सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
हा कंटेंट तुम्ही निवडलेल्या भाषेत उपलब्ध नाही, म्हणून आम्ही सध्या तो सर्वात जवळच्या उपलब्ध भाषेत उपलब्ध करून दिला आहे.

Airbnb वर रूम म्हणजे काय?

रूम म्हणून काय पात्र ठरते आणि सुरुवात कशी करावी हे जाणून घ्या.
Airbnb यांच्याद्वारे 10 ऑग, 2023 रोजी
10 ऑग, 2023 रोजी अपडेट केले
Airbnb वर रूम म्हणजे काय?
गेस्ट्सचे स्वागत करण्याची तयारी करा
Airbnb वर रूम म्हणजे काय?

तुमची अतिरिक्त जागा पैसे कमावण्याचा आणि लोकांना भेटण्याचा एक मार्ग असू शकते. तुमच्याकडे अतिरिक्त बेडरूम असल्यास, तुम्ही एक लिस्टिंग सेट करू शकता आणि तुमच्या घरात गेस्ट्सचे स्वागत करू शकता. 

“केवळ आर्थिकदृष्ट्या नाही तर अनेक प्रकारे हे खूप फायद्याचे आहे,” असे लॉस एंजेलिसमधील एक सुपरहोस्ट, एरिक म्हणतात. “गेस्ट्स ॲडव्हेंचरसाठी कॅलिफोर्नियाला येतात, परंतु हे आमच्यासाठी देखील ते एक मस्त ॲडव्हेंचर असते, कारण दरवाजाच्या पलीकडे कोण असेल हे आम्हालाच माहीत नसते. आम्हाला जगातील वेगवेगळ्या जागांविषयी खूप माहिती मिळते”.

रूम्स जगभर लोकप्रिय आहेत आणि Airbnb वरच्या राहण्याच्या सर्व प्रकारच्या जागांमध्ये यांचा क्रमांक तिसरा आहे.* गेस्ट्स सर्च फिल्टरवर 'रूम' निवडून रूम्स शोधू आणि बुक करू शकतात.

रूमचे होस्टिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला काय माहीत असणे आवश्यक आहे ते इथे सांगितले आहे.

रूम म्हणून काय पात्र असते?

रूम या कॅटेगरीमध्ये, गेस्टना होस्टच्या घरात स्वतःची खाजगी बेडरूम मिळते, तसेच ते इतरांसह शेअर करू शकतील अशा कॉमन जागेचा ॲक्सेस मिळतो.

पुढील सर्व निकष पूर्ण करणारी लिस्टिंगच, रूम म्हणून पात्र ठरेल:

  • गेस्टकडे स्वतःची, दरवाजा असलेली एक स्वतंत्र खाजगी बेडरूम आहे.

  • गेस्टना खाजगी किंवा शेअर करता येणार्‍या बाथरूमचा ॲक्सेस आहे.

  • गेस्टना किमान एका कॉमन जागेचा ॲक्सेस आहे, जसे की किचन, लिव्हिंग रूम किंवा बॅकयार्ड.

  • होस्ट त्यांच्या लिस्टिंगवर, एखाद्या बिझनेसचे किंवा इतर कुठले नाव न वापरता, स्वतःचे नाव वापरावे लागेल. 

  • होस्टच्या लिस्टिंगच्या सेटिंग्जमध्ये लिस्टिंगचा किंवा रूमचा प्रकार म्हणून “रूम” निवडली जाते.

  • खाजगी रूम ही शेअर केलेली रूम, हॉटेल, रिसॉर्ट, टेंट, कॅम्पर, स्टँडअलोन युनिट (जसे की बॅकयार्ड बंगला) किंवा या लिस्टमधील इतर कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी नसते.

तुमची लिस्टिंग या निकषांची पूर्तता करत नसल्यास, तुमची लिस्टिंग सेट अप करताना जागेचा दुसरा प्रकार निवडा.

रूम का होस्ट करावी?

अतिरिक्त रूम्स धूळ खात पडण्यासाठी किंवा जादा सामान ठेवण्यासाठी नसतात, त्यांचा याहून चांगला उपयोग करता येतो. ती जागा लिस्ट करण्याचे काही फायदे हे आहेत:

  • पैसे कमावणे. 2022 मध्ये, जगभरातल्या रूम्सच्या होस्ट्सनी $2.9 अब्ज USD पेक्षा जास्त कमाई केली आणि 2021 च्या तुलनेत त्यांची सरासरी कमाई 20% पेक्षा जास्त होती.**

  • लोकांशी कनेक्ट करणे. तुमचे घर, तुमच्या आवडीनिवडी, तुमची संस्कृती आणि स्थानिक माहिती शेअर केल्याने प्रवाशांशी अर्थपूर्ण संवाद साधता येतो.

  • तुमच्याकडे असलेल्या जागेचा वापर करणे. संपूर्ण घराच्या होस्टिंगसाठी होणारा स्टार्ट-अप खर्च वाचवून, तुम्ही कमी खर्चात तुमच्या अतिरिक्त रूममध्ये पेईंग गेस्ट्सना होस्ट करून त्यांना झोपण्यासाठी एक आरामदायी जागा देऊ शकता.

“माझे घर मोठे आहे आणि मी एकटी राहते, आणि होस्टिंगसाठी माझ्या घराचे लोकेशन आणि माझी परिस्थिती अगदी योग्य आहे,” असे पर्थ, ऑस्ट्रेलिया येथील होस्ट रूथ म्हणतात. “बेड्स खरेदी करणं, रूम्स पुन्हा सजवणं, फर्निचर हलवणं या किंवा यासारख्या इतर गोष्टींवर मला फार खर्च करावा लागला नाही.”

*मे 2022 ते मार्च 2023 दरम्यान गोळा केलेल्या Airbnb ग्लोबल डेटावर आधारित

**जागतिक स्तरावर रूम कॅटेगरीच्या सर्व होस्ट्सची सरासरी कमाई

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb वर रूम म्हणजे काय?
गेस्ट्सचे स्वागत करण्याची तयारी करा
Airbnb वर रूम म्हणजे काय?
Airbnb
10 ऑग, 2023
हे उपयुक्त ठरले का?