तुम्हाला होस्टिंगसाठी पेमेंट कसे मिळेल
पेमेंट्सना आम्ही पेआऊट्स म्हणतो आणि Airbnb मध्ये ते खूप सोप्या पद्धतीने म्हणजे फक्त काही पायऱ्यांमध्ये मिळवता येतात.
तुम्हाला पेमेंट कसे मिळेल
तुम्ही होस्टिंगद्वारे कमावलेले पैसे तुम्हाला कसे मिळावेत हे तुम्हीच निवडता. तुमचे पर्याय तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून असतात. पेआऊट पद्धतींमध्ये समाविष्ट आहेत:
- बँक खाते
- Fast Pay
- इंटरनॅशनल वायर
- Payoneer प्रीपेड डेबिट Mastercard
- PayPal
- Western Union
पेआऊट्स सेट अप करण्यासाठी, तुमच्या होस्टिंग अकाऊंट सेटिंग्जमधील पेमेंट्सविभागात पेआऊट्स अंतर्गत एक पेआऊट पद्धत जोडा. तुम्ही निवडलेली पद्धत तुम्ही त्यात बदल करेपर्यंत सर्व भावी पेआऊट्सवर लागू होईल.
तुम्हाला तुमची करदात्याची माहिती द्यावी लागू शकते म्हणजे आम्ही तुम्हाला कर डॉक्युमेंट्स पाठवू शकू. तुमच्यावर हे लागू होते याची खात्री नाही? Airbnb कडील कर डॉक्युमेंट्सबद्दल अधिक जाणून घ्या.
तुमची पेआऊट पद्धत व्हेरिफाय केली जात असताना, ती प्रलंबित म्हणून दाखवली जाईल. व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेसाठी 10 दिवस लागू शकतात—अपवाद Fast Pay चा, जे लगेच व्हेरिफाय केले जाते.
तुम्हाला किती पेमेंट मिळेल
कोणत्याही वास्तव्यातून झालेली तुमची कमाई पाहण्यासाठी कॅलेंडरवर ते रिझर्व्हेशन निवडा. बुकिंग तपशिलांच्या खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला एक तपशीलवार लिस्ट दिसेल ज्यात खालील बाबी समाविष्ट असतील:
- गेस्टच्या वास्तव्यासाठी तुमचे प्रति रात्र भाडे
- तुम्ही स्वच्छता, पाळीव प्राणी किंवा अतिरिक्त गेस्ट्ससाठी आकारत असलेले कोणतेही ऐच्छिक शुल्क
- ऑक्युपन्सी कर
- Airbnb सेवा शुल्क
- को-होस्टचे पेआऊट, जर तुम्ही ते सेट अप केले असेल तर
- तुमचे एकूण पेआऊट
सेवा शुल्कांमुळे Airbnb ला तुमची जागा शेअर करण्यात तुमची मदत करणाऱ्या उत्पादनांचा आणि सेवांचा खर्च भागवण्यात मदत होते, जसे की 24/7 ग्राहक सपोर्ट. Airbnb सेवा शुल्कांबद्दल अधिक जाणून घ्या.
जर तुमचे पेआऊट तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असेल, तर हे तुम्ही जोडलेल्या सवलतीमुळे किंवा रिझर्व्हेशन कॅन्सलेशनमुळे किंवा बदलल्यामुळे असू शकते. काही पेआऊट पद्धतींवर ट्रान्झॅक्शन शुल्क देखील लागू होऊ शकते, तसे तर अनेक पद्धतींसाठी अतिरिक्त शुल्क नसते.
तुम्हाला पेआऊट कधी मिळेल
तुम्ही होस्टिंगमधून कमावलेले पैसे सहसा चेक इन केल्यानंतर कामकाजाच्या एक दिवसाच्या आत पाठवले जातात. काही प्रकरणांमध्ये, पैसे चेक आऊटनंतर कामकाजाच्या एक दिवसाच्या आत पाठवले जातात, जसे की:
- नवीन होस्टने लिस्टिंग व्हेरिफाय केलेली नसल्यास
- होस्टने आमच्या अटी, धोरणे किंवा स्टँडर्ड्सचे उल्लंघन केल्यास
- Airbnb, त्यांचे सदस्य किंवा तृतीय पक्षाचे संरक्षण करणे वाजवीपणे आवश्यक आहे असे Airbnb ला वाटल्यास.
एखाद्या रिझर्व्हेशनसाठी तुमच्या पेआऊटची वेळ पाहण्यासाठी तुमच्या कमाई डॅशबोर्डवर जा. Airbnb ने पेआऊट रिलीज केल्यानंतर ते मिळण्यासाठी लागणारा वेळ हा तुम्ही निवडलेल्या पेआऊट पद्धतीवर अवलंबून असतो.
उपलब्ध असलेल्या पेआऊट पद्धती आणि त्यांच्या सामान्य डिलिव्हरी वेळा खालीलप्रमाणे आहेत:
- Fast Pay: 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी
- Payoneer प्रीपेड डेबिट Mastercard: 24 तास किंवा त्यापेक्षा कमी
- PayPal: कामकाजाचा 1 दिवस
- Western Union: कामकाजाचा 1 दिवस (देश किंवा प्रदेशानुसार बदल होऊ शकतो)
- बँक ट्रान्सफर: कामकाजाचे 3 ते 5 दिवस
- आंतरराष्ट्रीय वायर ट्रान्सफर: कामकाजाचे 3 ते 7 दिवस
जेव्हा तुम्ही 28 रात्री किंवा त्याहून अधिक कालावधीचे वास्तव्य होस्ट करता, तेव्हा Airbnb तुमचे पेआउट्स मासिक हप्त्यांमध्ये पाठवते आणि त्याची सुरुवात चेक इन केल्यानंतर कामकाजाच्या एक दिवसाच्या आत करते. काही प्रकरणांमध्ये, जसे की एखाद्या नवीन होस्टने लिस्टिंग व्हेरिफाय केलेली नसल्यास, पहिला हप्ता चेक इन केल्यानंतर 28 दिवसांनी पाठवला जातो.
पेमेंट मिळवण्याबद्दल अधिक जाणून घ्या. तुम्ही तुमच्या कमाईच्या डॅशबोर्डमध्ये तुमच्या पेआऊट्सचे स्टेटस कधीही पाहू शकता.