दीर्घकाळ वास्तव्यासाठी भाडे सेट करणे

सर्च रँकिंग्ज आणि बुकिंग्स वाढवण्यात साप्ताहिक आणि मासिक सवलती मदत करू शकतात.
Airbnb यांच्याद्वारे 11 मे, 2021 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
17 मे, 2023 रोजी अपडेट केले

Airbnb वर बुक झालेल्या पाच रात्रींपैकी सुमारे एक रात्र, 28 रात्री किंवा त्याहून अधिक कालावधीच्या वास्तव्याचा भाग आहे.* साप्ताहिक आणि मासिक वास्तव्यांच्या होस्टिंगचे बरेच फायदे आहेत जसे की:

  • कमी टर्नओव्हरसहउच्च ऑक्युपन्सी दर

  • कमी गेस्ट मेसेजेस आणि ते मॅनेज करण्याची आवश्यकसुद्धा कमी

  • अल्पकाळ वास्तव्यांपेक्षा स्थिर उत्पन्न

दीर्घकालीन वास्तव्यांमध्ये स्वारस्य असणारे गेस्ट्स सवलती असलेल्या जागा शोधतात. होस्ट्स सात किंवा त्याहून अधिक रात्रींच्या बुकिंग्जसाठी, साप्ताहिक सवलत किंवा 28 किंवा त्याहून अधिक रात्रींच्या बुकिंगसाठी मासिक सवलत जोडू शकतात.

या सवलती जोडल्याने सर्च रिझल्ट्समध्ये तुमच्या लिस्टिंगची रँकिंग सुधारण्यात मदत होऊ शकते, जिथे तुमच्या मूळ भाड्यापुढे तुमची साप्ताहिक किंवा मासिक सवलत हायलाईट केली जाते.

स्थानिक मागणी आणि तुमच्या खर्चाचा विचार करणे

सवलत सेट करण्यापूर्वी, तुम्ही स्थानिक मागणी तपासू शकता.तुम्ही हंगामी गर्दी आकर्षित करणार्‍या जागेत होस्टिंग करत असल्यास, काही महिन्यांसाठी तुमचे भाडे बदलणे तुमच्या भाड्याच्या धोरणाला अधिक चांगले सपोर्ट करू शकेल का याचा विचार करा.

तुम्ही यासारख्या नियमित खर्चाचा देखील विचार करू शकता:

  • मॉर्गेज किंवा भाड्याने. ही रक्कम तुमची साप्ताहिक किंवा मासिक सवलत सेट करण्यासाठी एक सुरुवातीचे स्थान प्रदान करू शकते.

  • घरगुती खर्च. तुम्ही युटिलिटीज (पाणी, गॅस, वीज), नियमितपणे शेड्युल केलेल्या सेवा जसे की साफसफाई आणि बागकाम, आणि तुम्ही गेस्ट्सना (अतिरिक्त साबण, मूलभूत स्वयंपाकासाठीचा पुरवठा इ.) पुरवण्यासाठी निवडलेल्या गोष्टींसाठी जे पैसे देता, ते तुमच्या भाड्यामधे जोडले जाऊ शकतात.

  • देखभाल.नूतनीकरणापासून ते दुरुस्तीपर्यंत, गेस्ट्सना तुमची जागा अधिक आरामदायक बनवण्यासाठी तुम्ही त्यात जी गुंतवणूक करता, ती तुमचे भाडे ठरवण्याचा एक घटक बनू शकते.

न्यूयॉर्क सिटीमधील होस्ट ऑलिव्हर म्हणतात,“गेस्ट्सनी तुमचे प्रति रात्र भाडे देऊन तुम्ही एका महिन्यात जे कमावता, त्याची बेरीज करण्याची कल्पना चांगली आहे.” “मग तुम्ही त्या एकूण रकमेशी जुळण्यासाठी तुमची मासिक सवलत ॲडजस्ट करू शकता, जे तुम्हाला भरवशाचे उत्पन्न मिळवण्यास मदत करते.”

साप्ताहिक किंवा मासिक सवलत सेट करणे

तुम्ही तुमच्या कॅलेंडरमधील प्राईसिंग टूल्स वापरून सवलती जोडू शकता. वरच्या उजव्या बाजूला असलेले सेटिंग्ज आयकॉन निवडा. भाड्याच्या टॅबमध्ये, सवलतींवर स्क्रोल करा आणि साप्ताहिक किंवा मासिक निवडा.

तुम्हाला तुमच्या लिस्टिंगवर आणि तुमच्या भागातील तशाच प्रकारच्या लिस्टिंग्जच्या मागणीवर आधारित सुचवलेली सवलत मिळेल. सवलत ॲडजस्ट करण्यासाठी स्लाइडर 0 आणि 99% दरम्यान हलवा आणि तुमचे सरासरी साप्ताहिक किंवा मासिक भाडे कसे बदलते ते ट्रॅक करा. टक्केवारी चिन्हाच्या पुढेही तुम्ही मॅन्युअली संख्या एन्टर करू शकता. तुम्ही पूर्ण झाल्यावर, तुम्हाला हवी असलेली सवलत सेट करण्यासाठी सेव्ह करा वर टॅप करा किंवा क्लिक करा.

सवलतीचा तुमच्या कमाईवर कसा परिणाम होतो हे तपासण्यासाठी, तुमच्या साप्ताहिक किंवा मासिक भाड्याखालील "गेस्ट भाडे" हे शब्द निवडा. तुम्हाला प्रति रात्र भाडे, शुल्क, कोणत्याही सवलती किंवा प्रमोशन्स, कर आणि तुमच्या कमाईची लिस्ट असलेली भाड्याची विभागणी मिळेल.

तुम्ही त्यांच्या आगमनाच्या तारखांच्या खूप आधी किंवा जवळपास बुक करणाऱ्या गेस्ट्सना सवलती देखील देऊ शकता. भाडे टॅबमधील “अधिक सवलती” असे लेबल असलेल्या विभागात जा. शेवटच्या मिनिटाच्या प्रवाशांसाठी अर्ली बर्ड्ससाठी किंवा दिवसांची संख्या आणि तुम्ही त्या बुकिंग्जवर किती टक्के सवलत देऊ इच्छिता ते जोडा.

*Airbnb च्या अंतर्गत ग्लोबल डेटाच्या आधारे, 2022 मध्ये बुक झालेल्या रात्रींपैकी 21% बुकिंग हे 28 किंवा त्याहून अधिक रात्रींच्या वास्तव्यांसाठी होते आणि 2023 च्या पहिल्या तीन महिन्यांत ते 18% होते.

या लेखात दिलेल्या माहितीमध्ये पब्लिकेशननंतर कदाचित बदल झालेला असू शकेल.

Airbnb
11 मे, 2021
हे उपयुक्त ठरले का?