कमी गर्दीच्या सीझनची तयारी करण्याचे सहा मार्ग
तुमच्या भागातील कमी गर्दीच्या हंगामासाठी तुम्ही तयार आहात का? जेव्हा गेस्ट्सचे प्रवास करण्याचे प्रमाण कमी होते, तेव्हा बुकिंग्ज मॅनेज करण्यात मदत करण्यासाठी Airbnb होस्टिंग टूल्स वापरण्याचे सहा मार्ग येथे दिले आहेत. तुमच्या होस्टिंग बिझनेससाठी काय योग्य आहे, हे ठरवण्यासाठी प्रत्येक मार्गाच्या फायद्यांचा विचार करा.
1. अल्पकालीन वास्तव्यांना परवानगी द्या
तुमचा ट्रिपचा किमान कालावधी कमी केल्याने, अल्पकालीन वास्तव्ये बुक करणाऱ्या गेस्ट्सचे लक्ष वेधले जाऊ शकते आणि लोकांचे प्रवासाचे प्रमाण कमी झालेले असताना तुमच्या कॅलेंडरमधील रिकाम्या तारखा भरण्यात मदत होऊ शकते.
तुमच्याकडे आठवड्याच्या दिवसानुसार तुमच्या ट्रिपचा किमान कालावधी कस्टमाइझ करण्याचा पर्याय आहे. उदाहरणार्थ, जर आठवड्याच्या शेवटी गेस्ट्सची मागणी जास्त असेल, तर तुम्ही आठवड्याच्या मधल्या दिवसात एक रात्र मुक्काम करण्यास परवानगी देऊ शकता परंतु जेव्हा गेस्ट्स शुक्रवारच्या किंवा शनिवारच्या रात्री बुक करतात तेव्हा नाही.
तुमचा ट्रिपचा किमान कालावधी कमी करण्यासाठी:
- तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरमधील उपलब्धता टॅबवर जा.
- ट्रिपचा कालावधी अंतर्गत, किमान रात्री वर टॅप करा.
- तुमच्यासाठी योग्य असलेल्या रात्रींच्या संख्येनुसार ट्रिपच्या किमान कालावधीमध्ये बदल करा.
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधील होस्ट सल्लागार बोर्डाच्या सदस्या आणि सुपरहोस्ट फेलिसिटी म्हणतात, “जर माझी जागा आठ रात्रींसाठी रिकामी असेल तर मला सात रात्रींचे बुकिंग मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे.” “जर मी त्या कालावधीत माझ्या किमान रात्री कमी केल्या तर, मी अधिक गेस्ट्सना आकर्षित करण्याची शक्यता आहे.
2. ॲडव्हान्स नोटिसचा कालावधी कमी करा
कमी गर्दीच्या सीझनमध्ये तुम्हाला आणखी काही बुकिंग्ज मिळवण्यासाठी गेस्ट्सना चेक इनच्या जवळ बुकिंग करू देण्याचा विचार करा. गेस्टचे बुकिंग आणि त्यांचे आगमन या दरम्यान तुम्हाला किती वेळ हवा आहे यावर अवलंबून, तुम्ही त्याच दिवसाइतका कमी लीड वेळ निवडू शकता.
तुमचा किमान लीड वेळ बदलण्यासाठी:
- तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरमधील उपलब्धता टॅबवर जा.
- ॲडव्हान्स नोटिस उघडा.
- तुमच्यासाठी योग्य असलेल्या दिवसांची संख्या निवडा.
तुम्ही तुमच्या किमान लीड वेळेपेक्षा कमी नोटिस कालावधीत आलेल्या विनंत्यांना देखील परवानगी देऊ शकता. तुम्हाला या विनंत्यांचा आढावा घेण्यास आणि मंजूर करण्यास सांगितले जाईल.
नेल्सन, ब्रिटिश कोलंबियामधील सुपरहोस्ट कॅरेन म्हणतात, “अशी परवानगी न देणार्या इतर प्रॉपर्टीजच्या तुलनेत नजरेत भरण्याची ही एक उत्तम संधी आहे.” “माझ्याकडे स्वतःहून चेक इनची सुविधा देखील आहे आणि मी दिशानिर्देश शेअर करण्यासाठी शेड्यूल केलेले मेसेजेस वापरते. यामुळे मला चेक इनच्या जवळ बुकिंग करणार्या गेस्ट्सची सोय करता येते”.
3. अखेरची सवलत जोडा
चेक इनची तारीख जवळ आल्यावर तुमचे प्रति रात्र भाडे कमी केल्याने तुम्हाला शेवटच्या क्षणी बुकिंग करणार्यांचे लक्ष आकर्षित करण्यात मदत होऊ शकते. तुमचे कॅलेंडर भरण्यात आणि तुमची कमाई वाढवण्यात मदत करण्यासाठी चेक इनच्या 1 ते 28 दिवस आधी केलेल्या बुकिंग्जवर सवलत देण्याचा विचार करा.
तुमच्या 60 दिवसांच्या सरासरी भाड्याच्या 10% किंवा त्याहून अधिक सवलतींसाठी, गेस्ट्सना तुमच्या लिस्टिंग पेजवर आणि सर्च रिझल्ट्समध्ये एक विशेष कॉलआउट दिसतो. तुमचे सवलत दिलेले भाडे तुमच्या मूळ भाड्याच्या बाजूला दिसते, ज्यावर काट मारलेली असते.
अखेरची सवलत जोडण्यासाठी:
- तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरमधील भाडे टॅबवर जा.
- अधिक सवलती अंतर्गत, अखेरच्या सवलती उघडा.
- 1 ते 28 दरम्यानची आगमनापूर्वीच्या दिवसांची संख्या लिहा.
- तुम्ही ऑफर करू इच्छित असलेली टक्केवारी सवलत लिहा.
“जास्तीत जास्त, मला 15% कमी करणे ठीक वाटते,” पाम स्प्रिंग्ज, कॅलिफोर्नियामधील सुपरहोस्ट जिमी म्हणतात. "माझे एक किमान भाडे ठरलेले आहे, म्हणून मी त्या खाली कधीही जात नाही. या वीकएंडच्या आगामी रिझर्व्हेशनसाठी, मी ते किमान भाडे ठेवण्यास तयार आहे जेणेकरून मला बुकिंग मिळवता येईल.”
4. साप्ताहिक आणि मासिक सवलती जोडा
दीर्घकालीन वास्तव्यांसाठीच्या सवलतींमुळे तुमचे सर्च रँकिंग सुधारण्यात, तुमच्या कॅलेंडरमधील रिकाम्या तारखा भरण्यात आणि चेक आऊटनंतरची तयारी कमी करण्यात मदत होऊ शकते. सात रात्री किंवा त्याहून अधिक कालावधीच्या वास्तव्यांसाठी साप्ताहिक सवलती आणि 28 रात्री किंवा त्याहून अधिक कालावधीच्या वास्तव्यांसाठी मासिक सवलती ऑफर करण्याचा विचार करा.
गेस्ट्सना तुमच्या लिस्टिंग पेजवर आणि सर्च रिझल्ट्समध्ये 10% किंवा त्याहून अधिक साप्ताहिक किंवा मासिक सवलतींसाठी एक विशेष कॉलआउट दिसतो. भाडे विवरणामध्ये तुमच्या मूळ भाड्याच्या पुढे वास्तव्याच्या कालावधीवर आधारित सर्व सवलतीदेखील हायलाइट केल्या जातात.
साप्ताहिक किंवा मासिक सवलत जोडण्यासाठी:
- तुमचा वास्तव्याचा किमान आणि कमाल कालावधी स्थानिक नियम आणि निर्बंधांचे पालन करत असल्याची खात्री करा.
- तुम्ही साप्ताहिक किंवा मासिक वास्तव्ये ऑफर करू शकत असल्यास, तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरमधील भाडे टॅबवर जा.
- साप्ताहिक किंवा मासिक सवलतींमध्ये टक्केवारी सवलत सेट करा आणि सेव्ह करा वर टॅप करा.
“साप्ताहिक किंवा मासिक सवलती ऑफर केल्याने नक्कीच तुमच्या लिस्टिंगकडे अधिक लक्ष वेधले जाईल,” मेक्सिको सिटीमधील सुपरहोस्ट ओमर म्हणतात. “मी बघत आहे की अधिकाधिक प्रवासी, विशेषत: डिजिटल नोमॅड्स, दीर्घकालीन वास्तव्यांसाठी येत आहेत.”
5. कस्टम प्रमोशन जोडा
कमी गर्दीच्या सीझनमध्ये प्रमोशन चालवणे हा सर्च रिझल्ट्समध्ये नजरेत भरण्याचा आणि अधिक बुकिंग्ज मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जेव्हा तुम्ही 15% किंवा त्याहून अधिक सवलती ऑफर करता, तेव्हा गेस्ट्सना तुमच्या लिस्टिंग पेजवर आणि सर्च रिझल्ट्समध्ये एक विशेष कॉलआउट दिसतो.
कस्टम प्रमोशन जोडण्यासाठी:
- तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरमधील भाडे टॅबवर जा.
- कॅलेंडरवर तारखा निवडा.
- तुमची टक्केवारी सवलत सेट करा.
तुमच्या लिस्टिंगसाठी कस्टम प्रमोशन कदाचित नेहमीच उपलब्ध असणार नाही. त्यासाठीच्या आवश्यकतांमध्ये ज्या गोष्टींचा समावेश आहे त्या म्हणजे, तुमच्या लिस्टिंगसाठी किमान तीन बुकिंग्ज असणे आणि त्यांतील किमान एक गेल्या वर्षभरातील असणे आवश्यक आहे, आणि तुम्ही निवडलेल्या तारखा किमान 28 दिवसांसाठी उपलब्ध राहिलेल्या असणे आवश्यक आहे.
कॅनरी बेटांवरील टेनेरिफमधील होस्ट सल्लागार बोर्डाचे सदस्य डॅनियल सांगतात की, “प्रमोशन्समुळे मला पुढील काही महिन्यांसाठी एक भाडे सेट करता येते आणि त्या कालावधीसाठी इंटरेस्ट न दिसल्यास सवलत देण्याचा पर्याय असतो.” “ते माझ्या आवडत्या टूल्सपैकी एक आहेत, कारण मला पुरवठा आणि मागणीचे प्रमाण जाणून घ्यायला आणि त्यानुसार कृती करायला आवडते.”
6. तुमचे भाडे अपडेट करा
तुमच्या भागातील मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जच्या भाड्यांची तुलना केल्याने तुम्हाला स्पर्धात्मक भाडे सेट करण्यात आणि प्रवासाचे प्रमाण कमी झालेले असताना आणखी काही बुकिंग्ज आकर्षित करण्यात मदत होऊ शकते. तुमचे भाडे जवळपासच्या मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जपेक्षा जास्त असल्यास, अधिक गेस्ट्सचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि तुमचे सर्च रँकिंग सुधारण्यासाठी तुम्ही ते कमी करू शकता.
तुम्ही रोज रात्रीसाठी समान भाडे ऑफर करत असल्यास, वीकडे आणि वीकेंड भाडी जोडण्याचा विचार करा. वेगवेगळ्या रात्रींनुसार तुमच्या भाड्यात बदल केल्याने तुम्हाला जास्तीत जास्त बुकिंग्ज मिळवण्यात मदत होऊ शकते.
मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची तुलना करण्यासाठी:
- तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरमधील भाडे टॅबवर जा.
- 31 दिवसांपर्यंतची तारखेची रेंज निवडा.
- मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्ज पहा वर टॅप करा.
तुम्हाला तुमच्या भागाच्या नकाशावर जवळपासच्या मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जचे सरासरी भाडे दिसेल. नकाशावरील बटणे वापरून तुम्ही बुक झालेल्या किंवा बुकिंग नसलेल्या लिस्टिंग्ज पाहू शकता. कोणत्या लिस्टिंग्ज मिळत्या-जुळत्या आहेत हे ठरवणाऱ्या घटकांमध्ये लोकेशन, आकार, वैशिष्ट्ये, सुविधा, रेटिंग्ज, रिव्ह्यूज आणि तुमच्या लिस्टिंग्जचा विचार करताना गेस्ट्सनी बघितलेल्या इतर लिस्टिंग्ज समाविष्ट असतात.
लेक अॅरोहेड, कॅलिफोर्नियामधील होस्ट सल्लागार बोर्डाच्या सदस्या आणि सुपरहोस्ट केटी के म्हणतात, “मी माझ्या लिस्टिंग्जशी मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जवर लक्ष ठेवते, जेणेकरून मी माझे भाडे स्पर्धात्मक असल्याची खात्री करू शकेन,”. “तुम्हाला खरोखरच लोकांना तुमच्या लिस्टिंगकडे आकर्षित करायचे असल्यास, कमी गर्दीच्या काळांत लवचिक असणे महत्त्वाचे आहे.”
तुम्ही नेहमीच तुमचे भाडे आणि इतर सेटिंग्ज नियंत्रित करता. तुमचे रिझल्ट्स बदलू शकतात.
होस्ट्सना मुलाखतींमध्ये भाग घेतल्याबद्दल पैसे देण्यात आले होते.
हा लेख पब्लिश केल्यानंतर त्यातील माहितीमध्ये बदल झालेला असू शकतो.