स्मार्ट रेट म्हणजे काय?

हे टूल मागणीनुसार तुमचे प्रति रात्र भाडे आपोआप ॲडजस्ट करते.
Airbnb यांच्याद्वारे 3 मे, 2023 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
12 ऑक्टो, 2023 रोजी अपडेट केले

कालांतराने तुमचे भाडे बदलल्यास तुम्हाला तुमच्या भागातील प्रवासाच्या ट्रेंड्सना प्रतिसाद देण्यात मदत होते. असे करण्याचा एक मार्ग म्हणजे स्मार्ट रेट सेट करणे. या टूलद्वारे, तुमचे प्रति रात्र भाडे मागणीनुसार आपोआप ॲडजस्ट होते.

विशेषतः, तुम्हाला तुमचे भाडे ऑप्टिमाईझ करणे सुरू ठेवायचे असेल, पण सतत त्याकडे लक्ष देत बसायचे नसेल, तर हे टूल उपयुक्त ठरते.

स्मार्ट रेट कसे काम करते

तुमचे प्रति रात्र भाडे मोजण्यासाठी आणि ॲडजस्ट करण्यासाठी स्मार्ट रेट तुमची लिस्टिंग, तुमचा प्रदेश आणि गेस्टच्या वर्तनाबद्दलचे शेकडो घटक वापरते. ते हे लक्षात घेते:

  • तुमच्या लिस्टिंगबद्दलचे तपशील, जसे की प्रॉपर्टीचा प्रकार, लोकेशन, सुविधा आणि रिव्ह्यूज

  • तुमच्या प्रदेशातील ॲक्टिव्हिटी सर्च करा, यामध्ये किती लोक विशिष्ट तारखा सर्च करत आहेत याचा समावेश आहे

  • तुमच्या प्रदेशातील बुकिंग्ज, यामध्ये मिळत्या-जुळत्या प्रॉपर्टीच्या प्रकारांचा आणि सुविधांचा समावेश आहे

स्मार्ट रेट ही गणना नियमितपणे करते आणि ही गणना आणि तुमची स्वतःची भाडे नियंत्रणे वापरून तुमचे रात्रीचे भाडे ऑटोमॅटिक पद्धतीने अपडेट करते.

स्मार्ट रेट कसे वापरावेत

तुमचे नेहमी तुमच्या भाड्यावर नियंत्रण असते, तुम्ही स्मार्ट रेट चालू केल्यावरसुद्धा. हे टूल वापरायचे का तसेच केव्हा आणि कसे वापरायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे. तुम्ही हे करू शकता:

  • कोणत्याही वेळी ते बंद करा. हे त्वरित लागू होईल; पण यामुळे आधीच बुकिंग केलेल्या गेस्ट्सचे पेमेंट बदलणार नाही.

  • कोणत्याही तारखेला ते ओव्हरराईट करा. हे करण्यासाठी, तुमच्या कॅलेंडरमध्ये बुक न झालेल्या विशिष्ट तारखा निवडा आणि त्या तारखांना स्मार्ट रेट बंद करा.

  • भाड्याची श्रेणी सेट करा. रात्रीचे किमान आणि कमाल भाडे असे निवडा की तुमची लिस्टिंग त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्तला जाणार नाही (तुम्ही सवलती किंवा प्रमोशन्ससुद्धा सेट केली नसतील तर).

तुम्ही तुमचे स्मार्ट रेट धोरण कालांतराने अजून विकसित करू शकता आणि सुधारू शकता. यामध्ये किमान आणि कमाल भाडे ॲडजस्ट करणे तसेच तुम्ही स्मार्ट रेट ओव्हरराईड करण्यासाठी निवडलेल्या तारखांसाठी कस्टम भाडे, प्रमोशन्स आणि सवलती सेट करणे समाविष्ट आहे.

स्मार्ट रेट कधी वापरावा

स्मार्ट रेट तुमच्या लिस्टिंगसाठी आणि परिस्थितीसाठी योग्य आहे की नाही याची तुम्हाला खात्री नसल्यास, स्वतःला विचारा:

  • तुम्ही नियमितपणे मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्ज तपासत आहात का? तुम्ही ते करत नसल्यास, स्मार्ट रेट कदाचित योग्य असेल—आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अजूनही मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जमध्ये भाड्यांची तुलना करू शकता.

  • तुम्ही तुमचे भाडे नियमितपणे अपडेट करत आहात का? तुम्ही ते करत नसल्यास किंवा जर तुम्हाला ते करायचे नसल्यास, तुम्ही स्मार्ट रेट वापरून पाहू शकता.

तुम्ही तुमच्या स्थानिक होस्ट क्लब मध्ये सामील होऊन इतर होस्ट्स स्मार्ट रेट कसे वापरतात ते जाणून घेऊ शकता.

तुमच्या वैयक्तिक भाडे धोरणाच्या सर्व पैलूंप्रमाणे, स्मार्ट रेट वापरणे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. फक्त लक्षात ठेवा की तुम्ही सेटिंग्जमध्ये विविध बदल करून बघू शकता जेणेकरून ती तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकेल.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
3 मे, 2023
हे उपयुक्त ठरले का?