टिकाऊ होस्टिंगसाठी नवशिक्या मार्गदर्शक

हे सल्ले तुम्हाला तुमच्या लिस्टिंगमुळे निर्माण होणारा पर्यावरणीय र्‍हास कमी करण्यात मदत करू शकतात.
Airbnb यांच्याद्वारे 21 एप्रि, 2021 रोजी
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
3 एप्रि, 2025 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • वीज वाचवणार्‍या उपकरणांवर पैसे खर्च केल्याने शेवटी तुमचेच पैसे वाचू शकतात

  • धुण्यायोग्य स्वच्छता कपड्यांसारख्या शाश्वत घरगुती आवश्यक गोष्टींवर स्विच केल्याने तुमचा पर्यावरणीय ठसा कमी होऊ शकतो

  • लो-फ्लो फिक्स्चर्स इन्स्टॉल केल्याने पाणी वाचविण्यात मदत होऊ शकते

पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार होस्ट असणे केवळ पृथ्वीसाठीच चांगले नाही तर ते तुमच्या होस्टिंग बिझनेससाठी देखील चांगले आहे. 2019 मध्ये, इको-फ्रेंडली घरांमध्ये राहण्याची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 141 टक्क्यांनी* वाढली आहे.

तुम्हाला अधिक शाश्वत होस्ट बनवण्यात मदत करण्यासाठी, आम्ही तज्ञांच्या सखोल माहितीसाठी युनायटेड नेशन्स एनवायरनमेंट प्रोग्राम, युनायटेड नेशन्समधील अग्रगण्य जागतिक पर्यावरण प्राधिकरण आणि जगातील अग्रगण्य संवर्धन संस्था वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड यांच्यासोबत जवळून काम केले आहे. आम्ही जगभरातील होस्ट्सकडून सल्ला देखील घेतला, ज्यांनी बदल घडवून आणण्यासाठी साधी पण प्रभावी पावले उचलली आहेत.

तुम्ही तुमच्या गेस्ट्ससाठी अधिक शाश्वत वास्तव्य कसे तयार करू शकता हे जाणून घेण्यासाठी वाचा.

वीज वाचवणारे अपग्रेड्स लागू करा

तुमची जागा अधिक ऊर्जा-कार्यक्षम बनवल्याने तुम्ही वापरत असलेल्या संसाधनांची संख्या कमी होऊ शकते, तुमचा खर्च कमी होऊ शकतो आणि तुमचा कार्बन फूटप्रिंट कमी होऊ शकतो. ऊर्जा संवर्धनासाठी येथे काही कल्पना दिल्या आहेत:

  • वापरात नसताना डिव्हाईसेस अनप्लग करण्याची गेस्ट्सना आठवण करा: मोबाईल फोन्सद्वारे वापरल्या जाणार्‍या उर्जेपैकी 50%** पर्यंत ऊर्जा ही वापरत नसताना प्लग इन केलेल्या चार्जर्समधून येते.
  • तुमचा वॉटर हीटर ॲडजस्ट करा: वॉटर हीटरचे स्टँडर्ड तापमान 140 डिग्री फॅरेनहाइट (60 डिग्री सेल्सिअस) असले तरीही ते 120-130 डिग्री फॅरेनहाइट (48-54 डिग्री सेल्सिअस) पर्यंत कमी केल्याने ऊर्जेची बचत करण्यात मदत होऊ शकते.
  • तुमचे लाईट बल्ब तपासा: शक्य तितके सर्वात कमी वॅटेज वापरल्याने कमी उष्णता निर्माण होते आणि कालांतराने तुमचा उर्जा वापर कमी होऊ शकतो. CFL आणि LED सारखे ऊर्जा-कार्यक्षम लाईट बल्ब देखील कमी ऊर्जा वापरतात आणि इनकॅन्डेसंट पर्यायांपेक्षा जास्त काळ** टिकतात.
  • तुमची जागा वेदरप्रूफ करा: हीटिंग आणि कूलिंगच्या खर्चात बचत करण्यात मदत करण्यासाठी दरवाजांवर वातारणीय पट्टया बसवा आणि खिडक्या इन्सुलेट करा.
  • ऑटोमेटेड कंट्रोलर्स असलेले स्मार्ट थर्मोस्टॅट्स खरेदी करा: वायफायला कनेक्ट केलेल्या थर्मोस्टॅट्सद्वारे तुम्ही तुमच्या गेस्ट्सच्या आगमन आणि निर्गमनाच्या आधारे तापमान नियंत्रित करण्याची करू शकता.
  • तुमच्या उपकरणांचे मूल्यांकन करा: नवीन उपकरणे खरेदी करण्याची वेळ येईल तेव्हा उच्च ऊर्जा-कार्यक्षम रेटिंग्ज असलेली उपकरणे निवडा.

शाश्वत घरगुती आवश्यक गोष्टींची निवड करा

पुन्हा वापरण्यायोग्य स्वच्छता पुरवठा आणि रीफिल करण्यायोग्य प्रोडक्ट्स ही बहुतेक लोकांसाठी त्यांचा पर्यावरणीय ठसा कमी करण्याची एक उत्तम संधी आहे. पर्यावरणाबाबत अधिक जागरूक होण्यासाठी या टिप्स पहा:

  • एकदाच वापरता येणारा स्वच्छता पुरवठा स्वॅप करा: पेम्ब्रोकशायर, वेल्स येथील सुपरहोस्ट ॲना, डिस्पोजेबल पेपर टॉवेलऐवजी स्वयंपाकघरात धुण्यायोग्य आणि पुन्हा वापरण्यायोग्य स्पंज आणि मायक्रोफायबर असलेले स्वच्छ करण्याचे कापड वापरतात.
  • पुनर्प्रक्रिया केलेल्या कागदाचे प्रोडक्ट्स वापरा: तुम्ही प्रदान केलेल्या कोणत्याही कागदाच्या प्रोडक्ट्ससाठी, जसे की चेहऱ्याचे टिशू किंवा टॉयलेट पेपर, अधिक पर्यावरणास अनुकूल होण्यासाठी 100% पुनर्प्रक्रिया केलेला कागद निवडा.
  • कठोर रसायने कमी करा: गैर-किंवा कमी-विषारी, नैसर्गिक किंवा बायोडिग्रेडेबल असलेले भांडी धुण्याचे साबण, लॉन्ड्री डिटर्जंट आणि बाथरूममधील साहित्य खरेदी करा. बोर्डोक्स, फ्रान्समध्ये, सुपरहोस्ट पास्केल स्थानिक दुकानांमधून सेंद्रिय बाथ आणि बॉडी प्रोडक्ट्स घेतात.
  • सेंद्रिय कापडांकडे स्विच करा: जेव्हा शीट्स आणि टॉवेल्स बदलण्याची वेळ येते, तेव्हा सेंद्रिय फॅब्रिक्स निवडल्यास तुम्हाला लोक आणि इकोसिस्टमसाठी कीटकनाशके आणि हानिकारक असलेले इतर विषारी पदार्थ टाळण्यास मदत होऊ शकते.

पाणी वाचवा

ताजे, स्वच्छ पाणी हे मर्यादित संसाधन असल्याने, तुम्ही आणि तुमचे गेस्ट्स किती पाणी वापरता हे लक्षात घेणे महत्वाचे आहे, विशेषत: जेव्हा हवामानाचे संकट अधिक दुष्काळाला कारणीभूत ठरते. पाणी वाचवण्याचे काही फायदेशीर मार्ग येथे दिले आहेत:

  • गेस्ट्ससाठी रिमाइंडर्स सोडा: तुमच्या अंघोळीचा एक मिनिट कमी केल्याने दर मिनिटाला एक गॅलन** पाण्याची बचत होऊ शकते. इटलीच्या मिलानमधील सुपरहोस्ट अँटोनेला, गेस्ट्सना दात घासत असताना पाणी बंद करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नळांजवळ नोट्स पोस्ट करतात. तुम्हीसुद्धा गेस्ट्सना अंघोळीची वेळ कमी करण्यासाठी प्रोत्साहित करू शकता.
  • गळती आहे का ते तपासा: नियमितपणे टॉयलेट्स, सिंक्स, टब्स आणि पाण्याचा वापर करणार्‍या उपकरणांच्या आसपासच्या भागांची तपासणी केल्याने गळती आहे का ते पहाण्यात तुम्हाला मदत होऊ शकते. तुम्ही किती पाणी वापरत आहात हे स्मार्ट वॉटर मीटर ट्रॅक करू शकते आणि असामान्य ॲक्टिव्हिटी आढळल्यास तुम्हाला सूचित करू शकते—उदाहरणार्थ, जर तुम्ही स्वयंपाकघरातील नळ बंद करणे विसरलात किंवा डिशवॉशरमधून पाणी गळत असेल तर.
  • कार्यक्षम सेटिंग्ज आणि उपकरणे वापरा: वॉशिंग मशीन्स आणि डिशवॉशर्स भरपूर पाणी घेतात. तुमकडे ती असल्यास, गेस्ट्सना क्विक-वॉश किंवा इको सेटिंग्ज वापरण्यास प्रोत्साहित करा. आणि जेव्हा मशीन बदलण्याची वेळ येते, तेव्हा कमी पाणी वापरणारी उर्जा-कार्यक्षम असल्याची निवड करा.
  • लो-फ्लो फिक्स्चर्स स्थापित कराः तुम्ही लो-फ्लो नळ आणि लो-फ्लो किंवा ड्युअल-फ्लश टॉयलेट्स स्थापित करून देखील फरक करू शकता. टास्मानिया, ऑस्ट्रेलियामध्ये, सुपरहोस्ट मेरीडिथचे एक विशेष शॉवर हेड आहे जे जास्त फोर्स असला तरीही पाण्याचा प्रवाह कमी करते.
आम्हाला आशा आहे की या सूचना तुम्हाला अधिक पर्यावरणास अनुकूल होस्टिंग रुटीन तयार करण्यासाठी प्रेरित करतील—आणि कदाचित तुम्ही तुमच्या गेस्ट्सना घरी परतल्यानंतर या कल्पना वापरण्यासाठी प्रेरित कराल.

पुढे: रीसायकलिंग आणि कचरा कमी करण्याबद्दल माहिती मिळवा

*ऑगस्ट 2018 पासून ऑगस्ट 2019 पर्यंत विशिष्ट कीवर्ड (ईको-फ्रेंडली, इकॉलॉजिकल इत्यादी) लिस्टिंगच्या शीर्षकात आणि विवरणात असलेल्या लिस्टिंग्जमध्ये गेस्ट येण्याच्या संख्येमध्ये झालेल्या वाढीचा कॅलेंडर वर्षांप्रमाणे Airbnb च्या आंतरिक डेटावर आधारित

**वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडच्या 60 अ‍ॅक्शन्स फॉर द प्लॅनेट, या 5 मार्च 2021 रोजी प्रकाशित पुस्तकातून

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदलली असू शकते.


हायलाइट्स

  • वीज वाचवणार्‍या उपकरणांवर पैसे खर्च केल्याने शेवटी तुमचेच पैसे वाचू शकतात

  • धुण्यायोग्य स्वच्छता कपड्यांसारख्या शाश्वत घरगुती आवश्यक गोष्टींवर स्विच केल्याने तुमचा पर्यावरणीय ठसा कमी होऊ शकतो

  • लो-फ्लो फिक्स्चर्स इन्स्टॉल केल्याने पाणी वाचविण्यात मदत होऊ शकते

Airbnb
21 एप्रि, 2021
हे उपयुक्त ठरले का?