहाळ किंवा तुटलेले असल्यास, ते आंशिक रिफंड मागू शकतात. उदाहरणार्थ, जर तुमचा हॉट टब अचानक तुटला असेल आणि तो तुमच्या व्हिलाचे मुख्य वैशिष्ट्य असेल, तर तुमचे गेस्ट आंशिक रिफंडची विनंती करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधू शकतात.
या उदाहरणासाठी देखील, जर तुम्ही आंशिक रिफंडला सहमती दिली, तर तुम्हाला आधीच तुमचे पूर्ण पेआऊट मिळाले असल्याने, आंशिक रिफंडचा खर्च कव्हर करण्यासाठी तुमचे भविष्यातील पेआऊट्स ॲडजस्ट केले जातील. तुम्ही निराकरण केंद्राद्वारे देखील गेस्ट्सना परतावा देऊ शकता. तुम्ही असे पेमेंट पाठवल्यास, तुमच्या भविष्यातील पेआऊट्सवर परिणाम होणार नाही.कॅन्सलेशन्सपासून स्वतःला वाचवणे
अर्थात, एखाद्या गेस्टला त्यांचे रिझर्व्हेशन कॅन्सल करावे लागेल की बदलावे लागेल यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. परंतु आमच्या गेस्ट कॅन्सलेशन धोरणांबद्दल अधिक वाचून आणि तुमच्यासाठी योग्य धोरणाची निवड करून तुम्ही तुमच्या सेटिंग्जबद्दल निश्चिंत राहू शकता.
नियमित देखभाल करणे आणि महत्त्वाच्या क्षणी गेस्ट्सशी संवाद साधणे देखील चांगले असते, त्यामुळे तुम्हाला खात्री होते की तुमची जागा गेस्ट्सच्या स्वागतासाठी तयार असेल—आणि काही गडबड झाल्यास तुम्ही मदत करू शकाल.
या लेखात दिलेली माहिती लेख पब्लिश झाल्यानंतर कदाचित बदललेली असू शकते.
हायलाइट्स
जर एखाद्या गेस्टने बुकिंग कॅन्सल केले तर तुमचे कॅन्सलेशन धोरण लागू होते
तुम्ही एखाद्या गेस्टच्या बुकिंगमध्ये बदल मान्य केल्यास, तुम्हाला त्यांच्या नवीन चेक इन वेळेनंतर 24 तासांनी पैसे दिले जातील
तुमच्यासाठी कोणते कॅन्सलेशन धोरण उपयुक्त आहे ते निवडा