प्रत्येक गेस्टबरोबर अपेक्षा स्पष्टपणे ठरवणे
होस्ट्ससाठीच्या मुख्य नियमांचा एक भाग म्हणून, तुमच्या लिस्टिंग पेजने तुमच्या जागेचे अचूक वर्णन केले पाहिजे, जे चेक इनपासून चेक आऊटपर्यंत उपलब्ध असलेली वैशिष्ट्ये आणि सुविधा दाखवतात. तुम्ही तुमच्या जागेचे वर्णन केलेल्या पद्धतीशी त्यांचा अनुभव जुळत नसल्यास गेस्ट्स निराश होतील.
वास्तववादी अपेक्षा सेट करणे
तुमच्या जागेची खूप कौतुक करू नका मात्र एखादी महत्त्वाची माहिती टाकायची पण विसरू नका. तुमच्या जागेच्या आणि तुमच्या आसपासच्या परिसराच्या संभाव्य कमतरतेबद्दल मोकळेपणाने बोलणे चांगले असते, जसे तुमच्या जागेत पडद्यातून सकाळचा भरपूर उजेड आत येतो किंवा तुमची जागा एखाद्या बांधकाम क्षेत्राजवळ असणे.
या सल्ल्यांसह तुम्ही अपेक्षा योग्यरित्या सेट करतअसल्याची खात्री करा:
- गेस्ट्सना सांगा की ते तुमच्या लिस्टिंगच्या वर्णनामध्ये नक्की काय अपेक्षा करू शकतात आणि कॅप्शन्ससह फोटो जोडा. प्रॉपर्टीवर कुत्रा असेल किंवा जिन्याच्या पायऱ्या आवाज करत असतील तर गेस्ट्सना तसे कळवा.
- रूम्स आणि बाथरूम्सची योग्य संख्या एन्टर करा. तुमच्या लिस्टिंगच्या प्रकाराने तुमची वास्तविक जागा देखील दाखवायला हवी—जर ते अपार्टमेंट कॉम्प्लेक्स असेल तर त्याचे ग्रामीण घर म्हणून वर्णन करू नका.
- तुमच्या सुविधांची अतिशयोक्ती करू नका. जर तुम्ही एखाद्या लोकप्रिय आकर्षणापासून एक तासाच्या अंतरावर असाल तर तुम्ही जवळ आहात असे म्हणू नका—तुम्ही नक्की किती दूर आहात ते सांगा. तुमच्या पूल किंवा हॉट टबचे सीझननुसार तास असतील किंवा बंद होण्याच्या वेळा असतील तर तुमच्या लिस्टिंगमध्ये त्या गोष्टींचा समावेश करा.
तुमच्या गेस्ट्सना खुश करणे
यशस्वी होस्ट्स अपेक्षेपेक्षा कमी आश्वासन परंतु अपेक्षेपेक्षा जास्त सेवा देतात. याचा अर्थ ते त्यांची लिस्टिंगचे तपशील वाढवून सांगणे टाळतात आणि उत्तम प्रकारे आदरातिथ्य करण्याचा अतिरिक्त प्रयत्न करतात.
चेक इन करताना तुमच्या गेस्ट्सना मोहित करण्यासाठी या सूचना वापरून पहा:
- अस्सल फोटोज द्या. अल्ट्रा-वाईड अँगल्स वापरणे टाळा आणि जागा आहे त्यापेक्षा मोठी किंवा अधिक प्रकाशमान दिसू शकेल असे तुमच्या फोटोजमध्ये खूप बदल करू नका. तुम्ही काही लोकेशन्सवर Airbnb वरून व्यावसायिक फोटोग्राफरला कामावर घेऊ शकता.
- नियमित देखभाल करणे अंगवळणी असू द्या. लिस्ट केलेले सर्व काही उपलब्ध आहे आणि कार्यरत आहे हे कन्फर्म करण्यासाठी तुमची जागा वारंवार तपासा. तुमच्याकडे हॉट टब, स्विमिंग पूल, डिशवॉशर आणि यासारख्या इतर गोष्टी असल्यास, गेस्ट्स येण्यापूर्वी ते अगदी चकचकीत स्वच्छ असल्याची आणि योग्यरित्या काम करत असल्याची खात्री करा.
- तुमच्या गेस्ट्सचे आभार व्यक्त करण्यासाठी टोकन म्हणून काहीतरी अधिक करा. ती एखादी हस्तलिखित वेलकम टीप असू शकते किंवा कुकीजचा बॉक्स, करायला अशी सहज सोपी असणारी गोष्ट असू शकते.