Airbnb गेस्ट्ससाठी असलेला प्रवास विमा समजून घेणे
आपत्कालीन परिस्थिती आणि ट्रिपमध्ये अनपेक्षित व्यत्यय येतात. अशात गेस्ट्सची रिफंडची विनंती नाकारणे कठीण वाटू शकते. होस्ट म्हणून, तुम्हाला सहानुभूती दाखवायची आहे पण उपजीविकासुद्धा चालवायची आहे आणि खराब रिव्ह्यूजसुद्धा टाळायचे आहेत.
गेस्ट्स आणि होस्ट्सना अधिक चांगल्या प्रकारे सपोर्ट करण्यासाठी, आम्ही गेस्ट्ससाठी प्रवास विमा सादर करण्याकरता Aon आणि Europ Assistance Group आणि त्यांची अमेरिकेतील उपकंपनी, Generali Global Assistance यांच्याशी भागीदारी केली आहे. आम्ही गेस्ट्ससाठी 10 देशांमध्ये बुकिंग प्रक्रियेदरम्यानच्या विशिष्ट जोखमींकरता त्यांच्या Airbnb रिझर्व्हेशन्सचा विमा उतरवण्याचा पर्याय देत आहोत.
पॉलिसी खरेदी करणारे गेस्ट्स एखाद्या कव्हर केलेल्या कारणामुळे त्यांचे बुकिंग रद्द करतात, तेव्हा ते त्यांच्या रिफंड न केलेल्या Airbnb बुकिंग खर्चाच्या 100% पर्यंत भरपाई मिळवण्याचा क्लेम फाईल करू शकतील. यामुळे गेस्ट्सनी त्यांच्या होस्ट्सच्या कॅन्सलेशन धोरणांच्या अटींच्या बाहेर रिफंड मागण्याची शक्यता कमी हो शकते.
प्रवास विमा कसा काम करतो
अमेरिका,* यूके** आणि युरोप*** (फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, आयर्लंड, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया आणि पोर्तुगाल) मधील गेस्ट्स Airbnb वर ट्रिप बुक करताना प्रवास विमा खरेदी करू शकतात. आम्ही भविष्यात इतर देशांमध्ये गेस्ट्ससाठी प्रवास विमा उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहोत.
आम्ही प्रवास विमा खरेदी करण्याचा पर्याय बुकिंग प्रक्रियेमध्ये सामील करून घेतला आहे. ही प्रक्रिया लोकेशननुसार किंचित बदलते. हे कसे काम करते ते येथे दिले आहे:
- बुकिंगच्या दरम्यान, गेस्ट्सना प्रवास विमा जोडण्याचा पर्याय दिला जातो.
- पॉलिसीमध्ये काय समाविष्ट आहे आणि मुख्य अपवाद याबद्दलचे तपशील खास त्यासाठी असलेल्या स्क्रीन्सवर दिले जातात.
- गेस्ट्सना इच्छा झाल्यास, ते त्यांच्या बुकिंगमध्ये प्रवास विमा सहजपणे जोडतात आणि चेक आऊट करतात.
गेस्टचा प्रवास विमा प्रीमियम हा त्यांच्या एकूण ट्रिप खर्चाच्या काही टक्के असतो आणि तो चेकआऊटच्या वेळी लान आयटम म्हणून दाखवला जातो.
गेस्टच्या लोकेशनवर अवलंबून, पॉलिसीज Generali Group या अग्रगण्य बहुराष्ट्रीय विमा कंपनीच्या उपकंपन्या Europ Assistance S.A. किंवा Generali US Branch शाखेद्वारे जारी केल्या जातात. गेस्ट्सनी त्यांचे रिझर्व्हेशन पूर्ण केल्यानंतर, प्रवास विमा जोडलेल्या गेस्ट्सना त्यांच्या पॉलिसीचे तपशील आणि क्लेम कसा दाखल करावा याबद्दलच्या माहितीसह ईमेल कन्फर्मेशन मिळेल.
"कठोर कॅन्सलेशन धोरण असलेल्या माझ्यासारख्या होस्टसाठी गेस्ट्सना आता प्रवास विमा विकत घ्यायचा पर्याय उपलब्ध आहे ही फारच आनंदाची बातमी आहे,” शिकागोमधील सुपरहोस्ट अलेक्झांड्रा सांगतात.
प्रवास विम्यात काय-काय कव्हर होते
गेस्ट्ससाठी AirCover त्यांना लिस्टिंगमधील चुकीचे तपशील आणि महत्त्वाच्या सुविधा नसणे अशा अनपेक्षित समस्यांसाठी संरक्षण देते.
खराब हवामान, चोरी झालेली प्रवासाची कागदपत्रे किंवा गंभीर आजार यासारख्या विशिष्ट घटनांमुळे त्यांच्या ट्रिपवर परिणाम झाल्यास प्रवास विमा गेस्ट्सच्या रिफंड न केलेल्या Airbnb रिझर्व्हेशन खर्चाच्या 100% पर्यंत पेमेंट्ससह विमा कव्हरेज देतो.
उदाहरणार्थ, होस्टने त्यांच्या कॅन्सलेशन धोरणाच्या आधारे Airbnb रिझर्व्हेशन खर्चाच्या 50% रिफंड दिला तर, गेस्टने कव्हर केलेल्या कारणामुळे कॅन्सल केले असल्यास प्रवास विमा उर्वरित 50% पर्यंत रिफंड देऊ शकतो. गेस्टने प्रवास विम्याचा क्लेम फाईल केल्यास विमा प्रदाता होस्टकडून कोणरीही रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करणार नाही.
आम्ही नुकतेच गेस्ट्ससाठी AirCover सादर केले आहे ज्यामुळे त्यांना लिस्टिंगमधील चुकीचे तपशील आणि महत्त्वाच्या सुविधा नसणे अशा अनपेक्षित समस्यांसाठी संरक्षण मिळते.
खराब हवामान, चोरी झालेली प्रवासाची कागदपत्रे किंवा गंभीर आजार यासारख्या विशिष्ट घटनांमुळे त्यांच्या ट्रिपवर परिणाम झाल्यास प्रवास विमा गेस्ट्सच्या रिफंड न केलेल्या Airbnb रिझर्व्हेशन खर्चाच्या 100% पर्यंत पेमेंट्ससह विमा कव्हरेज देतो.
उदाहरणार्थ, होस्टने त्यांच्या कॅन्सलेशन धोरणाच्या आधारे Airbnb रिझर्व्हेशन खर्चाच्या 50% रिफंड दिला तर, गेस्टने कव्हर केलेल्या कारणामुळे कॅन्सल केले असल्यास प्रवास विमा उर्वरित 50% पर्यंत रिफंड देऊ शकतो. गेस्टने प्रवास विम्याचा क्लेम फाईल केल्यास विमा प्रदाता होस्टकडून कोणरीही रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करणार नाही.
31 मे 2022 रोजी किंवा त्यानंतर केलेल्या बुकिंग्जसाठी, कोविड-19 असणे हे यापुढे आपत्कालीन परिस्थिती मानले जाणार नाही. (दक्षिण कोरियातील देशांतर्गत रिझर्व्हेशन्स आणि Luxe रिझर्व्हेशन्ससाठी वेगळी धोरणे लागू होतात.) एखाद्या गेस्टने कोविड-19 ने आजारी असल्यामुळे त्यांचे बुकिंग कॅन्सल केल्यास, होस्टचे कॅन्सलेशन धोरण लागू होईल.
प्रवास विमा खरेदी करणारे गेस्ट्स (परवानाधारक डॉक्टरांनी निदान केल्यानुसार) कोविड-19 ने आजारी पडल्यास आणि पॉलिसीच्या इतर अटी पूर्ण होत असल्यास त्यांना संरक्षण दिले जाऊ शकते.