सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

गेस्ट्सचे वास्तव्य अधिक पर्यावरणपूरक बनवण्यासाठी सल्ले

कचरा कमी करणे आणि तुमच्या सुविधा अपडेट करणे गेस्ट्स आणि पृथ्वीसाठीही फायदेशीर ठरू शकते.
Airbnb यांच्याद्वारे 5 डिसें, 2025 रोजी

तुमच्या घरात इको-फ्रेंडली सामग्री आणि सुविधा ठेवल्याने तुमचा कार्बन फूटप्रिंट कमी होऊ शकतो आणि तुमची लिस्टिंग नजरेत भरण्यास मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, वास्तव्याच्या जागा शोधत असलेले गेस्ट्स त्यांचे रिझल्ट्स इलेक्ट्रिक वाहन चार्जर्ससाठी फिल्टर करू शकतात, जे आता Airbnb वरील टॉप 25 सुविधांमध्ये स्थान मिळवते.*

प्रत्येक होस्ट EV चार्जर इन्स्टॉल करू शकत नाही, परंतु अधिक पर्यावरणपूरक पध्दतीने होस्ट करण्याचे इतरही मार्ग आहेत. “रिफिलेबल्स वापरणे, रिसायकल करणे किंवा ऊर्जा वाचवणे यासारख्या छोट्या कृतींमुळे मोठा फरक पडतो,” असे मनिला, फिलिपिन्समधील सुपरहोस्ट पॅट्रिशिया म्हणतात.

घरगुती वस्तू

साधे बदल कचरा कमी करू शकतात. हे सल्ले वापरून पहा:

  • रिफिल करण्यायोग्य कंटेनर्स वापरा. प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेल्या उत्पादनांचा वापर कमी करण्यासाठी शॅम्पू, कंडिशनर, बॉडी वॉश आणि साबणाच्या एकदाच वापरता येईल अशा कंटेनर्सच्या जागी रिफिल करण्यायोग्य कंटेनर्स वापरा. लाँगमॉन्ट, कोलोरॅडोमधील सुपरहोस्ट अनिका यांनी सिंगल यूज प्लॅस्टिक्स काढून टाकले आणि त्या म्हणतात की “गेस्ट्स खूप खुश झाले.”
  • इको-फ्रेंडली कागदी उत्पादनांचा साठा ठेवा. टॉवेल्स आणि टिश्यूजसारख्या वस्तूंसाठी 100% रिसायकल केलेले किंवा वनस्पती-आधारित पर्याय निवडा. क्रिस्टिना, नेपरविल, इलिनॉयमधील सुपरहोस्ट, बांबू टॉयलेट पेपर स्टॉक करतात.
  • तीव्र रसायने कमी करा. बिन-विषारी, नैसर्गिक किंवा बायोडिग्रेडेबल असलेले भांडी धुण्याचे साबण, लॉन्ड्री डिटर्जंट आणि स्वच्छता साहित्य खरेदी करा.
  • गेस्ट्ससाठी रिसायकलिंग सोपे करा. कचऱ्याचे नियम बदलतात, म्हणून तुमचे स्थानिक नियम स्पष्ट करा. बेलिंगहॅम, वॉशिंग्टनमधील सुपरहोस्ट सिंथिया त्यांच्या घराभोवती आणि कारपोर्टमधील त्यांच्या कलेक्शन बिन्सच्या वर लॅमिनेटेड रिसायकलिंग गाईडलाईन्स पोस्ट करतात.

गेस्ट सुविधा

तुम्ही तुमच्या लिस्टिंग्ज टॅबमध्ये EV चार्जरसारख्या सुविधा जोडू शकता आणि तुम्ही काय ऑफर करता हे हायलाईट करण्यासाठी तुमचे वर्णन आणि फोटो कॅप्शन अपडेट करू शकता. तुमच्या गेस्ट्सना अधिक शाश्वत पद्धतीने प्रवास करण्यात मदत करण्यासाठी येथे काही मार्ग दिले आहेत:

  • EV प्लग-इन इन्स्टॉल करा. 2024 मध्ये जगभरात इलेक्ट्रिक कारची विक्री 1.7 कोटींवर पोहोचली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 25% ने वाढली आहे.** लेक प्लॅसिड, न्यूयॉर्कमधील सुपरहोस्ट ग्रेस्टोन यांनी 2020 मध्ये त्यांच्या गॅरेजमध्ये EV चार्जर जोडला. “या निकषांच्या आधारे आमची लिस्टिंग कोण निवडू शकेल हे आम्हाला माहीत नाही,” ते म्हणतात, “परंतु काळाच्या ओघात आमच्या प्रॉपर्टीवर येणाऱ्या EV मध्ये वाढ होत असल्याचे आमच्या नक्कीच लक्षात आले.”
  • सायकली भाड्याने द्या. गेस्ट्सना ते भाड्याने घेऊ शकतील अशा सायकली आणि हेल्मेट्स देऊन किंवा स्थानिक रेंटल शॉपची शिफारस करून गेस्ट्सना गाडी कमी चालवण्यास प्रोत्साहित करा.
  • पुन्हा वापरण्यायोग्य पाण्याच्या बाटल्या पुरवा. तुमच्या घराचे नळाचे पाणी पिण्यास सुरक्षित असल्यास, गेस्ट्सना कळवण्यासाठी एक चिन्ह किंवा मेसेज पोस्ट करा. “पाण्याच्या बाटल्या यासारखे पुन्हा वापरता येणारे पर्याय देऊन सिंगल यूज प्लॅस्टिक्सचा वापर कमी करा,” सॅन डिएगो, कॅलिफोर्नियामधील सुपरहोस्ट रॉबर्ट म्हणतात.
  • तुमचे सल्ले शेअर करा. तुमच्या सुविधा सूची किंवा गाईडबुकमध्ये ऊर्जा बचतीचे सल्ले, पाणी वाचवण्याचे रिमाइंडर्स आणि परिसरातील इको-फ्रेंडली ॲक्टिव्हिटीज समाविष्ट करण्याचा विचार करा. “गेस्ट्सना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करा,” रॉबर्ट म्हणतात.

*1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत जगभरातील गेस्ट्सनी सर्वाधिक सर्च केलेल्या सुविधांचे मोजमाप करणाऱ्या Airbnb च्या अंतर्गत डेटानुसार.

**इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या ग्लोबल EV आउटलुक 2025 रिपोर्टच्या आधारे

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
5 डिसें, 2025
हे उपयुक्त ठरले का?