LGBTQ+ गेस्ट्सचे स्वागत करण्यासाठी सुपरहोस्ट सल्ला

होस्ट सल्लागार बोर्डाचा जून अपडेट सर्वसमावेशक होस्ट होण्याबद्दलचे सल्ले शेअर करतो.
Airbnb यांच्याद्वारे 21 जून, 2021 रोजी
वाचण्यासाठी 4 मिनिटे लागतील
21 जून, 2021 रोजी अपडेट केले

आम्ही दर महिन्याला होस्ट सल्लागार बोर्डाचे सर्वात नवीन अपडेट्स शेअर करतो आणि तुम्हाला बोर्डाच्या सदस्यांविषयी जाणून घेण्यात मदत करतो.

सर्वांना नमस्कार,

मी सॅन फ्रान्सिस्कोचा एक सुपरहोस्ट पीटर क्वान आहे आणि मी होस्ट सल्लागार बोर्डाचा सदस्य आहे. मी सुमारे 10 वर्षांपूर्वी होस्ट बनलो तेव्हापासून मी होस्टिंग कम्युनिटीच्या अधिकारांचा जाहीर समर्थक आहे—समाजात ज्यांच्याकडे अनेक दुर्लक्ष केले जाते असे ज्येष्ठ नागरिक आणि LGBTQ+ कम्युनिटीचे सदस्य अशांचा यात समावेश आहे.

प्राईडच्या सन्मानार्थ, मी या महिन्याच्या सुरुवातीला Airbnb च्या “(क्विअर) होस्ट्सने शक्य केले” कार्यक्रमात भाग घेतला. आपलेपणाला एक वास्तव बनवण्याच्या Airbnb च्या यशात LGBTQ+ होस्ट्स म्हणून आपण काय योगदान देऊ शकतो याबद्दल क्विअर होस्ट लीडर्सच्या एका ग्रुपसह तिथे जोमदार चर्चा झाली.

LGBTQ+ गेस्ट्सना तुमच्या जागेत सुरक्षित वाटावे यासाठी तुम्ही कशी मदत करू शकता तसेच स्थानिक होस्टिंग कम्युनिटीमध्ये सहभागी झाल्यामुळे मला काय फायदा झाले आहे हे तुम्ही खाली वाचू शकता.

अधिक समावेशक होस्ट बनणे

त्यांच्या लिस्टिंगच्या वर्णनात LGBTQ+ गेस्ट्ससाठी त्यांचे घर ही एक सुरक्षित जागा कशी आहे हे होस्ट्सनी त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीने सांगावे यासाठी मी होस्ट्सना प्रोत्साहित करतो. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये, समलिंगी जोडप्यांनी एकमेकांचे हात धरून रस्त्यावर चालणे ही मोठी गोष्ट नाही. पण वेगळे निकष किंवा नियम असलेल्या देशांमधून येणाऱ्या बऱ्याच गेस्ट्सना स्थानिक संदर्भांची माहिती दिल्यास ते त्यांच्यासाठी खूप आरामदायक ठरू शकते.

होस्टने त्यांच्या गेस्ट्सना असे कळवले की ते फक्त एका सुरक्षित शहरातच नाही तर एका सुरक्षित घरात येत आहे तर त्यामुळे गेस्ट्सच्या अनेक काळज्या दूर होऊ शकतात आणि ते निश्चिंत मनाने येऊ शकतात. गेस्ट्सनी डोरबेल वाजवण्यापूर्वी त्यांना हे ठाऊक असले पाहिजे की त्यांचे त्यांच्या समलैंगिक पार्टनरसह खुल्या दिलाने स्वागत केले जाणार आहे. हे “सर्वत्र आपलेपणा” वाटण्यात लोकांची मदत करण्याच्या Airbnb च्या मिशनशी सुसंगत असेल.

मला सॅन फ्रान्सिस्कोमधील असे LGBTQ+ होस्ट्स ठाऊक आहेत ज्यांच्या लिस्टिंगवर एका कोपऱ्यात रेनबो फ्लॅग असलेला फोटो आहे आणि त्यांच्या वर्णनात त्यांच्या ओळखीबद्दल आणि ते कोणत्या प्रकारच्या कार्यात सहभागी आहेत याबद्दल सांगितले गेले आहे.

तुम्ही LGBTQ+ गेस्ट्सना आणखी सहज वाटावे यासाठी काही धोरणात्मक गोष्टीसुद्धा करू शकता जसे की ते घरी आल्यावर त्यांना शहराचे क्विअर गाईड तसेच LGBTQ+ च्या इतिहासावरील पुस्तके देणे. अशा छोट्या गोष्टींमुळे गेस्ट्सना आपले स्वागत केले जाते आहे असे वाटण्यात मोठी मदत होते.

तुमच्या स्थानिक कम्युनिटीमध्ये सहाय्य शोधणे

मी होस्ट बनल्यानंतर मला लक्षात आले की  माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील अशा फारशा जागा नाही आहेत.

मी 2012 मध्ये एक होस्ट कम्युनिटी सपोर्ट ग्रुप सुरू केला आणि तेव्हापासून आम्ही दर महिन्याला भेटत आहोत.

होस्टिंग करणे ही खूप एकाकी गोष्ट असू शकते, म्हणून नवीन होस्ट्सना मी नेहमी एक सल्ला देत असतो की स्थानिक होस्ट क्लबमध्ये सामील व्हा—किंवा तो अस्तित्वात नसल्यास तुम्हीच तो सुरू करा. वेगवेगळे प्रयोग आणि चुका करत एक उत्तम होस्ट कसे व्हावे हे शिकण्याऐवजी तुम्ही इतर लोकांच्या अनुभवांमधून शिकू शकता—आणि ते करत असताना जिवाभावाचे मित्र मिळवू शकता.

इतर होस्ट्सना मदत करणे खरेच खूप आनंद देणारे असते. प्लॅटफॉर्मवर कसे नेव्हिगेट करावे यासारख्या होस्टिंगच्या मूलभूत गोष्टी सांगणे असो किंवा Airbnb टीमच्या मेंबर्सना नवीन उत्पादने समजावण्यासाठी अथवा नियामक बदलांवर चर्चा करण्यासाठी आपल्या होस्ट क्लब मीटिंग्जमध्ये आमंत्रित करणे असो, दोन्हींबाबतीत तुम्हाला हा अनुभव नक्की येईल.

मी ज्येष्ठ होस्ट्सचा खंदा समर्थक देखील का आहे

जेव्हा लोक होस्टिंग कम्युनिटीमधील सर्वसमावेशकता आणि विविधता याबद्दल बोलतात तेव्हा ज्येष्ठ नागरिक हा सहसा हाय-प्रोफाइल ग्रुप नसतो आणि खरे तर त्यांना आपण त्यांच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज असते.

मला असे लक्षात आले की Airbnb वर, ज्येष्ठ नागरिक हे अमेरिकेत नवीन होस्ट्सच्या सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या ग्रुप्सपैकी एक आहेत आणि अमेरिकेतील महिला ज्येष्ठांना सातत्याने सर्वोत्तम रिव्ह्यूज मिळत असतात.*

मी होस्ट सल्लागार बोर्डाचा सदस्य म्हणून मला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यातील एक म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे स्थान उंचावणे आणि जेव्हा Airbnb एखाद्या उत्पादनावर काम करत असेल तेव्हा ते आमच्याबद्दल विचार करतील हे सुनिश्चित करण्यात मदत करणे.

गेल्या काही दिवसांत मला ज्या गोष्टींनी खूप आनंद झाला त्यापैकी एक क्षण तो होता जेव्हा मी ज्येष्ठ होस्ट्सचा एक सबग्रुप बनवला. आम्ही त्याचे नाव गोल्डन होस्ट्स असे ठेवले. मी अमेरिकन असोसिएशन ऑफ रिटायर्ड पर्सन्स (AARP) चा कार्ड-वाहक सदस्य आहे. तुम्ही AARP चे मेंबर होण्यासाठी पात्र असलात तर तुम्ही गोल्डन होस्ट्समध्ये सामील होऊ शकता.

गोल्डन होस्ट्स ग्रुपची वाढ होते आहे आणि आजकाल ते होस्टिंग कम्युनिटीमधील माझ्या सर्वात आवडत्या सदस्यांपैकी काहीजण आहेत. कोविड-पूर्व काळात आम्ही दर महिन्याला पॉटलक डिनरचा एकत्र आनंद घेण्यासाठी एखाद्या मेंबरच्या घरी जमायचो. आम्हा सर्वांना खूपच मजा यायची.

क्लबमध्ये ज्येष्ठ नागरिक एकमेकांना होस्टिंगबद्दल शिकवतात. इतर कोणत्याही ग्रुपप्रमाणेच, ज्येष्ठ नागरिकसुद्धा तंत्रज्ञान आणि आपले जीवन बदलणाऱ्या अनेक डिजिटल प्रगती खूप झटपट आत्मसात करू शकतात, किंवा त्यांना सर्वात प्रभावी पद्धतीने शिकता यावे यासाठी त्यांना खास त्यांच्यासाठी प्रशिक्षण किंवा सपोर्टची गरज भासू शकते.

होस्ट सल्लागार बोर्डाने अलीकडे नवीन काय केले आहे

होस्ट सल्लागार मंडळाने नवीन काय केले आहे याबद्दल अधिक जाणून घ्या आणिबोर्डाच्या सदस्यांकडून मासिक अपडेट्स आणि टिप्स मिळवण्यासाठी लक्ष ठेवून असा.

*“Airbnb चा 60+ महिला होस्ट्सचा वाढता समुदाय” या Airbnb च्या रिपोर्टनुसार
या लेखातील माहिती पब्लिकेशन झाल्यानंतर बदललेली असू शकते.
Airbnb
21 जून, 2021
हे उपयुक्त ठरले का?