Airbnb वर आत्ता टॉप ट्रेंडिंग ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स
Airbnb ला यावर्षी जगभरातून 300 दशलक्षांहून अधिक चेक इनची अपेक्षा आहे. पण वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत गेस्ट्सनी शोधलेले जून, जुलै आणि ऑगस्टमधील ट्रेंडिंग बुकिंग्स तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. ट्रेंडिंग डेस्टिनेशन्स त्या जागांवर आधारित आहेत जिथे मागील वर्षाच्या तुलनेत सर्चेसमध्ये सर्वात जास्त वाढ झाली होती.
जगभरातील सगळ्यात जास्त ट्रेंडिंग असलेली गंतव्ये
चार खंडांमध्ये पसरलेली, ट्रेंडिंग आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन्स खालीलप्रमाणे आहेतः
कुटा उतारा, बाली
समील, अल्बेनिया
बार्सिलोना, स्पेन
लंडन, इंग्लंड
गोटलँड, स्वीडन
लुईव्हिल, केंटकी, यूएस
रोम, इटली
रुवान, फ्रान्स
मारकेश, मोरोक्को
ग्रींडलवाल्ड, स्वित्झर्लंड
U.S. प्रवाश्यांसाठी सर्वोच्च देशांतर्गत गंतव्ये
अमेरिकन प्रवासी सूर्य आणि समुद्रकिनाऱ्यांच्या शोधात आहेत असे दिसते-तरी काही लँडलॉक असलेल्या राज्यांनीही यात वाटा उचलला. ही होती अमेरिकेची ट्रेंडिंग डेस्टिनेशन्स:
लुईविल, केंटकी
लॅकोनिया, न्यू हॅम्पशायर
लेक्सिंग्टन, केंटकी
पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया
पनामा सिटी, फ्लोरिडा
मिलवॉकी, विस्कॉन्सिन
सर्फ सिटी, न्यू जर्सी
बोलिव्हार द्वीपकल्प, टेक्सास
कॅन्सस सिटी, मिसुरी
नॉर्थ टॉपसेल बीच, नॉर्थ कॅरोलिना
U.S. प्रवाश्यांसाठी सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गंतव्ये
अमेरिकन पर्यटकही परदेशात जाण्यास उत्सुक आहेत. हे होते ट्रेंडिंग सर्च ऑप्शन्स:
मिकनोस, ग्रीस
नायगारा फॉल्स, कॅनडा
इंटरलेकन, स्वित्झर्लंड
अमाल्फी, इटली
फ्लॉरेन्स, इटली
बँकॉक, थायलंड
सोरेंतो, इटली
टोराँटो, कॅनडा
रिओ डी जानेरो, ब्राझील
बॅन्फ, कॅनडा
सगळ्यात जास्त ट्रेंडिंग असलेली Airbnb रूम्स गंतव्ये
1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत खासगी खोल्यांच्या बुकिंगमध्ये मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत सर्वाधिक वाढ झालेली पाच डेस्टिनेशन्स होती:
मॅपो - गू, सोल, कोरिया
मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
वॉर्सा, पोलंड
सिडनी, ऑस्ट्रेलिया
फ्लॉरेन्स, इटली
जर तुम्ही यापैकी कोणत्याही डेस्टिनेशनवर होस्ट असाल तर व्यस्त हंगामासाठी तयार होण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता. आणि जर तुम्ही नसाल, तर तुमची लिस्टिंग अपडेट करण्यासाठी तुम्हाला या डेटातून प्रेरणा मिळू शकते.
उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे पूल असेल, तर त्याचा उत्तम शॉट घेऊन तुमचा कव्हर फोटो अपडेट करण्याचा विचार करा. जर तुम्ही थक्क करणाऱ्या हायकिंग ट्रेल्सच्या जवळ असाल, तर ते तुमच्या लिस्टिंगच्या शीर्षकात किंवा वर्णनात जोडा.
मे 2022 ते मार्च 2023 दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक बुक केलेल्या Airbnb कॅटेगरीजमध्ये बीच, आश्चर्यकारक पूल, ट्रेंडिंग, आयकॉनिक शहरे आणि राष्ट्रीय उद्याने होती - त्यामुळे गेस्ट्स सूर्यप्रकाश, प्रेक्षणीय स्थळे आणि हाईक्सला प्राधान्य देत आहेत. जरी तुमची जागा यापैकी एखाद्या लिस्टमध्ये नसली तरीही, तुम्ही या ट्रेंड्सना फॉलो करणाऱ्या तुमच्या लिस्टिंगच्या कोणत्याही पैलूंना हायलाइट करण्यासाठी ही माहिती वापरू शकता.
तुम्ही जगात कुठेही असाल, तुम्ही अशा कम्युनिटीचा भाग आहात जी गेस्ट्ससाठी एक विशेष अनुभव देते. आणि हे केवळ Airbnb वरच घडू शकते. 19,000 हून अधिक गेस्ट्स आणि होस्ट्सच्या अलीकडील जागतिक सर्वेक्षणात, 60 टक्क्यांहून अधिक लोकांनी असे म्हटले आहे की Airbnb च्या माध्यमातून प्रवास केल्याने हॉटेल किंवा रिसॉर्टमधील वास्तव्यापेक्षा स्थानिक संस्कृतीशी जवळचा संबंध जोडला गेला आहे असे त्यांना वाटते.
पब्लिकेशननंतर या लेखात असलेल्या माहितीमध्ये कदाचित बदल झालेला असू शकेल.