Airbnb सेवा शुल्क सोपे करत आहोत
होस्ट्सना किमती सेट करणे सोपे व्हावे यासाठी आम्ही आमची शुल्क रचना सोपी करत आहोत. कोणते बदल होणार आहेत आणि तुमचे पेआऊट्स आहेत तितकेच कायम कसे ठेवायचे ते जाणून घ्या.
सेवा शुल्क कसे काम करते
आज सहसा होस्ट्स आणि गेस्ट्स दोघेही सेवा शुल्क देतात. परिणामी, तुम्ही एक भाडे सेट करता परंतु तुमचे गेस्ट्स जास्त भाडे देतात ज्यामध्ये त्यांच्या सेवा शुल्काचा समावेश असतो.
27 ऑक्टोबर रोजी, प्रॉपर्टी मॅनेजमेंट किंवा चॅनेल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापरून भाडी मॅनेज करणारे होस्ट्स सिंगल शुल्कावर स्विच करतील, ज्यानुसार होस्ट्स तेच भाडे सेट करतील जे गेस्ट्सना दिसणार आहे आणि ते पेमेंट करणार आहेत. तुमचे गेस्ट्स किती भाडे देणार आहेत हे माहीत असल्यास स्पर्धात्मक भाडे आकारणे सोपे होते.
- विभाजित शुल्क: आज, तुमच्या पेआऊटची गणना करण्यासाठी तुमच्या भाड्यामधून 3% होस्ट शुल्क वजा केले जाते.* याशिवाय, गेस्ट्स तुमच्या भाड्याव्यतिरिक्त 14.1% ते 16.5% सेवा शुल्क देतात. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचे भाडे $100 USD इतके सेट केल्यास, तुम्ही $97 कमावता आणि तुमचे गेस्ट्स सुमारे $115 देतात.
- सिंगल शुल्क: 27 ऑक्टोबर रोजी, तुमच्या पेआऊटची गणना करण्यासाठी तुमच्या भाड्यातून 15.5% सेवा शुल्क वजा केले जाईल. हे सिंगल शुल्क Airbnb च्या जागतिक सरासरी सेवा शुल्कावर आधारित आहे, जे सध्या होस्ट्स आणि गेस्ट्समध्ये विभाजित केले जाते. उदाहरणार्थ, तुम्ही सिंगल शुल्कासाठी तुमचे भाडे अॅडजस्ट करून $115 इतके केल्यास, तुम्ही $97.18 कमवाल आणि तुमचे गेस्ट्स $115 देतील.
दोन्ही उदाहरणांमध्ये, तुम्ही जितके कमावता आणि तुमचे गेस्ट्स जितके पेमेंट करतात ते सारखेच आहे.
तुमच्या भाड्यांचा आढावा घेणे
तुम्हाला नवीन शुल्क रचनेच्या दृष्टीने तुमच्या भाड्यांमध्ये काही बदल करावेसे वाटतात का यावर विचार करा.
- तुमचे भाडे ॲडजस्ट करा: तुम्हाला तुमचे पेआऊट्स आणि गेस्ट्स देत असलेली रक्कम आधी होती तितकीच ठेवण्यासाठी तुमच्या भाड्यांमध्ये बदल करावासा वाटू शकतो. वर दर्शवल्याप्रमाणे, तुम्ही तुमचे भाडे $100 ऐवजी $115 इतके ॲडजस्ट केल्यास, तुम्ही $97.18 कमवाल आणि तुमचे गेस्ट्स $115 देतील.
- तुमची भाडी आधी होती तितकीच ठेवा: तुम्ही तुमची भाडी अॅडजस्ट न केल्यास तुम्ही प्रति रात्र कमी कमाई कराल आणि तुमचे गेस्ट्स कमी पैसे देतील. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचे भाडे $100 ठेवल्यास, 15.5% शुल्क वजा केल्यानंतर तुम्ही $84.50 कमवाल आणि तुमचे गेस्ट्स $100 देतील.
तुम्ही तुमची भाडी अॅडजस्ट करणार असल्यास, ते बदल तुमचे प्रॉपर्टी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापरून 27 ऑक्टोबर रोजी करा. त्यानंतर तुम्ही वापरत असलेल्या सॉफ्टवेअरवर आणि प्लॅटफॉर्म्सवर सवलती आणि प्रमोशन्ससह तुमची भाडी योग्य दिसत असल्याची खातरजमा करा.
तुम्ही 27 ऑक्टोबरपूर्वी बदल करण्याचा निर्णय घेतल्यास, तुम्हाला तुमच्या Airbnb अकाऊंटच्या पेमेंट्स विभागात तुमची शुल्क रचना सिंगल सेवा शुल्कावर मॅन्युअली अपडेट करावी लागेल.
Airbnb सेवा शुल्कांमध्ये काय कव्हर केले जाते
सेवा शुल्क Airbnb ची उत्पादने आणि सेवांचा खर्च भरून काढण्यात मदत करतात, ज्यामध्ये पेमेंट प्रोसेसिंग, मार्केटिंग आणि ग्राहक सेवा यासारख्या खर्चांचा समावेश असतो. आमची शुल्क रचना सिंगल शुल्कावर अपडेट करणे हा भाड्यांमधील पारदर्शकता वाढवण्याच्या Airbnb च्या वचनबद्धतेचा भाग आहे.
Airbnb सेवा शुल्कांबद्दल अधिक जाणून घ्या.
*काही होस्ट्स अधिक पैसे देतात, ज्यात इटली आणि ब्राझीलमध्ये लिस्टिंग्ज असलेल्या काही होस्ट्सचा समावेश आहे.
सेवा शुल्क म्हणजे तुमच्या प्रति रात्र भाड्यातील काही टक्के रक्कम आणि त्याव्यतिरिक्त तुम्ही जोडलेले कोणतेही शुल्क असतात, जसे की स्वच्छता शुल्क
काही देश आणि प्रदेशांमध्ये, प्रदर्शित केलेल्या एकूण भाड्यात कर समाविष्ट केलेले असतात. करांसह एकूण भाडे हे नेहमीच चेक आऊटच्यापूर्वी दर्शवले जाते.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.